ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ड - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील वृत्ती संकल्पना
अ कार - निर्मिती - आनंद - सात्विक वृत्ती. कोणतीही व्यक्ती ज्या वेळी निर्मिती करते त्या वेळी तिची वृत्ती स्वाभाविक पणे सात्विक असते. गंभीर किंवा रागावलेल्या अवस्थेत निर्मिती होत नाही. आकार हा सात्विकतेचे प्रतिक आहे.
उ कार - पालन करता, रक्षण करता - गंभीर - राजस वृत्ती. कोणत्याही व्यक्तीवर जबाबदारी आली कि जबाबदारीने काम करतांना सहज गांभीर्य हे येतेच. त्याचा बरोबर कर्तृत्वाचा सार्थ अहंका रही असतो. कारण त्यामागे कर्तेपणाची कर्तृत्वाची जाणीव असते. ह्यालाच राजस वृत्ती म्हणतात. उकार हा राजस वृत्तीचे प्रतिक आहे.
म कार - अंत, नाश - रागीट - तामस वृत्ती. राग आल्यावर माणसाला समोरचे बरोबर आहे का चूक आहे हे पाहण्याचे भान राहत नाही. राग हा सर्व काही जाळून टाकतो. म्हणून हा तामसी वृत्तीचे प्रतिक आहे.
परमार्थात सत्व गुणाला विशेष महत्व आहे .कारण तो आदी आहे. म्हणजेच ईश्वरा पासून सुरु झाले ला. म्हणून अर्थातच त्याच्या सर्वात जवळचा. राजस हा मद्ध्य आहे तर तामस हि अंत आहे. म्हणूनच आपण त्या ईश्वराच्या जवळ जायचे तर आपल्यात त्याच्या सर्वात जवळचा सत्त्व गुण अत्या वश्यक आहे. पण इथे मात्र तीनही गुणांनी युक्त असा, तीनही गुणांना सामावून घेणारा, असा ओम हा एकमेव एकाक्षरी शब्द आहे. कारण विश्व चालायचे असेल किंवा चालवायचे असेल तर एकच एक गुण असून चालणारच नाही. सर्व गुण हवेतच. म्हणून सर्व गुणांनी उक्त असून समतोल ढळू न देणारा असा हा ओमकार हा समतोल शब्द आहे, म्हणूनच सिद्ध मंत्रहि आहे.
No comments:
Post a Comment