राजयोग ह्या विषयाबद्दलची भौतिक मर्यादेतील सर्व माहिती आपण पाहिली. बहुतौशी लोकांमाद्ध्ये ह्या विषयाचे विशेष आकर्षण हे त्यातील सिद्धी आणि त्यातून दिसणारे चमत्कार ह्या बद्दलच असते. वास्तविक सिद्धी असणे हे नैसर्गिक नाही. त्यात पारमार्थिक तर काहीही नाही. पण सगळ्यात मोठ्ठा विरोधाभास आपल्याकडील समाज माना मद्ध्ये दिसतो, तो म्हणजे नेमके ह्या चमत्कारांनाच नमस्कार घडणे. हे त्या चमत्कारांना देवत्व देणार्यांचे आणि पर्यायाने सर्व समाजाचे दुर्दैव आहे, आणि ते सर्वांच्याच दृष्टीने खरोखरच धोकादायक आहे, नुकसानकारक आहे. सिद्धी येवून जातात आणि माणूस खऱ्या अर्थाने सिद्ध होतो, ज्ञानी होतो. स्वतःच्या व पर्यायाने समाजाच्या आणि म्हणूनच जगाच्याहि कल्याणाला कारण होतो. अशा व्यक्तीनबद्दल आदर असणे हे स्वाभाविक व अत्यंत योग्यच आहे. एखाद्या व्यक्तीला आदर्श मानणे हे अशासाठी करायचे असते कि त्यांच्या सारखे आचरण करून आपण त्याच्या सारखे बनण्याचा प्रयात करण्यासाठी. नाहीतर आदर्शाला काय अर्थ आहे. ती व्यक्ती जर खरोखरच थोर असेल तर अशा लोकांमाद्ध्ये गुंतणार नाही. आणि लोकांनी केलेल्या अवास्तव सत्कारांना बळी जाणार नाही. आणखी एक गैर समज आपल्या समाजात आहे. तो म्हणजे त्या व्यक्ती मोठ्ठ्या होत्या. म्हणजे काय ? खरे म्हणजे हे आपण आपली जबाबदारी टाळणे आहे. जर अशी एखादी फार मोठ्ठी गोष्ट आहे ती एखाद्याला करणे शक्य असेल, तर ती दुसरया माणसाला हि शक्य आहे. ईश्वरापुढे कोणीच लहान मोठा नसतो. तर मग आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे. मुलभूत तत्वज्ञान साधे आणि सरळ आहे आपल्याकडे ते बऱ्याच वेळा विपरीत करून सांगितले जाते आणि गूढ अतिगुढ भासवले जाते. तितके ते करणेच अशक्क्य आहे असे वाटावे. असे नक्कीच नाही फक्त आवश्यक ती पत्थ्ये पाळलीच पाहिजेत. त्या दृष्टीने मी शक्क्यते सर्व सावधगिरीचे कंदील दाखवून हा विषय सदर करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडून उदंड प्रतिसाद मिळाला आता नेहमी प्रमाणे काही दिवसांच्या विश्रांती नंतर कर्मयोग विचारात घेऊ जो आपण रोज आचरणात आणतो. पण समजायला आणि समजवायला अत्यंत कठीण तो सुरु करणार. राजयोग हा आज पूर्ण झाला.
No comments:
Post a Comment