Wednesday, 8 August 2012

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ह - पहिला प्रकार ओमकार - ओमकार पूर्ण

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ह - पहिला प्रकार ओमकार -  ओमकार पूर्ण  
ओमकार हि पाहिली देवत्वाची कल्पना आहे. आत्ता पर्यंतच्या विवेचनावरून लक्षात येईल कि प्रथम देवत्व हे ओम्काराला का दिले गेले आहे. उच्चार, ध्वनी,  भावना, विचार, ज्ञान, शक्ती, ह्या सर्व गोष्टी ज्या एकाच एक शब्दात  समाविष्ट झालेल्या आहेत, असा हा शब्द  असल्याने  स्वाभाविकच ह्याला प्रथम स्थान दिले गेलेले आहे असे दिसते. परंतु सर्वसामान्य माणसाच्या मनाला अव्यक्तावर म्हणजेच सुक्ष्मावर आपले  मन एकाग्र कारणे अवघड जाते. ह्याच एका कारणाने हिंदू धर्मात ध्यानासाठी जड, - देह-रूप अथवा मानव-स्वरूप स्वीकारण्याची पद्धत  आलेली  दिसते. ह्यातूनच  मुर्तीपुजेची  संकल्पना रूढ  झालेली  दिसते. म्हणजे अव्यक्त अशा ओमकार शब्दाला अनुरूप असे जड रूप देवून त्याला ध्यानाचे साधन - ध्येय बनवण्यात आले. अशी आहे हि पाहिली देवत्व कल्पना. त्याचे  रूपही  त्याच्या सारखेच  अव्यक्त असे कल्पिले गेले. ओमकार,  गणेश, गजानन, गणपती १४  विद्या  आणि ६४ कलांचा स्वामी. त्याला वंदन  करून  आज  देवत्वाचा  पहिला प्रकार पूर्ण करतो.          

No comments:

Post a Comment