Wednesday, 8 August 2012

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-फ - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील नाद संकल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-फ  - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील नाद संकल्पना 
विश्वात व प्रत्येक सजीव देहात एक अखंड नाद चालू असतो असे म्हणतात. त्याला अनाहत नाद असे म्हणतात. अनाहत  म्हणजे  आघाताशिवाय सतत चालू असलेला ईश्वरी नाद. जो विश्वाच्या अस्तित्वाचा अखंड स्वर आहे. ह्याच्या जवळचा भौतिक उच्चार ओमकार. ओम्कारच का?  ह्या शब्द/अक्षराच्या उत्पात्तीमागील कार्य कारण मीमांसा. ------ बाहेरून आघात होतो. जसे नाद हा घंटे माद्ध्येच आहे. बाहेरून आघात केल्यावर तो आपल्याला ऐकू येतो इतकेच. तीच अवस्था कलेची, ज्ञानाची आणि प्रतिभेची. कला, ज्ञान आणि प्रतिभाही आतून बाहेर येते. ह्या ज्ञान, कला, प्रतिभा, सर्वच  गोष्टी लोककल्याणाला पूरक  आहेत. ओमकाराची उत्पत्तीहि आतून बाहेर होते. हे आपण पूर्वी पहिलेच आहे. आतून बाहेर येणारा, आणि तो हि  अखंड  राहू शकणारा.  अनंत, न संपणारा (अन एंडिंग) असा हा एकाच शब्द/अक्षर आहे. म्हणून ह्याचे अनाहत नादाशी साधर्म्य आहे.  हा शब्द/अक्षर पवित्र आहे कारण फक्त आतून बाहेर येणारा,  फक्त  देणारा,  त्यागी.  अपेक्षा विरहिततेचे प्रतिक. म्हणूनच  हा सिद्ध मन्त्र हि आहे. म्हटले तर तीन अक्षरे पण उच्चार एकच म्हणून हा एकाक्षर मंत्र होतो आपल्याकडे राजयोगाच्या साधनेसाठी प्राधान्याने उपयोगात आणला जातो. 

No comments:

Post a Comment