ईश्वर / देवत्व कल्पना ---- ३-क - दुसरा प्रकार --- गुण --- ३) तामस
३) म कार - तम - तामस - महेश/शंकर ----- नष्ट करणारा रागीट कारण राग आल्याशिवाय नाश करता येणार नाही. जे जे जन्मले ते ते नष्ट झाले नाही तर नवनिर्मिती नाही. तामसगुणी. निरनिराळ्या वृत्तीचे कल्पनेने मानवी देह योजलेले आहेत.
ब्रम्हा तीनही काळाचे भान असलेला म्हणून तीन तोंडे कल्पिली.
विष्णू अत्यंत धीरगंभीर पणे कर्तव्य पालन करणा रा. नागावर आरूढ होऊनही शांत.
शंकर तर क्रोधी म्हणजे तो क्रोध दोन डोळ्यातून बाहेर येण्याला कमी पडेल म्हणून कि काय त्याला तिसरा डोळा कल्पि लेला दिसतो. आणि स्वतःतील क्रोधाग्नी सहन हो त नाही म्हणून सतत हिमालयात वास्तव. तो आग बाहेर सोडतो आणि सर्व भस्मसात होत हि कल्पना. वास्तविक हा मानव स्वरुपात काल्पितांना, विरक्त, अत्यंत त्याग स्वरूप, पूर्ण पणे निस्संग, असा कल्पिलेला आहे. तरीही ह्या देवाबद्दल आपल्याकडे तो भोळा आहे. त्यामुळे तो लवकर वश होतो आणि मागेल ते देतो अशी एक भावना समाज मनात असल्या मुळे ह्या देवाचे पूजन विष्णू पेक्षा हि मोठ्ठ्या प्रमाणात होतांना दिसते. एका विरक्ताची पूजा संसारातील इच्छा अपेक्षा पूर्ण करण्या साठी केली जाते. हे समाज मानाच्या विसंगतीचे वास्तव आहे. तो आहे तसाच आहे समाज त्याला चुकीच्या पद्धतीने स्वीकारतो आहे असे दिसते. हे का? ह्याचे कारण मात्र कळत नाही. वास्तविक जो तो ज्याच्या त्याचं गुणानुसार पु जला जायला हवा पण तसे आपल्याकडे घडतांना दिसत नाही. हि विसंगतीच कदाचित सामाजिक वि संवादाचे कारण असू शकेल. हे म्हणजे ज्ञानेश्वर किंवा हनुमं ताच्या नावाने बालान्तापानाचे हॉस्पिटल काढण्या सारखे वाटते असो. आहे हे असे आहे. ओम शिवाय नमः तोच योग्य बुद्धी देवो.
वृत्तींना मानवी रूपे देण्याचे नेमके का व कधी सुरु झाले हे इतिहास किंवा पुराणे कुठेही नमूद करत नाहीत. पण त्याच बरोबर हे हि सत्य आहे कि सृष्टीच्या अस्तित्वासाठी सर्वच गुणांची सारखीच गरज आहे ह्या गोष्टीची जाणीव मात्र त्या कालच्या मानवी कल्पना करणाऱ्या मानवालाही होती ती आज लोप पावलेली दिसते. त्यामुळेच आज मात्र आपण त्या वृत्तींना उच्च नीच भेदाने स्वीकारतो. त्यातल्या त्यात उच्च नीच ठरवतो. आणि त्यामुळेच निसर्गाने देलेल् या देणगीचा आपल्याला नीट वापर करता येत नाही.
No comments:
Post a Comment