ईश्वर / देवत्व कल्पना ---- २ - अ - पहिला प्रकार - ओमकार-प्रस्तावना
श्री गणेशाला वंदन करून मला जे जाणवले ते मी आपल्या समोर मांडत आहे. आपल्या सर्वांना तो सिद्धी विनायक प्रसन्न होऊदे हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
श्री गणेश ओंकार ----- ओंकारामधील ध्वनी / उच्चार / भाषा शास्त्राची माहिती आपण विचारात घेणार आहोत. जे पूर्ण पणे भौतीकावर आधारित असूनही साधनेचे मूळ आहे. भौतिक आणि सूक्ष्म ह्यांना जोडणारा हा अत्युत्तम दुवा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून ह्याला पर्यायी शब्द इतर कोणत्याही भाषेत, जातीत, किंवा धर्मात, कुठेही नाही.
हे समजून घेण्यासाठी थोड्या प्रस्तावानेची गरज आहे. प्रथम हे लक्षात घ्या कि जगातील फक्त भारतीय भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या आहेत, बाकी कोणत्याही देशातील भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या नाहीत. त्यामुळे उच्चारातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक ध्वनीला, आपल्या लिपीत स्वतंत्र अक्षर आहे. आपल्याकडील मुळाक्षरे हीच मुळात उच्चार/ध्वनी शास्त्रावर आधारित आहेत. म्हणजे १)ओष्ठ, २)दंतव्य, ३)मुर्घ्न्य, ४)तालव्य, आणि ५)कंठ्य ह्या पैकी तोंडात ज्या ठिकाणी स्वरांची निर्मिती होते त्या प्रमाणे त्या त्या प्रकारच्या अक्षरांचे गट केलेले आहेत. शिवाय अनुनासिक आहेत. आणि ह्या सर्वांवर स्वरांचे लेणे आहे ते म्हणजे बाराखडी अ ते अः मुख्य ५ स्वर अ, ई, उ, ए, ओ. व एकूण १२ स्वर प्रत्येक व्यंजन स्वरासाहित उच्चारले जातात. ----- ओमकार हाहि पूर्ण ध्वनी शास्त्रावर आधारलेला शब्द आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ओमकाराचा उच्चार करायला जिभेची गरज लागत नाही. ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---
०८/०६/२०१२ च्या ओमकार प्रस्तावना मद्ध्ये ओष्ठ्य, तालव्य, मुर्घ्न्य, आणि कंठ्य हे चार, उच्चार शास्त्रानुसार, अक्षरां चे प्रकार दिले आहेत त्यात --- !!! दंतव्य !!!--- हा एक प्रकार द्यायचा राहून गेला आहे तो इथे नमूद करतो, मूळ लिखाणात हि सुधारणा केलेली आहे. म्हणजे ई-बुक स्वरुपात देतांना पाच प्रकार दिलेले आहेत ह्याची कृपया नोंद घायवी ------------ ------------------------------ ----------------
ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ब - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील ध्वनी शास्त्र - आकार-उकार-मकार
ध्वनीचा आपल्या शरीरवर, मनावर, तातडीने परिणाम होतो. त्यामुळे ध्वनीला आपल्या परमार्थ शास्त्रात फार महत्व आहे. ध्वनिपासून निर्माण होणारे भौतिकातील शास्त्र म्हणजे संगीत शास्त्र. स्वामी विवेकानंद म्हणत संगीत हा परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे.
अकाराची उत्पत्ती कंठात होते. तो स्वर मोकळा असतो. ऐकून प्रसन्न वाटते . निर्मिती चे प्रतिक. सात्विक वृत्ती. प्रसन्नता. चांगल्या गायकाच्या तोंडून आपण असा चांगला लागलेला, स्थिर, स्वर ऐकलात, तर गाणारयाला आणि ऐकणाऱ्याला स्वाभाविकच अत्यंत आनंद होतो. प्रसन्नता वाटते.
उकराची उत्पत्ती तोंडाच्या माद्ध्यात होते. तो आदीही नाही आणि अंतही नाही. हा स्थिरावायला विशेष काळजी घ्यावी लागते, कष्ट पडतात, अर्थातच गांभीर्य येते. गाणाऱ्याचा भाव ऐकणार्याला जा णवतो. धीर-गंभीर.
मकाराची उत्पत्ती हि ओठांवर आहे. मकार हे व्यंजन आहे - संपणारा स्वर. सर्वकाही संपल्याचे, नाशाचे प्रतिक. म्हणून उग्र राग, तामस. तरीही अ उ म हे एकत्रित म्हणताना, मकार हा निव्वळ व्यंजन रुपात न उच्चारता स्वरासाहित उच्चारला जातो, त्यामुळे त्यातूनच पुन्हा स्वाभाविक आकार निर्माण होतो, आणि एक अखंड चक्र आपण स्वेच्छेने चालू ठेवू शकतो. ----------------------- ------------------------------ ------------------------------ ----
No comments:
Post a Comment