मद्ध्ये पंच महाभूते हा एक प्रकार चुकून लिहायचा राहून गेला तो आता लिहितो आहे.
ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३इ - तिसरा प्रकार --- पंच महा भुते तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- १)पृथ्वी २) आप (पाणी) ३) तेज ४) वायू ५) आकाश. मी थोडा क्रम वेगळा देतो १) पृथ्वी २) आप (पाणी) ३) वायू ४) तेज ५) आकाश
ह्या नंतरचा कालखंड असा दिसतो कि मानवाने पंच महाभूतांना देव मानले आहे. हे देवत्व देतांना तो त्यांना मानव रूप देण्याचे विसरला नाही. सूर्यदेव, वरुणदेव, वायुदेव, वगैरे. ह्या काळात मानवाची बौद्धिक प्रगती फारशी झालेली दिसत नाही. त्यामुळे ह्या शक्ती भौतिक अथवा नैसर्गिक कारणाने विकृत स्वरुपात प्रकट झाल्यास, त्यांच्या बद्दल मानवी मनात भीती असल्याचे जाणवते आणि त्यांचा कोप होतो अशा प्रकारची मानवाची धारणा दिसते. म्हणजे शक्तीने आपल्या पेक्षा प्रचंड असलेल्या ह्या पंच महा भूतान पुढे आपण पराधीन आहोत. आणि त्यांना कधीही दुखावता कामा नये. दुखावल्यास ते आपल्याला त्रास देतील म्हणजेच त्यांचा को प होईल हि भावना दिसते. आपल्या त्यांच्या पेक्षा लहान पणाची, कमीपणाची, कमी शक्तीची जाणीव त्यांना देवत्व देवून जाते असे दिसते. म्हणजे देवत्व मानण्याच्या करणान मद्ध्ये हे हि एक कारण आहे असे दिसते.
No comments:
Post a Comment