ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-अ - दुसरा प्रकार --- गुण --- १) सत्व (पहिला गुण)
गुण म्हणजेच वृत्ती --- १) सात्विक २) राजसी ३) तामसी --- त्यांचे मानवाने कल्पिलेले दृष्य स्वरूप ब्रम्हा - विष्णू - महेश.
ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना आपल्या सर्वांना परिचित आहेत ह्या मागच्या संकल्पनांचा आता विचार करू. ह्या दुसर्या प्रकारात वृतींचा विचार केलेला दिसतो, आणि त्या वृत्तींनाच देव मानले आहे असे जाणवते. अर्थात देवत्व देतांना त्यांना देह-रूप मानवी-स्वरूप द्यायला मानव
विसरला नाही.
१) अ कार - सत्त्व - सात्विक - ब्रम्हा ----- निर्मिणारा, निर् मितीचा आनंद मिळाल्यामुळे सदा प्रसन्न राहणारा सत्वगुणी. ह्या गुणालाच देव मानले. ह्याचे देह स्वरूप ब्रम्हदेव. पारमार्थिक दृष्ट्या माणसाने आपली वृत्ती तमसा कडून सत्विक् तेकडे नेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. असे जर आहे, तर समाजात ब्राम्हाची आराधना प्रधा न असायला हवी. पण सामाजिक दृष्ट्या ह्या देवाची पूजा मात्र आपल्याला समाजात फारशी होत असलेली दिसत नाही. त्याचे प्रमाण अत्त्यल्प आहे. ह्याचाच अर्थ आम्हाला ह्या भावाचे --- सात्विकतेचे महत्व वाटत नाही !!असे म्हटले तर चुकीचे होणार नाही!! सात्विकता नको म्हणजे त्याग नको, म्हणजे निस्वार्थी पणा नको. हे आजच्या आपल्या समाज मनाचे वास्तव आहे. म्हणजे देवत्वाचा स्वीकार माणूस त्याच्या अपेक्षा/इच्छा/वासना ह्यांना पू रक असेल त्याचा देव म्हणून करतो . ह्यातून त्याचा उपयुक्तता वा दी विचार स्पष्ट होतो, असेही दिसते. अनेकेश्वर प्रकारातून हे सिद्ध होते कि माणूस सोयीने आपल्या उपयोगी असलेल्या गोष्टीला देव मानत आलेला दिसतो. मग जर मी सत्विकतेकडे धुकूनही बघत नाही. तर माझा ईश्वराचा ध्यास दिखावू आहे? हे केवळ नाटक आहे?? असो पण वास्तव - आहे हे असे आहे. तरीही आपल्या सर्वानमद्ध्ये सात्विक वृत्ती उदय पावो हि सदिच्छा व्यक्त करतो. कि जे आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्याही हिताची आहे.
No comments:
Post a Comment