Wednesday, 8 August 2012

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ई - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील विचार/इच्छा शक्तीची संकल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-ई - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील विचार/इच्छा शक्तीची संकल्पना 
प्रत्येक शक्ती हे एक पूर्ण वर्तुळ असते ती जिथून सुरु होते तिथेच येऊन परत मिळते तेव्हाच तिचा परिणाम व्यक्त होतो. हा भौतिक विज्ञानाचा सर्वांना माहित असलेला गुणधर्म आहे.  उदाहरणार्थ वीज. हेच तत्व विचारलाहि लागू होते.  विचार /व/ इच्छा हि सुद्धा अशीच एक शक्ती आहे कि ती जिथून सुरु होते इथेच परत येते.  हा भौतिकाचा नियम आहे. म्हणजेच  माझ्यापर्यंत बाहेरून आलेले प्रत्येक विचार हे मुळात माझेच आहेत. म्हणजेच माझा कोणी त्वेष करत असेल तर तो मुळात मीच करत आहे आणि नंतर तोच फिरून माझ्याकडे येत आहे. ह्याच कारणाने स्वतःचे चांगले करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याचे चागले चिंतने. हि संकल्पना अंतर्बाह्य साकार करणारा शब्द म्हणजे ओमकार. ओमकार हे हि एक पूर्ण वर्तुळ आहे. अ ते उ आतून निर्माण होवून बाहेर जावून पुन्हा उत्पत्ती ठिकाणी येवून संपणारे. आतून बाहेर येणारा, सदिच्छा दर्शक आणि म्हणूनच पवित्र. 

No comments:

Post a Comment