Wednesday, 8 August 2012

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ब - दुसरा प्रकार --- गुण --- २) राजस

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-ब - दुसरा प्रकार --- गुण --- २) राजस
२) उ कार - रज - राजस - विष्णू ----- पालनकर्ता, पालन करणे म्हणजे जबाबदारी आली आणि जबाबदारी आली कि गांभीर्य आलच म्हणून गंभीर -------- पालन कर्त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांना राजसगुणी म्हणतात. देह, बुद्धी, मन, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, सर्वांचा विकास साधायचा हि जबाबदारी माणसावर आहे. त्यासाठी त्याच्या मनावर किती ताण येतो. स्वाभाविकच मनाला गांभीर्य येते. मग विश्व चालवणाऱ्या त्या परमेश्वरावर केव्हढी जबाबदारी असेल? आणि तो किती गंभीर असायला हवा. तसा तो नसेल तर आजच्या आपल्या राज्या/देशासारखी पूर्ण विश्वाची काय अवस्था होईल??? हि कल्पना आपण सहज करू शकाल. तरीही तो त्याचे नियम सोडत नाही. म्हणूनच त्याला कृपाळू म्हणतात. माणूस स्वतःचे कर्तव्य पालन करतांना पदोपदी त्याला एक जाणीव होते कि कुठे तरी त्याच्या भौतिक क्षमतेला मर्यादा येतात. १)आपले कर्तृत्व बजावतांना आपण कितीही काटेकोरपणे वागायचे ताराविले तरी कुठे तरी कमी पडतो ह्याची सुप्त जाणीव २)बुद्दीच्याही  पलीकडे  असे काही तरी आहे कि जे  आपल्यावर  कार्य करत आहे. ह्यातूनच आपल्यावर स्वामित्व गाजविणाऱ्या त्या अनोळखी शक्तीचे मोत्ठेपण आणि स्वतःचे कमीपण जाणवते. ३)हि वास्तवता स्वीकारूनच माणूस त्याला कळत  नकळत  शरण जातो. त्याला मोत्ठेपण बहाल करतो हेच अंतिम देवत्व होय. त्याच्याकडे मागणे मागायला लागतो. हि देवत्वामागची खरी-खुरी  पाहिली भावना दिसते. म्हणून ह्या पालन कर्त्या विष्णूला देव म्हणून आपल्याकडील समाज मानाने जास्ती स्वीकारलेले दिसते. ह्या पालन कर्त्या देवाला मात्र आपल्या समाजाने प्राधान्याने स्वीकारलेले दिसते. ४) पालन करण्याबरोबरच त्या देवा कडून संरक्षणाची अपेक्षा मानवाला असते. ५) तो जर प्रचंड सामर्थ्यशाली आहे, तर तो आपल्या गरजेला उपयोगी सुद्धा पडू शकेल, ह्या जाणीवेतून त्याच्या कडे माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी साहाय्य करावे, अशी प्रार्थना करायला हि विसरत नाही. 

No comments:

Post a Comment