ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-ब - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार --
२ रा अवतार- कूर्म (कासव) . ३ रा अवतार वराह (डुक्कर) हे दोन अवतार उभयचर आणि पहिला भूचर असे आहेत. ४ था अवतार नारसिंह
ह्या दोन पैकी कासवाला आपल्याकडे कायम स्वरूपी देवत्व बहाल केले गेले आहे असे दिसते. आणि ते कारण त्याचा स्वतःच्या इंद्रियांना आवरण्याचा गुणधर्म. हे पारमार्थिक साधनेसाठी लागणारा प्रधान गुण असल्यामुळे हि स्वीकृती जाणवते. वराह अवतरला मात्र फारसे महत्व दिले गेलेले दिसत नाही. नारसिंह अवताराच्या मागे मात् र आपल्या सर्वांना माहित असलेले कथानक आहे. इथ पर्यंतची उत्क्रांती हि देहाची आहे. म्हणजे देहामधील प्रगती दिसते. हातपाय नसलेल्या प्राण्यापासून ते चारपाय आणि नन्तर दोन पाय दोन हात. एव्हढी उत्क्रांती झालेली दिसते. पाहिया ३ प्रकारात फक्त देही उत्क्रांत झालेला दिसतो पण चौथ्या प्रकारात तो मानवाच्या उपयोगी पडला सत्विकातेला आधारभूत ठरला म्हणून त्याला सुद्धा कायम स्वरूपी देवत्व बहाल केले गेलेले दिसते. त्या मानाने मत्स्य आणि वराह ह्या दोघांना देवत्व आहे पण समाजाने प्रधान स्थान दिलेले दिसत नाही. प्रत्येक पुढची पिढी हि पहिल्या पिढी पेक्षा प्रगत असते. हा सिद्धां त संपूर्ण सजीवाला लागू होतो. ह्यालाच अनुवंशिकता म्हणतात. एका योनीतून दुसरया योनीत जन्मा ला येणे ह्याला पुनर्जन्माचा सिद्धांत म्हणतात. पुनर्जन्म हे वास्तव आहे. प्राण्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळी पुढील योनी हि पूर्वीच्या योनिपेक्षा प्रगत योनीच संभवते. कारण त्याच्या बुद्धीची झेप स्वसंरा क्षानापुरतीच मर्यादित असते. जगण्यातील सुरक्षितता हा प्रधान भाव असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रगत योनीत जन्माला येत येत माणसाचा जन्म घ्यायला सर्व च्या सर्व योनीतून जावे लागलेच तर ८४ लक्ष योनी म्हणजे सजीवांचे प्रकार आहेत त्यातून जावे तेव्हा जीवाला मनुष्य जन्म येतो असे आपल्या हिंदू धर्म शाश्त्राचे म्हणणे आहे. म्हणूनच मानव जन्म दुर्मिळ आहे असे म्हणतात. त्याचे सार्थक करावे असे आपल्याला वारंवार संग्न्येत ये ते त्या मानव जन्माच्या उत्क्रांतीचे दर्शन पुढील भागात घेवूया.

No comments:
Post a Comment