Wednesday, 8 August 2012

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ड - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ९) बौद्ध १०) कलंकी

ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ड - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ९) बौद्ध १०) कलंकी 
हे बदल होत होत पुढे संहाराच्या जाणीवेतून एकदम विरक्ती, त्या त्या काळाची गरज ----- ९)बौद्ध   
शेवट आत्ता चालू असलेला अराजक, अस्थिर, द्विधा मनसस्थितीतील, माणूस ------------- १०)कलंकी 
ह्या सर्वांचा उंचावरून व त्रयस्त पणे विचार करता असे लक्षात येते कि पहिले ३ मुळात देह नाहीत पहिला अद्वैत-एकटा, दुसरया वृत्ती व तिसर्या निर्जीव पण निसर्गातील शक्ती आहेत. त्यांना मानव रूप कोणी कधी व का दिले ते कळत नाही. कदाचित निव्वळ अद्वैताची, वृत्तीची किंवा निव्वळ शक्तीची म्हणजे अव्यक्ताची उपासना मानत स्थिर होणे कठीण असल्याने त्यांना व्यक्त मानवी देह कल्पून त्यांना पूजणे सुरु झाले असावे. 
सजीवातील ज्या प्राण्यांना आपण देव मानतो तरी त्यांचे आजचे वास्तवातील स्थान मर्यादित दिसते. आज कलंकी हा अवतार  प्रकारचा कालखंड चालू आहे. बाकी सर्व देवांना आपण देवळात पुजतो. आणि कालान्कीला मात्र  आचरणात  आणतो  असे  आजचे  वास्तव आहे. बाकीच्या देवांचे आपण गुणगान करतो. कालान्कीचे गुण मात्र प्रत्यक्षात आचरतो. बाकीचं देवांची आपण पूजा करतो कालान्कीशी मात्र तादात्म्य पावून वावरत आहोत. त्यामुळे आपले खरे कोणते आणि खोटे कोणते हे आपणच तपासून पाहायला हे लेखमाला उपयोगी पडेल ह्याची मला खात्री आहे. 
काही तांत्रिक अडचणीन मुळे मी ९ दिवसांनंतर हा समारोप करत आहे. ७ जुलै ते २२ जुलै पर्यंत पुन्हा एकदा माझ्या लिखाणात खंड पडणार आहे. कारण माझेच मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे. तो पर्यंत आपल्याला विचार करायला छोटीशी प्रश्नावली आपल्या समोर ठेवत आहे.  
अ) मी एखाद्या व्यक्तिरेखेला देव मानतो त्या मागील माझी भूमिका काय आहे? का र ण काय आहेत?
ब) मला देव हवा असे खरोखर मनापासून वाटते का? त्या साठी मी काय केले पाहिजे असे मला वाटते आणि ते मी करतो का?
क) माझ्या देवाकडून काही अपेक्षा आहे का? त्या पुऱ्या झाल्या का?
ड) देवत्व हे मी नेमके कुणाकुणाला बहाल करीन?
ई) मला देव हवासा वाटतो कि त्याने फक्त आपल्याला वेळोवेळी माझ्या जरुरी प्रमाणे उपयोगी पडावे असे मला वाटते? 
मला पूर्ण खात्री आहे कि ह्या प्रश्नान्नाची उत्तरे आपल्याला योग्य रीतीने अंतर्मुख करतील आणि आपली ईश्वराला भेटण्याची खरोखर इच्छा असेल तर आपल्या मनातील यात्रेला सहाय्यभूत ठरतील. शुभम भवतु.   

No comments:

Post a Comment