माझ्या सर्व मित्रांस व वाचकांस नमस्कार आजपासून हा नवीन विषय सुरु करत आहे. नेहमी प्रमाणे पूर्ण झाल्यावर तो ई-बुक स्वरुपात सदर केला जाईल
ईश्वर / देवत्व कल्पना ----- १ - विविध कल्पना
आपल्याकडे देवत्वाच्या ५ प्रकारच्या कल्पना आहेत. कल्पना असे मी अशासाठी म्हणतो, जो पर्यंत आपल्याला एखादी गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत आपल्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी तरी ती कल्पना आहे.
पहिला प्रकार ----- ओंकार --- आकार, उकार, मकार --- पहिला एकाक्षरी शब्द - त्याचे काल्पनिक दृश स्वरूप गणपती.
दुसरा प्रकार ------ गुण --- १) सत्व २) राजस ३) तामस --- म्हणजेच वृत्ती --- १) सात्विक २) राजसी ३) तामसी --- त्यांचे काल्पनिक दृष्य स्वरूप ब्रम्हा - विष्णू - महेश.
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- १)पृथ्वी २) आप (पाणी) ३) तेज ४) वायू ५) आकाश. मी थोडा क्रम वेगळा देतो १) पृथ्वी २) आप (पाणी) ३) वायू ४) तेज ५) आकाश ह्या सर्वांचे काल्पनिक देवता चित्र अथवा मूर्ती आपल्या कडे अस्तित्वात आहेत. त्यांचे गुण पृथ्वीचा गंध - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय नाक, पाण्याचा गुण रस (चव) - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय जीभ, वायूचा गुण स्पर्श - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय त्वचा, तेजाचा गुण दृष्य - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय डोळे, आकाशाचा गुण शब्द - जाणण्याचे ज्ञानेंद्रिय कान.
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवाद --- म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, --- ४) नारसिंह, ---
५) वामन, --- ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, --- ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)(कल्की)
पाचवा प्रकार ----- युगपुरुष ----- महान पुरुष ----- कालपरत्वे समाजाला लाभलेले विविध प्रकारचे नेते. उत्क्रांतीवादाच्या मधील दशावतारांपैकी शेवटचे २ --- ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण,(कलंकी सोडून) हे ह्याच प्रकारतहि येतात. ------------------------------ ------------------------------ ----------------------
No comments:
Post a Comment