ईश्वर / देवत्व कल्पना --- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच
दशावतार ---५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी आणि
सहव्वी कल्पना उपयुक्त सजीव उदाहरणार्थ गाय
आपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
आत्ता पर्यंत आपण ४ प्रकार पहिले १ ओमकार २ त्रिगुण ३ पंचा महाभूते
४सजीवांच्या उत्क्रांतीच्या पहिल्या ४ अवस्था ज्या प्राणी प्रकारात मोडतात.
सजीवांच्या पहिल्या चार प्रकारात आपल्याला असे लक्ष्यात येईल कि त्यात
देहाची उत्क्रांती होत गेली आहे. आणि एकदा मानव देह मिळाल्यावर त्याच्यातील
बदल हाआपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
प्रथम शारीरिक पण त्याच आकारात --- ५)वामन
नंतर बौद्धिक ------------------------------ ६)परशुराम
मग मानसिक ----------------------------- ७)राम
आणि बुद्धी आणि मनाचा सुरेख संगम -- ८)कृष्ण
हे बदल होत होत पुढे संहाराच्या जाणीवेतून एकदम विरक्ती ----- ९)बौद्ध
आणि शेवट आत्ता चालू असलेला अराजक अस्थिर द्विधा मनसस्थितीतील माणूस --------- १०)कलंकी
ह्या सर्वांचा उंचावरून विचार करता असे लक्षात येते कि पहिले ३ मुळात देह नाहीत अद्वैत-एकटा, वृत्ती व निर्जीव पण निसर्गातील शक्ती आहेत. त्यांना मानव रूप कोणी कधी व का दिले ते कळत नाही. कदाचित निव्वळ अद्वैताची, वृत्तीची किंवा निव्वळ शक्तीची उपासना मानत स्थिर होणे कठीण असल्याने मानवी देह कल्पून त्यांना पूजणे सुरु झाले असावे.
सजीवातील ज्या प्राण्यांना आपण देव मानतो तरी त्यांचे आजचे वास्तवातील स्थान मर्यादित दिसते.
आत्ता फक्त मानवी देहरूपी देव प्राधान्याने पूजले जातात असे जाणवते.
आज पर्यंत आपण देवत्वाचे प्रमुख प्रकार पहिले
आज मी काही प्रश्नावली आपल्या समोर ठेवत आहे.
अ) मी एखाद्या व्यक्तिरेखेला देव मानतो त्या मागील माझी भूमिका काय आहे? का र ण काय आहेत?
ब) मला देव हवा असे खरोखर मनापासून वाटते का? त्या साठी मी काय केले पाहिजे आणि ते मी करतो का?
क) माझ्या देवाकडून काही अपेक्षा आहे का? त्या पुऱ्या झाल्या का?
ड) देवत्व हे मी नेमके कुणाकुणाला बहाल करीन
No comments:
Post a Comment