Wednesday, 8 August 2012

देवत्व कल्पना समारोप

देवत्व कल्पना समारोप
आत्ता पर्यंत आपण देवत्वाच्या विविध कल्पना पहिल्या. त्यातून आपल्याला असे लक्ष्यात येईल कि देवत्व मानताना माणसाची मानसिकता व्यक्तिपरत्वे वेगवेगळी आहे. म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींना देव मानतो. म्हणजे प्रत्येक जण आपल्या कल्पनेत आपणच काही तरी ठरवतो, तो देव आहे असे मानतो असे दिसते. 
कारण ईश्वर (ईश्वरी शक्ती) तर एकच आहे तरीही अनेक प्रकारांना / गोष्टींना माणूस देव मानतो.
आणखीन एक गोष्ट लक्षात आली प्रत्येक जण वेगवेगळी कल्पना मांडून त्याला घट्ट पकडून ती कशी बरोबर आहे हे ठासून सांगत असतो. म्हणजे आपला देव आपल्या कल्पनेप्रमाणे बदलता म्हणजेच वेगवेगळा आहे असे दिसते. ह्याचाच दुसरा अर्थ देव एकच असला तरी मी माझ्या कल्पनेच्या बंधनात त्याला आपल्याला हवा तसा बांधून ठेवतो आणि दुस्र्यांनीही तसेच असावे करावे हि सुप्त इच्छा मनी बाळगतो. मुळात सर्वव्यापी ईश्वराला आपल्या चाकोरीत आपल्याच कल्पनेने बांधून त्याच्या कडे पाहतो. आणि अहंकार सोडून ज्या देवाकडे मन न्यायचे तेच मन आपल्या संकुचित कल्पनेच्या अहंकाराने भरून त्याच्या कडे जातो. आणि नेमके फसतो.
मी केलेल्या पोस्ट वर काही प्रतिक्रिया आल्या आहेत त्या शक्यतो त्यांच्याच शब्दात व जिथे पल्ल्हालिक आहे तिथे संशिक्प्त करून किंवा निव्वळ आशय आपल्या समोर मांडला आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आधी स्पष्ट शब्दात रेखांकित करून लिहिल्या आहेत
!!--- देव हि माणसाने निर्माण केलेली संकल्पना आहे देव आजवर कुणी पहिला नाही
##----- ह्याचा अर्थ देव पाहता येत नाही कारण पंचा महा भूतांची जाणीव ज्या पंच न्यानेन्द्रीयांनी माणसाला होते त्या पैकी कोणत्याही एका किंवा सर्व न्यानेन्द्रीयानी तो जनता येत नाही कारण तो पंच महा भुतांच्या पलीकडे आहे त्या हि पेक्षा शुक्ष्म आहे.
!!--- पण हे अद्भुत विश्व ज्याने कुणी निर्माण केले ती शक्ती म्हणजेच देव असे आपण म्हणू शकतो.
##----- ह्याचा अर्थ विश्वाच्या भव्यतेला आणि दिव्यातेला कारणीभूत होणाऱ्या शक्तीला मी देव मानतो
!!--- अस्थिरता अनिश्चितता पराधीनता ह्या जाणीवेमुळे संकटकाळी आधार म्हणून देव असावा असे मला वाटते त्या साठी देवावर श्रद्धा असावी आणि एक मस्तक झुकविण्यासाठी आणि दोन हात जोडण्यासाठी पुरतात.
## -----संकट कालचा आधार म्हणून मी देवाकडे पाहतो. तो संकटकाळी आपल्याला उपयोगी पडतो ह्या जाणीवेने मी त्याला देव मानतो पण मी आधी दमतो आणि मग त्याच्या पुढे नमतो. आणि दोन्ही हात बांधून शरण जातो पण तात्पुरते. तोंडाने म्हणतो अनंत अपराधी असा मी तुला अनन्य शरण आलो आहे. पण अहंकाराचा समूळ नाश झाल्याशिवाय अनन्न्यता शक्यच नाही.
!!--- मी एखाद्या व्यक्तिरेखेला देव मानतो त्या मागील माझी भूमिका काय आहे ? कारण काय आहे? --- प्रसंगानुरूप बदलते ----- सांगणे कठीण आहे. ##----- मी व्यक्ती रेखेला मानतो पण ती व्यक्ती रेखा प्रसंगानुरूप बदलते. ह्याचा अर्थ कोणतीही एक व्यक्ती देव म्हणून मी स्वीकारू शकत नाही म्हणजेच माझी देवा बद्दलची कल्पना नक्की नाही. पर्यायाने देवही नक्की नाही. अर्थात तो आहे कि नाही ह्या विषयी सुद्धा संभ्रम आहे असे ह्यातून दिसते. असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
##----- अर्थात हे वास्तव सुद्धा ढोंगी अस्तीकते पेक्षा नास्तिकता नास्तिकता मान्य करण्याचा प्रामाणिक पणा दर्शवते. अर्थात कोणत्याही ढोंगी माणसापेक्षा अशी माणसे ईश्वराच्या जवळ असतात ह्यात वाद नाही. ईश्वराकडे ढोंगाचा लवलेश हि चालत नाही. संकट त्यातून प्रयत्नांना आलेले अपयश त्यामुळे मिळालेली निराशा यातून अशा एका शक्तीला आपण आव्हाहन करतो त्याला आपले सर्वस्व अर्पण करतो. आपली मदत त्याच्याशिवाय कुणीच करू शकत नाही हि भावना. त्यामुळे परमेश्वर आपली इच्छा पूर्ण करतो. आणि त्या रूपावर आपण श्रद्धा समर्पित करतो. संकट कालचा आधार जो देतो तो मला देव वाटतो.
##----- आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपल्या स्वतःच्या शक्तीच्या अपूर्णतेच्या जाणीवेतून मी बाह्य शक्तीचा आधार शोधतो. अशा कोणत्या तरी शक्ती च्या मदती शिवाय आपल्याला यश येणे साक्यचं नाही हि जाणीव ठाम होते म्हनुये परमेश्वर आपली इच्छा पुरी करतो. म्हणजे माझी इच्छा म्हजेच वासना पूर्ण करतो त्याला मी देव मानतो. आणि मग त्याच्या रूपावर आपली शरद्ध समर्पित करतो.
!!--- ईश्वर कोणत्याही रुपात असला तरी तो आईच आहे        ##----- ईश्वर मला आई वाटतो कारण तो आई प्रमाणे माझे सर्व लाड पुरवणारा आहे, माझे अपराध पोटात घालणारा आहे. मृदू भाव आहे. आपले सर्व काही सहन करणारा आहे. प्रचंड धारण शक्ती असलेला असा आहे.
##----- माणूस वर्ण भेदाप्रमाणे शक्ती गुरु शिव उपासक असतो.     ##----- देव हा शक्तिमान आहे आणि त्याची उपासना केल्यास आपल्याला (काही प्रमाणात तरी) शक्ती प्राप्त होईल म्हणून मी त्याची उपासना करतो. ते करत असतांना मी माझ्या वर्णामुळे सहज असलेल्या वृत्ती प्रमाणे व ज्या प्रकारच्या शक्ती मला स्वाधीन व्हाव्यात अशी अपेक्षा आहे त्या प्रमाणे देव निवडतो आणि त्याची उपासना करतो.  
!!--- गणेशजी म्हणतात मी आदी, अंत,      ##----- गणेशजी - (देव) हा विश्वाची सुरुवात आहे आणि मीच शेवट आहे. आणि त्या मध्ये आपल्याला दिसणारा विश्वाचा प्रसारा मांडला आहे ज्याचे आपण एक भाग आहोत औश आहोत.  
!!--- परिस्थिती प्रमाणे भगवंत अवतार घेतो.     ##----- सामाजिक परिस्थिती प्रमाणे भगवंत अवतार घेतो कारण ती त्या त्या काळाची गरज असते. काही व्यक्ती जन्मतःच सिद्ध असतात त्यांना तप अर्चनाची गरज नाही.  
पूर्व जन्मानुसार प्रत्येक माणूस जिथे जसा जन्मायला हवा तसा जन्म घेतो. म्हणजेच पूर्व जन्मीच्या साधनेच्या कमी अधिक प्रमाणानुसार व कमीअधिक प्रती नुसार माणूस कमी अधिक शक्ती घेऊन जन्माला येतो. जो आपल्याला आपल्या पेक्षा जास्त शक्तिमान असतो त्याला आम्ही सिद्ध मानतो आणि आपल्याला जास्त उपयोगी पडतो त्याला मग आपण देवत्व देतो. अशा व्यक्तींना आणखी कोणत्याही साधनेची जरूर नाही असे आम्ही समजतो.
!!---  सायन्स हे अलीकडचे आहे अध्यात्म हे अनादी आहे.     ##----- सायन्स हे विश्वाच्या सुरवातीपासून आहे कारण विश्व आपले गुण घेऊनच जन्माला आले. त्या गुणांची माहिती शब्दात मांडणे म्हणजे सायन्स. ते माणसाला अलीकडे व्यक्त झाले. सायन्स हे भौतिकाचे नियम सांगते. भौतिक म्हणजेच पंचमहाभुते. माझा देह सुद्धा पंच महा भूतांचाच बनलेला आहे. अर्थात त्या सर्व पंच महा भूतांचे गुणधर्म माझ्यात असलेच पाहिजेत. जसे वस्तू ज्या धातूची बनलेली असते त्या वस्तूचे गुणधर्म त्या वस्तुत असतातच.  
##----- दृष्य देह म्हजे स्थूल देह आणि माणसाचे मन हे त्याच्या सूक्ष्म देह असते. देह पंच महा भूतानंचा आणि त्याचे गुण व गुणधर्म म्हणजेच माणसाच्या मनाच्या स्थिती / अवस्था. हे वास्तव आपण नेहमी अनुभवत असतो. म्हणजे पंच महा भुतांच्या मर्यादेत आपण आपली प्रगती करू शकतो विचार पूर्वक जराशीही अंध श्रद्धा न ठेवता.
##----- देह तर नश्वर आहे मन हि नश्वर आहे तरीही देहाच्या प्रगतीला मर्यादा आहेत पण मनाच्या प्रगतीला मर्यादा नाहीत. तसेच शक्ती हि अधिक व्यापक असते. मन हे पंचा महाभूतांच्या शक्तींचे एकत्रित स्वरूप आहे. कोणतीही शक्ती अदृश्यच असते तिचे परिणाम दृश असतात तेच मनाचे आहे. म्हणजेच मन दिसत नाही पण त्याचे परिणाम शरीरावर दिसतात चांगले / वाईट जसे मन असेल तसे.  
!!--- ईश्वर शुद्धतम आहे त्याला जाणण्यासाठी शुद्दतम व्हायला हवे. ##----- तो लोह्चुम्बाका प्रमाणे प्रत्येक चराचरास आपल्याकडे सतत ओढत असतो. पण आपल्या लोखंडी देहावर देहबुद्धीच्या अहंकारच गंज चढलेला असल्यामुळे आपल्याला त्याची ओढ जाणवतच नाही. आणि आपण त्याच्या जवळ जितके जायला पाहिजे तितके जात नाही.
तो गंज काढणे म्हणजे स्वतःला शुद्धतम बनवणे. म्हणजे स्वतःचे मन शुद्धतम बनवणे. हि क्रिया भौतिकात मोडते. ह्या साठी प्रयत्न करणे म्हणजेच साधना ती करणारा तो साधक साद्ध्य होते ते ईश्वर सान्निध्य आणि हे साधते तो सिद्ध पूर्वीच्या कली मनुष्य पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता सायन्स मद्ध्ये एव्हढी प्रगती नव्हती निसर्गाच्या हातातले बाहुले तो त्यामुळेच देव जन्माला आला.
!!--- मानले तर देव नाही मानल तर दगड.          ##----- तर मग हे जाणून घेणे आवश्यक आहे कि ह्या वेग वेगळ्या कल्पन्न्माद्ध्ये अशी कोणती गोष्ट आहे कि ज्यामुळे माणूस त्या कोणत्यातरी गोष्टीला देव मानतो ??? ज्या अर्थी देव वेगवेगळे आहेत त्या अर्थी मान्नार्याची भूमिका वेग्व्गली असलीच पाहिजे.

No comments:

Post a Comment