यम नियम ---- आत्तापर्यंत आपण सर्व प्रकारची पूर्व तयारी कशी करायची ते पाहिले. यमाच्या आचरणाने वृत्ती सात्विक बनवायच्या आहेत. आणि नियमांच्या अभ्यासाने देह, मन, आणि बुद्धी परिपक्व बनवायची आहे. कि जेणेकरून कुंडलिनी शक्ती सोसायला आपण समर्थ होऊ.
हा विषय समजण्यासाठी मी आपल्याला एक उदाहरण देतो ते आजच्या पिढीला नक्की भावेल. शरीर आणि मन ह्यांचा संबंध कॉम्पुटर च्या हार्ड वेअर आणि सोफ्ट वेअर सारखा आहे. तिथे दोघे जशी एकमेकांना अनुरूप असायला हवीत तसेच शरीर आणि मनाचे आहे.
आता ह्या योगाचा मुख्य हेतू जो ---कुंडलिनी जागृती--- त्यासाठी साधना कशी करायची त्याचा विचार करायचा आहे. त्यासाठी मनाला स्वस्थ करायचे आहे, शांत करायचे आहे, स्थिर करयचे आहे, रिकामे करायचे आहे स्वच्छ करायचे आहे. मन हे आपले शुक्ष्म शरीर आहे त्यामुळे मन स्थिर ठेवायचे तर शरीरही स्थिर ठेवायला हवे. त्यासाठी योग्य त्या स्थिर आसनाची आवश्यकता आहे त्यासाठी ह्या अष्टांग योगाचे पुढचे अंग आसन.
No comments:
Post a Comment