Wednesday, 8 August 2012

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ग - पहिला प्रकार ओमकार - ओम्काराला साधार्मी शब्द संकल्पना.

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ग - पहिला प्रकार ओमकार -  ओम्काराला साधार्मी शब्द संकल्पना. 
वास्तविक ओम्काराला प्रतिशब्द नाही. पण आपल्याकडे देव देवता अनेक आहेत. जपासाठी राम हा शब्द प्राधान्याने वापरला जातो कारण  आता राम ह्या शब्दाचे ओम्कारशी साधर्म्य काय ते पाहू. राम ह्या शब्दाचा उच्चार अ च्या जागी - र+आ  -उ च्या जागी - आ - म च्या जागी म अशा प्रकारे होतो. याचा उच्चार हि ओम्कार समान आहे. ओम्कारात कंठस्थ, तालव्य, व ओष्ट्य अशी तीन अक्षरे आहेत ती  उच्चारतांना जीभ लागत नाही. इथे मात्र र शब्दासाठी जिभेचा वापर करावा लागतो. र करामुळे शब्दाला जोर येतो. असे  उच्चार  शास्त्राचा  विचार करतांना लक्षात येते. ह्याही पुढे जावून आधुनिक विचारांच्या काही लोकांचे   म्हणणे  आहे कि  ह्या राम शब्दा ऐवजी र्हीम म्हटले कि त्यातील र ला अकरा ऐवजी इकार व हकार जोडून म्हटला तर त्या मुळे होणाऱ्या आघातामुळे मूळ मन्त्र अधिक प्रभावी होतो. आणखीन  पुढे जाऊन विचार केला, कि असे लक्षात येते, कि, र्हीम शब्द  रहीम शब्दाच्या जवळ जातो. ओम - राम - र्हीम - रहीम.  अर्थात हे इतर शब्द हे अनेकेश्वर देवत्वाच्या  कल्पनेतून आले मूळ  अ - उ - म ----- ओम हा अव्यक्ताचे प्रतिक आहे. म्हणूनच हा आद्य व अंतिम मूलमंत्र आहे. ह्याचे चिंतन करून आपण सर्व त्याच्या स्थुलरूप पार्थिव महागणपतीची साधना करूया शुभम भवतु.

No comments:

Post a Comment