२ ज्ञानयोग ----- दासबोध ---- एक सामाजिक भान ---- दासबोधाच्या संबंधात आणखीन एक गोष्ट माझ्या लक्ष्यात आली ती मुद्दाम मी इथे नमूद करतो आहे. ऐकायला थोडे दुखद वाटेल. पण वास्तव आहे. दासबोध वाचणारे आज हि अनेक आहेत. लाखात नव्हे कदाचित कोट्यात अस्तातील. त्याची पारायणे करणारेही भरपूर आहेत. फार काय तो मुखोद्गत करणारे (पाठ असणारे) सुद्धा बरेच असतील नव्हे आहेत. पण आचरणारे किती ह्या प्रश्नावर कदाचित प्रश्नाचीन्न्हेच दिसतील, कदाचित वाचकांच्या संख्ये एव्हढी.
मी एक घटना सांगतो समर्थ सांप्रदाया तर्फे दासबोध घरोघरी असा उपक्रम चालू होता. एक ग्राहस्थ माझ्या कडे तो विकायला आले अर्थात किंमत हा प्रश्न नव्हताच. कारण ती फक्त ५० रुपये होती. पण माझ्याकडे दासबोधाची २ पुस्तके आधीच होती. एक साधा सार्थ, आणि दुसरा श्री. के.वी. बेसरे लिखित. मी तसे त्यांना सांगितले. त्यावर त्यांचा मला प्रश्न ---"पण वाचलाय का? आपली झोळी फाटकी!" त्यावर मी उत्तर दिले माझी झोळी लहान नक्कीच आहे पण फाटकी नक्कीच नाही. इतकेच काय पण मी तो वाचल्यावर, माणसांनी, कोणत्या वयात, त्यातील कोणता भाग वाचवा ह्यावर, माझे व्यक्तिगत तीपण केले आहे. ते ऐकल्यावर ते जरा जमिनीवर आले. आणि म्हणाले हा विचार नवीन आहे. ---------- वास्तविक हे ग्राहस्थ दासबोधावर प्रवचन करतात असे मी ऐकून होतो. अशा माणसाने दुसऱ्याला नीट माहिती करून न घेता आधीच "आपली झोळी फाटकी" अश्या प्रकरचे वक्तव्य करणे किती योग्य आहे? मग त्या दासबोधाचा परिणाम कसा होणार? हा आज आमच्या समाजाचा प्रोब्लेम आहे? मी दासबोध वाचतो ---- पारायण करतो ---- मुखोद्गत करतो --- ह्या अहंकारात दासबोधी त्यातही असे दास्बोधावर वक्तव्य करणारे अडकले तर समाजाचे काय होणार????????? असो. एक सामाजिक भान एव्हढाच ह्या लिखाणाचा हेतू आहे.
No comments:
Post a Comment