Wednesday, 8 August 2012

देवत्व कल्पना समारोप

देवत्व कल्पना समारोप
आत्ता पर्यंत आपण देवत्वाच्या विविध कल्पना पहिल्या. त्यातून आपल्याला असे लक्ष्यात येईल कि देवत्व मानताना माणसाची मानसिकता व्यक्तिपरत्वे वेगवेगळी आहे. म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींना देव मानतो. म्हणजे प्रत्येक जण आपल्या कल्पनेत आपणच काही तरी ठरवतो, तो देव आहे असे मानतो असे दिसते. 
कारण ईश्वर (ईश्वरी शक्ती) तर एकच आहे तरीही अनेक प्रकारांना / गोष्टींना माणूस देव मानतो.
आणखीन एक गोष्ट लक्षात आली प्रत्येक जण वेगवेगळी कल्पना मांडून त्याला घट्ट पकडून ती कशी बरोबर आहे हे ठासून सांगत असतो. म्हणजे आपला देव आपल्या कल्पनेप्रमाणे बदलता म्हणजेच वेगवेगळा आहे असे दिसते. ह्याचाच दुसरा अर्थ देव एकच असला तरी मी माझ्या कल्पनेच्या बंधनात त्याला आपल्याला हवा तसा बांधून ठेवतो आणि दुस्र्यांनीही तसेच असावे करावे हि सुप्त इच्छा मनी बाळगतो. मुळात सर्वव्यापी ईश्वराला आपल्या चाकोरीत आपल्याच कल्पनेने बांधून त्याच्या कडे पाहतो. आणि अहंकार सोडून ज्या देवाकडे मन न्यायचे तेच मन आपल्या संकुचित कल्पनेच्या अहंकाराने भरून त्याच्या कडे जातो. आणि नेमके फसतो.
मी केलेल्या पोस्ट वर काही प्रतिक्रिया आल्या आहेत त्या शक्यतो त्यांच्याच शब्दात व जिथे पल्ल्हालिक आहे तिथे संशिक्प्त करून किंवा निव्वळ आशय आपल्या समोर मांडला आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आधी स्पष्ट शब्दात रेखांकित करून लिहिल्या आहेत
!!--- देव हि माणसाने निर्माण केलेली संकल्पना आहे देव आजवर कुणी पहिला नाही
##----- ह्याचा अर्थ देव पाहता येत नाही कारण पंचा महा भूतांची जाणीव ज्या पंच न्यानेन्द्रीयांनी माणसाला होते त्या पैकी कोणत्याही एका किंवा सर्व न्यानेन्द्रीयानी तो जनता येत नाही कारण तो पंच महा भुतांच्या पलीकडे आहे त्या हि पेक्षा शुक्ष्म आहे.
!!--- पण हे अद्भुत विश्व ज्याने कुणी निर्माण केले ती शक्ती म्हणजेच देव असे आपण म्हणू शकतो.
##----- ह्याचा अर्थ विश्वाच्या भव्यतेला आणि दिव्यातेला कारणीभूत होणाऱ्या शक्तीला मी देव मानतो
!!--- अस्थिरता अनिश्चितता पराधीनता ह्या जाणीवेमुळे संकटकाळी आधार म्हणून देव असावा असे मला वाटते त्या साठी देवावर श्रद्धा असावी आणि एक मस्तक झुकविण्यासाठी आणि दोन हात जोडण्यासाठी पुरतात.
## -----संकट कालचा आधार म्हणून मी देवाकडे पाहतो. तो संकटकाळी आपल्याला उपयोगी पडतो ह्या जाणीवेने मी त्याला देव मानतो पण मी आधी दमतो आणि मग त्याच्या पुढे नमतो. आणि दोन्ही हात बांधून शरण जातो पण तात्पुरते. तोंडाने म्हणतो अनंत अपराधी असा मी तुला अनन्य शरण आलो आहे. पण अहंकाराचा समूळ नाश झाल्याशिवाय अनन्न्यता शक्यच नाही.
!!--- मी एखाद्या व्यक्तिरेखेला देव मानतो त्या मागील माझी भूमिका काय आहे ? कारण काय आहे? --- प्रसंगानुरूप बदलते ----- सांगणे कठीण आहे. ##----- मी व्यक्ती रेखेला मानतो पण ती व्यक्ती रेखा प्रसंगानुरूप बदलते. ह्याचा अर्थ कोणतीही एक व्यक्ती देव म्हणून मी स्वीकारू शकत नाही म्हणजेच माझी देवा बद्दलची कल्पना नक्की नाही. पर्यायाने देवही नक्की नाही. अर्थात तो आहे कि नाही ह्या विषयी सुद्धा संभ्रम आहे असे ह्यातून दिसते. असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
##----- अर्थात हे वास्तव सुद्धा ढोंगी अस्तीकते पेक्षा नास्तिकता नास्तिकता मान्य करण्याचा प्रामाणिक पणा दर्शवते. अर्थात कोणत्याही ढोंगी माणसापेक्षा अशी माणसे ईश्वराच्या जवळ असतात ह्यात वाद नाही. ईश्वराकडे ढोंगाचा लवलेश हि चालत नाही. संकट त्यातून प्रयत्नांना आलेले अपयश त्यामुळे मिळालेली निराशा यातून अशा एका शक्तीला आपण आव्हाहन करतो त्याला आपले सर्वस्व अर्पण करतो. आपली मदत त्याच्याशिवाय कुणीच करू शकत नाही हि भावना. त्यामुळे परमेश्वर आपली इच्छा पूर्ण करतो. आणि त्या रूपावर आपण श्रद्धा समर्पित करतो. संकट कालचा आधार जो देतो तो मला देव वाटतो.
##----- आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपल्या स्वतःच्या शक्तीच्या अपूर्णतेच्या जाणीवेतून मी बाह्य शक्तीचा आधार शोधतो. अशा कोणत्या तरी शक्ती च्या मदती शिवाय आपल्याला यश येणे साक्यचं नाही हि जाणीव ठाम होते म्हनुये परमेश्वर आपली इच्छा पुरी करतो. म्हणजे माझी इच्छा म्हजेच वासना पूर्ण करतो त्याला मी देव मानतो. आणि मग त्याच्या रूपावर आपली शरद्ध समर्पित करतो.
!!--- ईश्वर कोणत्याही रुपात असला तरी तो आईच आहे        ##----- ईश्वर मला आई वाटतो कारण तो आई प्रमाणे माझे सर्व लाड पुरवणारा आहे, माझे अपराध पोटात घालणारा आहे. मृदू भाव आहे. आपले सर्व काही सहन करणारा आहे. प्रचंड धारण शक्ती असलेला असा आहे.
##----- माणूस वर्ण भेदाप्रमाणे शक्ती गुरु शिव उपासक असतो.     ##----- देव हा शक्तिमान आहे आणि त्याची उपासना केल्यास आपल्याला (काही प्रमाणात तरी) शक्ती प्राप्त होईल म्हणून मी त्याची उपासना करतो. ते करत असतांना मी माझ्या वर्णामुळे सहज असलेल्या वृत्ती प्रमाणे व ज्या प्रकारच्या शक्ती मला स्वाधीन व्हाव्यात अशी अपेक्षा आहे त्या प्रमाणे देव निवडतो आणि त्याची उपासना करतो.  
!!--- गणेशजी म्हणतात मी आदी, अंत,      ##----- गणेशजी - (देव) हा विश्वाची सुरुवात आहे आणि मीच शेवट आहे. आणि त्या मध्ये आपल्याला दिसणारा विश्वाचा प्रसारा मांडला आहे ज्याचे आपण एक भाग आहोत औश आहोत.  
!!--- परिस्थिती प्रमाणे भगवंत अवतार घेतो.     ##----- सामाजिक परिस्थिती प्रमाणे भगवंत अवतार घेतो कारण ती त्या त्या काळाची गरज असते. काही व्यक्ती जन्मतःच सिद्ध असतात त्यांना तप अर्चनाची गरज नाही.  
पूर्व जन्मानुसार प्रत्येक माणूस जिथे जसा जन्मायला हवा तसा जन्म घेतो. म्हणजेच पूर्व जन्मीच्या साधनेच्या कमी अधिक प्रमाणानुसार व कमीअधिक प्रती नुसार माणूस कमी अधिक शक्ती घेऊन जन्माला येतो. जो आपल्याला आपल्या पेक्षा जास्त शक्तिमान असतो त्याला आम्ही सिद्ध मानतो आणि आपल्याला जास्त उपयोगी पडतो त्याला मग आपण देवत्व देतो. अशा व्यक्तींना आणखी कोणत्याही साधनेची जरूर नाही असे आम्ही समजतो.
!!---  सायन्स हे अलीकडचे आहे अध्यात्म हे अनादी आहे.     ##----- सायन्स हे विश्वाच्या सुरवातीपासून आहे कारण विश्व आपले गुण घेऊनच जन्माला आले. त्या गुणांची माहिती शब्दात मांडणे म्हणजे सायन्स. ते माणसाला अलीकडे व्यक्त झाले. सायन्स हे भौतिकाचे नियम सांगते. भौतिक म्हणजेच पंचमहाभुते. माझा देह सुद्धा पंच महा भूतांचाच बनलेला आहे. अर्थात त्या सर्व पंच महा भूतांचे गुणधर्म माझ्यात असलेच पाहिजेत. जसे वस्तू ज्या धातूची बनलेली असते त्या वस्तूचे गुणधर्म त्या वस्तुत असतातच.  
##----- दृष्य देह म्हजे स्थूल देह आणि माणसाचे मन हे त्याच्या सूक्ष्म देह असते. देह पंच महा भूतानंचा आणि त्याचे गुण व गुणधर्म म्हणजेच माणसाच्या मनाच्या स्थिती / अवस्था. हे वास्तव आपण नेहमी अनुभवत असतो. म्हणजे पंच महा भुतांच्या मर्यादेत आपण आपली प्रगती करू शकतो विचार पूर्वक जराशीही अंध श्रद्धा न ठेवता.
##----- देह तर नश्वर आहे मन हि नश्वर आहे तरीही देहाच्या प्रगतीला मर्यादा आहेत पण मनाच्या प्रगतीला मर्यादा नाहीत. तसेच शक्ती हि अधिक व्यापक असते. मन हे पंचा महाभूतांच्या शक्तींचे एकत्रित स्वरूप आहे. कोणतीही शक्ती अदृश्यच असते तिचे परिणाम दृश असतात तेच मनाचे आहे. म्हणजेच मन दिसत नाही पण त्याचे परिणाम शरीरावर दिसतात चांगले / वाईट जसे मन असेल तसे.  
!!--- ईश्वर शुद्धतम आहे त्याला जाणण्यासाठी शुद्दतम व्हायला हवे. ##----- तो लोह्चुम्बाका प्रमाणे प्रत्येक चराचरास आपल्याकडे सतत ओढत असतो. पण आपल्या लोखंडी देहावर देहबुद्धीच्या अहंकारच गंज चढलेला असल्यामुळे आपल्याला त्याची ओढ जाणवतच नाही. आणि आपण त्याच्या जवळ जितके जायला पाहिजे तितके जात नाही.
तो गंज काढणे म्हणजे स्वतःला शुद्धतम बनवणे. म्हणजे स्वतःचे मन शुद्धतम बनवणे. हि क्रिया भौतिकात मोडते. ह्या साठी प्रयत्न करणे म्हणजेच साधना ती करणारा तो साधक साद्ध्य होते ते ईश्वर सान्निध्य आणि हे साधते तो सिद्ध पूर्वीच्या कली मनुष्य पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता सायन्स मद्ध्ये एव्हढी प्रगती नव्हती निसर्गाच्या हातातले बाहुले तो त्यामुळेच देव जन्माला आला.
!!--- मानले तर देव नाही मानल तर दगड.          ##----- तर मग हे जाणून घेणे आवश्यक आहे कि ह्या वेग वेगळ्या कल्पन्न्माद्ध्ये अशी कोणती गोष्ट आहे कि ज्यामुळे माणूस त्या कोणत्यातरी गोष्टीला देव मानतो ??? ज्या अर्थी देव वेगवेगळे आहेत त्या अर्थी मान्नार्याची भूमिका वेग्व्गली असलीच पाहिजे.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ड - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ९) बौद्ध १०) कलंकी

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ड - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ९) बौद्ध १०) कलंकी 
हे बदल होत होत पुढे संहाराच्या जाणीवेतून एकदम विरक्ती, त्या त्या काळाची गरज ----- ९)बौद्ध   
शेवट आत्ता चालू असलेला अराजक, अस्थिर, द्विधा मनसस्थितीतील, माणूस ------------- १०)कलंकी 
ह्या सर्वांचा उंचावरून व त्रयस्त पणे विचार करता असे लक्षात येते कि पहिले ३ मुळात देह नाहीत पहिला अद्वैत-एकटा, दुसरया वृत्ती व तिसर्या निर्जीव पण निसर्गातील शक्ती आहेत. त्यांना मानव रूप कोणी कधी व का दिले ते कळत नाही. कदाचित निव्वळ अद्वैताची, वृत्तीची किंवा निव्वळ शक्तीची म्हणजे अव्यक्ताची उपासना मानत स्थिर होणे कठीण असल्याने त्यांना व्यक्त मानवी देह कल्पून त्यांना पूजणे सुरु झाले असावे. 
सजीवातील ज्या प्राण्यांना आपण देव मानतो तरी त्यांचे आजचे वास्तवातील स्थान मर्यादित दिसते. आज कलंकी हा अवतार  प्रकारचा कालखंड चालू आहे. बाकी सर्व देवांना आपण देवळात पुजतो. आणि कालान्कीला मात्र  आचरणात  आणतो  असे  आजचे  वास्तव आहे. बाकीच्या देवांचे आपण गुणगान करतो. कालान्कीचे गुण मात्र प्रत्यक्षात आचरतो. बाकीचं देवांची आपण पूजा करतो कालान्कीशी मात्र तादात्म्य पावून वावरत आहोत. त्यामुळे आपले खरे कोणते आणि खोटे कोणते हे आपणच तपासून पाहायला हे लेखमाला उपयोगी पडेल ह्याची मला खात्री आहे. 
काही तांत्रिक अडचणीन मुळे मी ९ दिवसांनंतर हा समारोप करत आहे. ७ जुलै ते २२ जुलै पर्यंत पुन्हा एकदा माझ्या लिखाणात खंड पडणार आहे. कारण माझेच मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे. तो पर्यंत आपल्याला विचार करायला छोटीशी प्रश्नावली आपल्या समोर ठेवत आहे.  
अ) मी एखाद्या व्यक्तिरेखेला देव मानतो त्या मागील माझी भूमिका काय आहे? का र ण काय आहेत?
ब) मला देव हवा असे खरोखर मनापासून वाटते का? त्या साठी मी काय केले पाहिजे असे मला वाटते आणि ते मी करतो का?
क) माझ्या देवाकडून काही अपेक्षा आहे का? त्या पुऱ्या झाल्या का?
ड) देवत्व हे मी नेमके कुणाकुणाला बहाल करीन?
ई) मला देव हवासा वाटतो कि त्याने फक्त आपल्याला वेळोवेळी माझ्या जरुरी प्रमाणे उपयोगी पडावे असे मला वाटते? 
मला पूर्ण खात्री आहे कि ह्या प्रश्नान्नाची उत्तरे आपल्याला योग्य रीतीने अंतर्मुख करतील आणि आपली ईश्वराला भेटण्याची खरोखर इच्छा असेल तर आपल्या मनातील यात्रेला सहाय्यभूत ठरतील. शुभम भवतु.   

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-क - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-क - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी 
पाहिया ४ प्रकारातील प्रगती हि शारीरिक दिसते. आणि इथून पुढची उत्क्रांती बौद्धिक व मानसिक आढळते.   
पहिला मानव देही --------५)वामन - बुटका माणूस. पिग्मी. सजीवाच्या उत्क्रांतीतील मानवी देहधारी पहिला प्रकार. इथे मानव देह आहे. पण त्याहून अधिक काही प्रगत पण दिसत नाही. 
नंतर बौद्धिक -------------- ६)परशुराम --- बौद्धिक उत्क्रांती, मानसिक दृष्ट्या तामसी. परशुरामाच्या बाबतीत बौद्धिक प्रगती परिपूर्ण झालेली आढळते, पण वृत्ती  मात्र तामसी  म्हणजे  शंकरसारखी आढळते.     
मग मानसिक ------------- ७)राम ------- बौद्धिक, अधिक मानसिक उत्क्रांती (तामसी ते  राजस ते सात्विक) पण सत्व प्रधान. ह्या ठिकाणी वृत्तीत उत्क्रांती झालेली आढळते. श्री राम क्षत्रिय असून त्याची वृत्ती सात्विकता प्रधान आहे असे जाणवते. भावनिक तरलता हि आढळते. समाजाला स्वतः पेक्षा आधी प्राधान्य त्याने दिले आहे. आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे.  
पूर्ण पुरुष ------------------ ८)कृष्ण ------  बौद्धिक, मानसिक, दोन्हीचे अत्यंत संतुलन असलेला अहंकारावर स्वामित्व मिळवलेला परिपूर्ण पुरुष. पुद्धी आणि मन दोन्हीही अत्यंत परिपूर्ण व अत्यंत संतुलित अशी हि अवस्था दिसते. त्यामुळे तात्कालिक समाजात सहज पणे स्वामित्व मुलून गेलेला असा हा महापुरुष आहे     
ह्या प्रकारात असे लक्षात येते कि एखाद्या विशिष्ट काळात एखाद्या विशिष्ट समाजाला राक्षशी प्रवृत्तींच्या हुकुमशहांच्या  बंधनातून मुक्त करणाऱ्याला त्या त्या वेळचा समाज देवत्व बहाल करतो. म्हणजे तो त्या काळी त्या समाजाचा नेता बनतो. त्या कालचा समाज त्याला सहज पणे आपला नेता म्हणून स्वीकारतो. आधी कधी तात्काळ. किंवा पुढे तो ऐतिहासिक, किंवा पूर्ण पुरुष झाला कि त्याला समाज देवत्व बहाल करतो. आपला तारणहार मानतो. ईश्वर मानतो कारण तो समाजाच्या मुक्तीचे कारण ठरलेला असतो.    

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ब - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार --

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ब - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार --
२ रा अवतार- कूर्म (कासव) . ३ रा अवतार वराह (डुक्कर) हे दोन अवतार उभयचर आणि पहिला भूचर असे आहेत. ४ था अवतार नारसिंह
ह्या दोन पैकी  कासवाला आपल्याकडे कायम स्वरूपी देवत्व बहाल केले गेले आहे असे दिसते. आणि ते  कारण त्याचा  स्वतःच्या  इंद्रियांना  आवरण्याचा  गुणधर्म. हे पारमार्थिक साधनेसाठी लागणारा प्रधान गुण असल्यामुळे हि स्वीकृती जाणवते. वराह अवतरला  मात्र  फारसे  महत्व दिले गेलेले दिसत नाही. नारसिंह अवताराच्या  मागे मात्र आपल्या सर्वांना माहित असलेले कथानक आहे. इथ पर्यंतची उत्क्रांती हि देहाची आहे. म्हणजे देहामधील प्रगती दिसते. हातपाय नसलेल्या प्राण्यापासून ते चारपाय आणि नन्तर दोन पाय दोन हात. एव्हढी उत्क्रांती झालेली दिसते. पाहिया ३ प्रकारात फक्त देही उत्क्रांत झालेला दिसतो पण चौथ्या प्रकारात तो मानवाच्या उपयोगी पडला सत्विकातेला आधारभूत ठरला म्हणून त्याला सुद्धा कायम स्वरूपी देवत्व बहाल केले गेलेले दिसते. त्या मानाने मत्स्य आणि वराह ह्या दोघांना देवत्व आहे पण समाजाने प्रधान स्थान दिलेले दिसत नाही. प्रत्येक पुढची पिढी हि पहिल्या पिढी पेक्षा प्रगत असते. हा सिद्धांत संपूर्ण सजीवाला लागू होतो. ह्यालाच अनुवंशिकता म्हणतात. एका योनीतून दुसरया योनीत जन्माला येणे ह्याला पुनर्जन्माचा सिद्धांत म्हणतात. पुनर्जन्म हे वास्तव आहे. प्राण्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळी पुढील योनी हि पूर्वीच्या योनिपेक्षा प्रगत योनीच संभवते. कारण त्याच्या बुद्धीची झेप स्वसंराक्षानापुरतीच मर्यादित असते. जगण्यातील सुरक्षितता हा प्रधान भाव असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रगत योनीत जन्माला येत येत माणसाचा जन्म घ्यायला सर्व च्या सर्व योनीतून जावे लागलेच तर ८४ लक्ष योनी म्हणजे सजीवांचे प्रकार आहेत त्यातून जावे तेव्हा जीवाला मनुष्य जन्म येतो असे आपल्या हिंदू धर्म शाश्त्राचे म्हणणे आहे. म्हणूनच मानव जन्म दुर्मिळ आहे असे म्हणतात. त्याचे सार्थक करावे असे आपल्याला वारंवार संग्न्येत येते त्या मानव जन्माच्या उत्क्रांतीचे दर्शन पुढील भागात घेवूया.            
 

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-अ - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-अ - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,
१ ला अवतार- मत्स्य.
आपल्याकडे ८४ लक्ष सजीव प्रकार आहेत, अशी कल्पना आहे. त्यांची प्रगती सुद्धा जलचर - उभयचर -- भूचर अशा क्रमाने झालेली आहे आणि हे आजच्या विज्ञान प्रधान युगालाही ज्ञात आहे मान्य आहे. त्यातील बदलत्या टप्प्यातील शेवटचा टप्पा हा आपल्याकडे देवत्व मानला गेलेला दिसतो. म्हणजे जालाचारातील अंतिम प्रगल्भता लाभलेला टप्पा मत्स्य. मत्स्याच्या पुढची पायरी उभयचर त्यातील अंतिम प्रगल्भता लाभलेला टप्पा २ रा अवतार कूर्म. ३ रा भूचर वराह व ४ था नरसिंह हे रूप मात्र विज्ञानाच्या उत्क्रांती वादाशी थोडे वेगळे दिसते. मिश्र भावी दिसते.  
ह्या उत्क्रांती वादाच्या मागची मानसिकता काय असावी ह्याचा आता विचार करू. श्रुष्टीतील यच्ययावत सजीव (आणि निर्जीव सुद्धा) मुक्ती साठी तडफडत आहे. त्याच्या अनेक इच्छांपैकी मुक्ती हि मुलभूत इच्छा आगदी प्रत्येकात अखंड आहे पण त्या साठी आपल्याला नेमके काय घडले म्हणजे आपण मुक्त होऊ? आपल्याला मोकळे वाटेल? असा विचार ज्या ज्या वेळी मनात घर करतो त्या त्या वेळी त्याला न लाभलेली आणि हवी असलेली गोष्ट लाभली तर त्याला मुक्त वाटते, हि सहज प्रवृत्ती निर्माण होते, आगदी प्रत्येक सजीवत. हि मुक्तीची तीव्र इच्छाच त्याला उत्क्रांतीला मदत करते. त्याच्या पुढील जन्मात त्याच्या ह्या इच्छेतूनच त्याच्या प्रत्येक पूर्वीच्या योनिपेक्षा जरा उच्च योनी त्याला प्राप्त होते. ह्या बदलाचा वेग कमी असतो. कारण तो जन्म जन्मान्साठीचा असतो.  आपण प्रगत मानव विचार करू शकतो म्हणून ह्या मागच्या प्रगतीच्या आलेखाची आपल्याला नक्की कल्पना येऊ शकते. त्यातील महत्वाचे टप्पे म्हणजेच दहाव्तारातील पहिले ४ अवतार होत. ह्या टप्प्यात देहात बदल होत गेलेला दिसतो. हे होत असतांना. पहिला प्रकार नष्ट होत नाही. तर तो अस्तित्वात राहून पुढील प्रकार निर्माण होतो असे दिसते.   

मद्ध्ये पंच महाभूते हा एक प्रकार चुकून लिहायचा राहून गेला तो आता लिहितो आहे.

मद्ध्ये पंच महाभूते हा एक प्रकार चुकून लिहायचा राहून गेला तो आता लिहितो आहे.
ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३इ - तिसरा प्रकार --- पंच महा भुते  तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- १)पृथ्वी २) आप (पाणी) ३) तेज ४) वायू ५) आकाश. मी थोडा क्रम वेगळा देतो १) पृथ्वी २) आप (पाणी) ३) वायू ४) तेज ५) आकाश
ह्या नंतरचा कालखंड असा दिसतो कि मानवाने पंच महाभूतांना देव मानले आहे. हे देवत्व देतांना तो त्यांना मानव  रूप  देण्याचे  विसरला नाही. सूर्यदेव, वरुणदेव, वायुदेव, वगैरे. ह्या काळात मानवाची बौद्धिक प्रगती फारशी झालेली दिसत नाही. त्यामुळे ह्या शक्ती भौतिक अथवा नैसर्गिक कारणाने विकृत  स्वरुपात  प्रकट  झाल्यास, त्यांच्या  बद्दल मानवी मनात  भीती  असल्याचे जाणवते आणि त्यांचा कोप होतो अशा प्रकारची मानवाची धारणा दिसते. म्हणजे शक्तीने आपल्या पेक्षा प्रचंड  असलेल्या  ह्या पंच महा भूतान पुढे आपण पराधीन आहोत. आणि त्यांना कधीही दुखावता कामा नये. दुखावल्यास ते आपल्याला त्रास देतील म्हणजेच त्यांचा कोप होईल  हि भावना दिसते. आपल्या त्यांच्या पेक्षा लहान पणाची, कमीपणाची, कमी शक्तीची जाणीव  त्यांना देवत्व देवून  जाते असे दिसते. म्हणजे देवत्व मानण्याच्या करणान मद्ध्ये हे हि एक कारण आहे असे दिसते.        

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ड - दुसरा प्रकार --- गुण --- त्रिगुण --- साधना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ड - दुसरा प्रकार --- गुण --- त्रिगुण --- साधना
आत्तापर्यंत पाहिलेल्या देवत्वाच्या संकल्पना स्वीकारतांना मानवाची विचारसरणी पुढील प्रमाणे दिसते.
१)आपले कर्तृत्व बजावतांना आपण कितीही काटेकोरपणे वागायचे ठरविले तरी 
कुठे तरी माणूस कमी पडतो ह्याची सुप्त जा
णीव. 
२)बुद्दीच्याही  पलीकडे  असे काही तरी आहे कि जे  आपल्यावर  कार्य करत आहे. ह्यातूनच आपल्यावर स्वामित्व गाजविणाऱ्या त्या अनोळखी शक्तीचे मोत्ठेपण 
आणि स्वतःचे कमीपण जाणवते.
३)त्या अज्ञात शक्तीचे मोठेपण व स्वतःचे कुठेतरी दुबळेपण. त्यामुळे घडलेली शरणागती.
४)आपल्या संसारासही हा उपयोगी पडेल असे वाटणे. संतत्ती, पैसा, जमीनजुमला, हे सर्व मिळवायला हि
 शक्ती आपल्या उपयोगी पडेल हि भावना.
५)मला संकटकाळी उपयोगी पडणारा. तो आपले संरक्षण करेल हि सुद्धा त्याच्या बद्दलची अपेक्षा आहे. कारण तो पालनकरता आहे अशी मानवाची श्रद्धा आहे.   
६) हि देवत्व स्वीकारण्या मागची मानवाची प्राथमिक भावना 
दिसते. म्हणून ह्या पालन कर्त्या विष्णूला देव म्हणून आपल्याकडील समाज जास्त प्रमाणात स्वीकारतांना दिसतो.  
७)हे स्वीकारतांना एक गोष्ट जा
णवते कि तो त्याला आपल्याला 
उपयुक्त आहे. त्याच्या पुढे जावून पाहिल्यास असे लक्षात येते कि त्याच्या संगतीत असल्याचे भासवल्याने माझ्या लौकिकात  भर परते हि जाणीव माणसाला होते आणि तो त्याच्या पूजेचे अवडंबर माजवायला लागतो.
८)पूजा हि वास्तविक ईश्वराशी अनुसंधान ठे
वण्याचा साधना प्रकार आहे. तो पूर्णपणे आंतरिक प्रवास आहे मानाच्या आतील प्रवास आहे. देहभाव सोडून आत्म भाव निर्माण करण्याची सा
धना आहे. पण  आम्ही बह्यालन्कारावर जास्त लक्ष देवून, जे साधन त्याच्या जवळ जाण्याचे आहे, त्याचा उपयोत त्याच्या पासून दूर जाण्यासाठी करतो. आणि हे माणसाच्या लक्षातच येत नाही. हा अध्यात्मिक भ्रष्टाचार आहे. 
९)मग त्यातून निर्माण होणाऱ्या विकृ
ती, म्हणजे आम्ही त्याच्या बरोबर व्यवहार सुरु करतो. त्याला पैशाने विकत घेवू पाहतो. आपल्या  लौकिकाचा उलट त्याच्यावर भर टाकू पाहतो. त्याला निरनिराळ्या रुपात आपल्या घरी आणून आपला लौकिक वाढविण्याचा प्रयत्न करतो
. नामाने मन पालातावयाचे (उन्मन करावयाचे) सोडून देह पालटायच्या मागे लागतो. हा धार्मिक भ्रष्टाचार आहे. 
१०)धर्म हा माणसाचे व्यक्तिगत, व्यावहारिक, सामाजि
क कर्तव्य सांगतो. तर परमार्थ 
हा माणसाचे मन संसारातून  काढून  ईश्वराकडे  लागण्याचे साधनाचे विविध मार्ग सांगतो. ते मनात अनुसरणे म्हणजे परमार्थ. म्हणूनच पुजेमाद्ध्ये मानसं पूजा हि सर्वोत्तम/सर्वश्रेष्ठ आहे. हीच खरीखुरी साधना. आहे त्याचे बाह्य स्वरूप हे संसार आहे आणि त्याचे अवडंबर हि त्याची विकृती आहे. 
ईश्वराचे अनुसंधान हा साधनेचा 
श्वास आहे, प्राण आहे, हा सर्व प्रवास मानाच्या आत आत खोल खोल करावयाचा आहे. ईश्वराकडे संसारतील त्रुटी पु
रविण्याची मागणी करण्यापेक्षा थेट त्यालाच मागायचा म्हणजे परमार्थ होय. शुभम भवतु.                    

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-क - दुसरा प्रकार --- गुण --- ३) तामस

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-क - दुसरा प्रकार --- गुण --- ३) तामस
३) म कार - तम - तामस - महेश/शंकर -----  नष्ट करणारा रागीट कारण राग आल्याशिवाय नाश करता येणार नाही. जे जे जन्मले  ते ते  नष्ट  झाले नाही तर नवनिर्मिती नाही. तामसगुणी. निरनिराळ्या वृत्तीचे कल्पनेने मानवी देह योजलेले आहेत. 
ब्रम्हा तीनही काळाचे भान असलेला म्हणून तीन तोंडे कल्पिली.
विष्णू अत्यंत धीरगंभीर पणे कर्तव्य पालन करणारा. नागावर आरूढ होऊनही शांत. 
शंकर तर क्रोधी म्हणजे तो क्रोध दोन डोळ्यातून बाहेर येण्याला कमी पडेल म्हणून कि काय त्याला तिसरा डोळा कल्पिलेला दिसतो. आणि स्वतःतील क्रोधाग्नी सहन होत नाही म्हणून सतत हिमालयात वास्तव. तो आग बाहेर सोडतो आणि सर्व भस्मसात होत हि कल्पना.  वास्तविक हा मानव  स्वरुपात  काल्पितांना, विरक्त, अत्यंत  त्याग स्वरूप, पूर्ण पणे निस्संग, असा कल्पिलेला आहे.  तरीही ह्या देवाबद्दल आपल्याकडे तो भोळा आहे. त्यामुळे तो लवकर वश होतो आणि मागेल ते देतो अशी एक भावना समाज मनात असल्या मुळे ह्या देवाचे  पूजन  विष्णू पेक्षा हि मोठ्ठ्या प्रमाणात होतांना दिसते. एका विरक्ताची पूजा संसारातील इच्छा अपेक्षा पूर्ण करण्या साठी केली जाते. हे समाज मानाच्या  विसंगतीचे  वास्तव आहे. तो आहे तसाच आहे समाज त्याला चुकीच्या पद्धतीने स्वीकारतो आहे असे दिसते. हे का? ह्याचे कारण मात्र कळत नाही. वास्तविक जो तो ज्याच्या त्याचं गुणानुसार पुजला जायला हवा पण तसे आपल्याकडे घडतांना दिसत नाही. हि विसंगतीच कदाचित सामाजिक विसंवादाचे कारण असू शकेल. हे म्हणजे ज्ञानेश्वर किंवा हनुमंताच्या नावाने बालान्तापानाचे  हॉस्पिटल  काढण्या  सारखे वाटते असो. आहे हे असे आहे. ओम शिवाय नमः तोच योग्य बुद्धी देवो.          
वृत्तींना मानवी रूपे देण्याचे नेमके का व कधी सुरु झाले हे इतिहास किंवा पुराणे  कुठेही नमूद करत नाहीत. पण त्याच बरोबर हे हि सत्य आहे कि सृष्टीच्या अस्तित्वासाठी सर्वच गुणांची सारखीच गरज आहे ह्या गोष्टीची जाणीव मात्र त्या कालच्या मानवी कल्पना करणाऱ्या मानवालाही होती ती आज लोप पावलेली दिसते. त्यामुळेच आज मात्र आपण त्या वृत्तींना उच्च नीच भेदाने स्वीकारतो. त्यातल्या त्यात उच्च नीच ठरवतो. आणि त्यामुळेच निसर्गाने देलेल्या देणगीचा  आपल्याला नीट वापर करता येत नाही.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ब - दुसरा प्रकार --- गुण --- २) राजस

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ब - दुसरा प्रकार --- गुण --- २) राजस
२) उ कार - रज - राजस - विष्णू ----- पालनकर्ता, पालन करणे म्हणजे जबाबदारी आली आणि जबाबदारी आली कि गांभीर्य आलच म्हणून गंभीर -------- पालन कर्त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांना राजसगुणी म्हणतात. देह, बुद्धी, मन, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, सर्वांचा विकास साधायचा हि जबाबदारी माणसावर आहे. त्यासाठी त्याच्या मनावर किती ताण येतो. स्वाभाविकच मनाला गांभीर्य येते. मग विश्व चालवणाऱ्या त्या परमेश्वरावर केव्हढी जबाबदारी असेल? आणि तो किती गंभीर असायला हवा. तसा तो नसेल तर आजच्या आपल्या राज्या/देशासारखी पूर्ण विश्वाची काय अवस्था होईल??? हि कल्पना आपण सहज करू शकाल. तरीही तो त्याचे नियम सोडत नाही. म्हणूनच त्याला कृपाळू म्हणतात. माणूस स्वतःचे कर्तव्य पालन करतांना पदोपदी त्याला एक जाणीव होते कि कुठे तरी त्याच्या भौतिक क्षमतेला मर्यादा येतात. १)आपले कर्तृत्व बजावतांना आपण कितीही काटेकोरपणे वागायचे ताराविले तरी कुठे तरी कमी पडतो ह्याची सुप्त जाणीव २)बुद्दीच्याही  पलीकडे  असे काही तरी आहे कि जे  आपल्यावर  कार्य करत आहे. ह्यातूनच आपल्यावर स्वामित्व गाजविणाऱ्या त्या अनोळखी शक्तीचे मोत्ठेपण आणि स्वतःचे कमीपण जाणवते. ३)हि वास्तवता स्वीकारूनच माणूस त्याला कळत  नकळत  शरण जातो. त्याला मोत्ठेपण बहाल करतो हेच अंतिम देवत्व होय. त्याच्याकडे मागणे मागायला लागतो. हि देवत्वामागची खरी-खुरी  पाहिली भावना दिसते. म्हणून ह्या पालन कर्त्या विष्णूला देव म्हणून आपल्याकडील समाज मानाने जास्ती स्वीकारलेले दिसते. ह्या पालन कर्त्या देवाला मात्र आपल्या समाजाने प्राधान्याने स्वीकारलेले दिसते. ४) पालन करण्याबरोबरच त्या देवा कडून संरक्षणाची अपेक्षा मानवाला असते. ५) तो जर प्रचंड सामर्थ्यशाली आहे, तर तो आपल्या गरजेला उपयोगी सुद्धा पडू शकेल, ह्या जाणीवेतून त्याच्या कडे माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी साहाय्य करावे, अशी प्रार्थना करायला हि विसरत नाही. 

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-अ - दुसरा प्रकार --- गुण --- १) सत्व (पहिला गुण)

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-अ - दुसरा प्रकार --- गुण --- १) सत्व (पहिला गुण)
गुण म्हणजेच वृत्ती --- १) सात्विक २) राजसी ३) तामसी ---  त्यांचे मानवाने कल्पिलेले दृष्य स्वरूप ब्रम्हा - विष्णू - महेश. 
ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना आपल्या सर्वांना परिचित आहेत ह्या मागच्या संकल्पनांचा आता विचार करू. ह्या दुसर्या प्रकारात वृतींचा विचार केलेला दिसतो, आणि त्या वृत्तींनाच देव मानले आहे असे जाणवते. अर्थात देवत्व देतांना त्यांना देह-रूप मानवी-स्वरूप द्यायला मानव 
विसरला नाही.   
१) अ कार  - सत्त्व - सात्विक - ब्रम्हा ----- निर्मिणारा, निर्मितीचा आनंद मिळाल्यामुळे सदा प्रसन्न राहणारा  सत्वगुणी. ह्या गुणालाच देव मानले. ह्याचे देह स्वरूप ब्रम्हदेव. पारमार्थिक दृष्ट्या माणसाने आपली वृत्ती तमसा कडून सत्विक्तेकडे नेणे हे अत्यंत महत्वाचे  आहे.  असे  जर आहे, तर समाजात ब्राम्हाची आराधना प्रधान असायला हवी. पण सामाजिक दृष्ट्या ह्या देवाची पूजा मात्र आपल्याला समाजात फारशी होत असलेली दिसत नाही. त्याचे प्रमाण अत्त्यल्प आहे. ह्याचाच अर्थ आम्हाला ह्या भावाचे --- सात्विकतेचे महत्व वाटत नाही !!असे म्हटले  तर  चुकीचे  होणार नाही!! सात्विकता नको म्हणजे त्याग नको, म्हणजे निस्वार्थी पणा नको. हे आजच्या आपल्या समाज मनाचे  वास्तव आहे. म्हणजे देवत्वाचा स्वीकार माणूस त्याच्या अपेक्षा/इच्छा/वासना ह्यांना पूरक असेल त्याचा देव म्हणून करतो. ह्यातून त्याचा उपयुक्तता वादी विचार स्पष्ट  होतो, असेही दिसते. अनेकेश्वर प्रकारातून हे सिद्ध होते कि माणूस सोयीने आपल्या उपयोगी असलेल्या गोष्टीला देव मानत आलेला दिसतो. मग जर मी सत्विकतेकडे  धुकूनही  बघत नाही. तर माझा  ईश्वराचा ध्यास दिखावू आहे? हे केवळ नाटक आहे?? असो पण वास्तव - आहे हे असे आहे. तरीही आपल्या सर्वानमद्ध्ये सात्विक वृत्ती उदय पावो हि सदिच्छा व्यक्त करतो. कि जे आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्याही  हिताची आहे.  

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ह - पहिला प्रकार ओमकार - ओमकार पूर्ण

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ह - पहिला प्रकार ओमकार -  ओमकार पूर्ण  
ओमकार हि पाहिली देवत्वाची कल्पना आहे. आत्ता पर्यंतच्या विवेचनावरून लक्षात येईल कि प्रथम देवत्व हे ओम्काराला का दिले गेले आहे. उच्चार, ध्वनी,  भावना, विचार, ज्ञान, शक्ती, ह्या सर्व गोष्टी ज्या एकाच एक शब्दात  समाविष्ट झालेल्या आहेत, असा हा शब्द  असल्याने  स्वाभाविकच ह्याला प्रथम स्थान दिले गेलेले आहे असे दिसते. परंतु सर्वसामान्य माणसाच्या मनाला अव्यक्तावर म्हणजेच सुक्ष्मावर आपले  मन एकाग्र कारणे अवघड जाते. ह्याच एका कारणाने हिंदू धर्मात ध्यानासाठी जड, - देह-रूप अथवा मानव-स्वरूप स्वीकारण्याची पद्धत  आलेली  दिसते. ह्यातूनच  मुर्तीपुजेची  संकल्पना रूढ  झालेली  दिसते. म्हणजे अव्यक्त अशा ओमकार शब्दाला अनुरूप असे जड रूप देवून त्याला ध्यानाचे साधन - ध्येय बनवण्यात आले. अशी आहे हि पाहिली देवत्व कल्पना. त्याचे  रूपही  त्याच्या सारखेच  अव्यक्त असे कल्पिले गेले. ओमकार,  गणेश, गजानन, गणपती १४  विद्या  आणि ६४ कलांचा स्वामी. त्याला वंदन  करून  आज  देवत्वाचा  पहिला प्रकार पूर्ण करतो.          

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ग - पहिला प्रकार ओमकार - ओम्काराला साधार्मी शब्द संकल्पना.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ग - पहिला प्रकार ओमकार -  ओम्काराला साधार्मी शब्द संकल्पना. 
वास्तविक ओम्काराला प्रतिशब्द नाही. पण आपल्याकडे देव देवता अनेक आहेत. जपासाठी राम हा शब्द प्राधान्याने वापरला जातो कारण  आता राम ह्या शब्दाचे ओम्कारशी साधर्म्य काय ते पाहू. राम ह्या शब्दाचा उच्चार अ च्या जागी - र+आ  -उ च्या जागी - आ - म च्या जागी म अशा प्रकारे होतो. याचा उच्चार हि ओम्कार समान आहे. ओम्कारात कंठस्थ, तालव्य, व ओष्ट्य अशी तीन अक्षरे आहेत ती  उच्चारतांना जीभ लागत नाही. इथे मात्र र शब्दासाठी जिभेचा वापर करावा लागतो. र करामुळे शब्दाला जोर येतो. असे  उच्चार  शास्त्राचा  विचार करतांना लक्षात येते. ह्याही पुढे जावून आधुनिक विचारांच्या काही लोकांचे   म्हणणे  आहे कि  ह्या राम शब्दा ऐवजी र्हीम म्हटले कि त्यातील र ला अकरा ऐवजी इकार व हकार जोडून म्हटला तर त्या मुळे होणाऱ्या आघातामुळे मूळ मन्त्र अधिक प्रभावी होतो. आणखीन  पुढे जाऊन विचार केला, कि असे लक्षात येते, कि, र्हीम शब्द  रहीम शब्दाच्या जवळ जातो. ओम - राम - र्हीम - रहीम.  अर्थात हे इतर शब्द हे अनेकेश्वर देवत्वाच्या  कल्पनेतून आले मूळ  अ - उ - म ----- ओम हा अव्यक्ताचे प्रतिक आहे. म्हणूनच हा आद्य व अंतिम मूलमंत्र आहे. ह्याचे चिंतन करून आपण सर्व त्याच्या स्थुलरूप पार्थिव महागणपतीची साधना करूया शुभम भवतु.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-फ - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील नाद संकल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-फ  - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील नाद संकल्पना 
विश्वात व प्रत्येक सजीव देहात एक अखंड नाद चालू असतो असे म्हणतात. त्याला अनाहत नाद असे म्हणतात. अनाहत  म्हणजे  आघाताशिवाय सतत चालू असलेला ईश्वरी नाद. जो विश्वाच्या अस्तित्वाचा अखंड स्वर आहे. ह्याच्या जवळचा भौतिक उच्चार ओमकार. ओम्कारच का?  ह्या शब्द/अक्षराच्या उत्पात्तीमागील कार्य कारण मीमांसा. ------ बाहेरून आघात होतो. जसे नाद हा घंटे माद्ध्येच आहे. बाहेरून आघात केल्यावर तो आपल्याला ऐकू येतो इतकेच. तीच अवस्था कलेची, ज्ञानाची आणि प्रतिभेची. कला, ज्ञान आणि प्रतिभाही आतून बाहेर येते. ह्या ज्ञान, कला, प्रतिभा, सर्वच  गोष्टी लोककल्याणाला पूरक  आहेत. ओमकाराची उत्पत्तीहि आतून बाहेर होते. हे आपण पूर्वी पहिलेच आहे. आतून बाहेर येणारा, आणि तो हि  अखंड  राहू शकणारा.  अनंत, न संपणारा (अन एंडिंग) असा हा एकाच शब्द/अक्षर आहे. म्हणून ह्याचे अनाहत नादाशी साधर्म्य आहे.  हा शब्द/अक्षर पवित्र आहे कारण फक्त आतून बाहेर येणारा,  फक्त  देणारा,  त्यागी.  अपेक्षा विरहिततेचे प्रतिक. म्हणूनच  हा सिद्ध मन्त्र हि आहे. म्हटले तर तीन अक्षरे पण उच्चार एकच म्हणून हा एकाक्षर मंत्र होतो आपल्याकडे राजयोगाच्या साधनेसाठी प्राधान्याने उपयोगात आणला जातो. 

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ई - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील विचार/इच्छा शक्तीची संकल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ई - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील विचार/इच्छा शक्तीची संकल्पना 
प्रत्येक शक्ती हे एक पूर्ण वर्तुळ असते ती जिथून सुरु होते तिथेच येऊन परत मिळते तेव्हाच तिचा परिणाम व्यक्त होतो. हा भौतिक विज्ञानाचा सर्वांना माहित असलेला गुणधर्म आहे.  उदाहरणार्थ वीज. हेच तत्व विचारलाहि लागू होते.  विचार /व/ इच्छा हि सुद्धा अशीच एक शक्ती आहे कि ती जिथून सुरु होते इथेच परत येते.  हा भौतिकाचा नियम आहे. म्हणजेच  माझ्यापर्यंत बाहेरून आलेले प्रत्येक विचार हे मुळात माझेच आहेत. म्हणजेच माझा कोणी त्वेष करत असेल तर तो मुळात मीच करत आहे आणि नंतर तोच फिरून माझ्याकडे येत आहे. ह्याच कारणाने स्वतःचे चांगले करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याचे चागले चिंतने. हि संकल्पना अंतर्बाह्य साकार करणारा शब्द म्हणजे ओमकार. ओमकार हे हि एक पूर्ण वर्तुळ आहे. अ ते उ आतून निर्माण होवून बाहेर जावून पुन्हा उत्पत्ती ठिकाणी येवून संपणारे. आतून बाहेर येणारा, सदिच्छा दर्शक आणि म्हणूनच पवित्र. 

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ड - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील वृत्ती संकल्पना

 ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ड - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील वृत्ती संकल्पना 
अ कार - निर्मिती - आनंद - सात्विक वृत्ती. कोणतीही व्यक्ती ज्या वेळी निर्मिती करते त्या वेळी तिची वृत्ती स्वाभाविक पणे सात्विक असते. गंभीर किंवा रागावलेल्या अवस्थेत निर्मिती होत नाही. आकार हा सात्विकतेचे प्रतिक आहे.      
उ कार - पालन करता, रक्षण करता - गंभीर - राजस वृत्ती. कोणत्याही व्यक्तीवर  जबाबदारी आली कि  जबाबदारीने  काम करतांना सहज गांभीर्य हे येतेच. त्याचा बरोबर कर्तृत्वाचा सार्थ अहंकारही असतो. कारण त्यामागे कर्तेपणाची कर्तृत्वाची जाणीव असते. ह्यालाच राजस वृत्ती म्हणतात. उकार हा राजस वृत्तीचे प्रतिक आहे.     
म कार - अंत, नाश - रागीट - तामस वृत्ती. राग आल्यावर माणसाला समोरचे बरोबर आहे का चूक आहे हे पाहण्याचे भान राहत नाही. राग हा सर्व काही जाळून टाकतो. म्हणून हा तामसी वृत्तीचे प्रतिक आहे. 
परमार्थात सत्व गुणाला विशेष महत्व आहे .कारण तो आदी आहे. म्हणजेच ईश्वरा पासून सुरु झालेला. म्हणून  अर्थातच  त्याच्या सर्वात जवळचा.   राजस हा मद्ध्य आहे तर तामस हि अंत आहे. म्हणूनच आपण त्या ईश्वराच्या जवळ जायचे तर आपल्यात त्याच्या सर्वात जवळचा सत्त्व गुण अत्यावश्यक आहे. पण इथे मात्र  तीनही गुणांनी युक्त असा, तीनही गुणांना सामावून घेणारा, असा ओम हा एकमेव एकाक्षरी शब्द आहे. कारण विश्व चालायचे असेल किंवा चालवायचे असेल तर एकच एक गुण असून चालणारच नाही. सर्व गुण हवेतच. म्हणून सर्व गुणांनी उक्त असून समतोल ढळू न देणारा असा हा ओमकार हा समतोल शब्द आहे, म्हणूनच सिद्ध मंत्रहि आहे.  

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-क - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील भाव संकल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-क - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील भाव संकल्पना 
आकाराची उत्पत्ती कंठात होते. पहिला सहज स्वर. हा प्रथम निर्मिती दर्शक   आनंद हा त्याचा सहज भाव आहे. स्वरच कशाला पण एखादा माणूस जेव्हा कोणतीही नवनिर्मिती करतो, किंवा त्याच्या संशोधनातून जेव्हा त्याला काही नवीन गवसते तेव्हा त्यालाही असाच आनंद होतो. उत्पत्ती म्हणजेच निर्मिती. निर्मितीचा आनंद तोच ब्रम्हानंद. जब हम  पैदा हुवे जग हसे हम रोये - कबीर  
उकराची उत्पत्ती तोंडाच्या माद्ध्यात होते. तो आदीही नाही आणि अंत हि नाही. हा स्वर स्वाभाविकच गंभीर असतो. स्थिरतेचे प्रतिक. हा स्थिरतेचे प्रतिक आहे. पण हि स्थिरता राखण्यासाठी जपण्यासाठी जी काळजी घ्यावी लागते त्यामुळे गांभीर्य येते. आपल्यावर जेव्हा एखाद्या कार्याची जबाबदारी असते तेव्हा आपल्यातही गंभीर भाव  येतो.   स्थिती म्हणजेच गांभीर्य, तोच विष्णू हा पालनकर्ता म्हणून गांभीर्य हा त्याचा प्रमुख भाव आहे.   
मकाराची उत्पत्ती ओठावर होते ओम्कारातील शेवटचे अक्षर/ध्वनी अंत. एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर राग यावा लागतो. राग सर्व काही जाळून टाकतो. सर्व काही नष्ट करण्यास प्रवृत्त करतो. तोच शंकर - राग हा त्याचा भाव आहे.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २ - अ - पहिला प्रकार - ओमकार-प्रस्तावना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २ - अ - पहिला प्रकार - ओमकार-प्रस्तावना
श्री गणेशाला वंदन करून मला जे जाणवले ते मी आपल्या समोर मांडत आहे. आपल्या सर्वांना तो सिद्धी विनायक प्रसन्न होऊदे हीच त्याच्या चरणी प्रार्थना. 
श्री गणेश ओंकार ----- ओंकारामधील ध्वनी / उच्चार / भाषा शास्त्राची माहिती आपण विचारात घेणार आहोत. जे पूर्ण पणे भौतीकावर आधारित असूनही साधनेचे मूळ आहे. भौतिक आणि सूक्ष्म ह्यांना जोडणारा हा अत्युत्तम दुवा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून ह्याला पर्यायी शब्द इतर कोणत्याही भाषेत, जातीत, किंवा धर्मात, कुठेही नाही.
हे समजून घेण्यासाठी थोड्या प्रस्तावानेची गरज आहे. प्रथम हे लक्षात घ्या कि जगातील फक्त भारतीय भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या आहेत, बाकी कोणत्याही देशातील भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या नाहीत. त्यामुळे उच्चारातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक ध्वनीला, आपल्या लिपीत स्वतंत्र अक्षर आहे. आपल्याकडील मुळाक्षरे हीच मुळात उच्चार/ध्वनी शास्त्रावर आधारित आहेत. म्हणजे १)ओष्ठ, २)दंतव्य, ३)मुर्घ्न्य, ४)तालव्य, आणि ५)कंठ्य ह्या पैकी तोंडात ज्या ठिकाणी स्वरांची निर्मिती होते त्या प्रमाणे त्या त्या प्रकारच्या अक्षरांचे गट केलेले आहेत. शिवाय अनुनासिक आहेत. आणि ह्या सर्वांवर स्वरांचे लेणे आहे ते म्हणजे बाराखडी अ ते अः मुख्य ५ स्वर अ, ई, उ, ए, ओ. व एकूण १२ स्वर प्रत्येक व्यंजन स्वरासाहित उच्चारले जातात. ----- ओमकार हाहि पूर्ण ध्वनी शास्त्रावर आधारलेला शब्द आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ओमकाराचा उच्चार करायला जिभेची गरज लागत नाही. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------  
०८/०६/२०१२ च्या ओमकार प्रस्तावना मद्ध्ये  ओष्ठ्य, तालव्य, मुर्घ्न्य, आणि  कंठ्य हे चार, उच्चार शास्त्रानुसार, अक्षरांचे प्रकार दिले आहेत त्यात --- !!! दंतव्य !!!--- हा एक प्रकार द्यायचा राहून गेला आहे तो इथे नमूद करतो,  मूळ  लिखाणात  हि  सुधारणा केलेली आहे. म्हणजे ई-बुक स्वरुपात देतांना पाच प्रकार दिलेले आहेत ह्याची कृपया नोंद घायवी  ---------------------------------------------------------- 
ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ब - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील ध्वनी शास्त्र - आकार-उकार-मकार 
ध्वनीचा आपल्या शरीरवर,  मनावर, तातडीने  परिणाम होतो.  त्यामुळे ध्वनीला आपल्या परमार्थ शास्त्रात फार महत्व आहे. ध्वनिपासून निर्माण होणारे भौतिकातील शास्त्र म्हणजे संगीत शास्त्र. स्वामी विवेकानंद म्हणत संगीत हा परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. 
अकाराची उत्पत्ती कंठात होते. तो स्वर मोकळा असतो. ऐकून प्रसन्न वाटते.  निर्मिती चे प्रतिक. सात्विक वृत्ती. प्रसन्नता. चांगल्या गायकाच्या तोंडून आपण असा चांगला लागलेला, स्थिर, स्वर ऐकलात, तर गाणारयाला आणि ऐकणाऱ्याला स्वाभाविकच अत्यंत आनंद होतो. प्रसन्नता वाटते.   
उकराची उत्पत्ती तोंडाच्या माद्ध्यात होते. तो आदीही नाही आणि अंतही नाही. हा स्थिरावायला  विशेष  काळजी  घ्यावी लागते, कष्ट पडतात, अर्थातच गांभीर्य येते. गाणाऱ्याचा  भाव ऐकणार्याला जाणवतो.  धीर-गंभीर.     
 मकाराची उत्पत्ती हि ओठांवर आहे. मकार हे व्यंजन आहे - संपणारा स्वर. सर्वकाही संपल्याचे, नाशाचे प्रतिक. म्हणून उग्र राग, तामस. तरीही अ उ म हे एकत्रित म्हणताना, मकार हा निव्वळ व्यंजन रुपात न उच्चारता स्वरासाहित उच्चारला  जातो, त्यामुळे त्यातूनच पुन्हा स्वाभाविक आकार निर्माण होतो, आणि एक अखंड  चक्र आपण स्वेच्छेने चालू ठेवू शकतो.  --------------------------------------------------------------------------------------- 

देवत्वाच्या कल्पना

माझ्या सर्व मित्रांस व वाचकांस नमस्कार आजपासून हा नवीन विषय सुरु करत आहे. नेहमी प्रमाणे पूर्ण झाल्यावर तो ई-बुक स्वरुपात सदर केला जाईल   
ईश्वर / देवत्व कल्पना ----- १ - विविध कल्पना  
 
आपल्याकडे देवत्वाच्या ५ प्रकारच्या कल्पना आहेत. कल्पना असे मी अशासाठी म्हणतो, जो पर्यंत आपल्याला  एखादी गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत आपल्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी तरी ती कल्पना आहे. 
पहिला प्रकार ----- ओंकार --- आकार, उकार, मकार --- पहिला एकाक्षरी शब्द - त्याचे काल्पनिक दृश स्वरूप गणपती. 
दुसरा प्रकार ------ गुण --- १) सत्व २) राजस ३) तामस --- म्हणजेच वृत्ती --- १) सात्विक २) राजसी ३) तामसी ---  त्यांचे काल्पनिक दृष्य स्वरूप ब्रम्हा - विष्णू - महेश.  
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- १)पृथ्वी २) आप (पाणी) ३) तेज ४) वायू ५) आकाश. मी थोडा क्रम वेगळा देतो १) पृथ्वी २) आप (पाणी) ३) वायू ४) तेज ५) आकाश ह्या सर्वांचे काल्पनिक देवता चित्र अथवा  मूर्ती आपल्या  कडे अस्तित्वात  आहेत.  त्यांचे गुण पृथ्वीचा गंध - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय नाक, पाण्याचा गुण रस (चव) - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय  जीभ, वायूचा गुण स्पर्श - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय त्वचा, तेजाचा गुण दृष्य - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय डोळे, आकाशाचा गुण शब्द - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय कान.    
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवाद --- म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, --- ४) नारसिंह, ---
५) वामन, --- ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, ---  ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)(कल्की)
पाचवा प्रकार ----- युगपुरुष ----- महान पुरुष ----- कालपरत्वे समाजाला लाभलेले विविध प्रकारचे नेते. उत्क्रांतीवादाच्या मधील दशावतारांपैकी शेवटचे २ --- ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण,(कलंकी सोडून)  हे ह्याच प्रकारतहि येतात. ----------------------------------------------------------------------------------