५ प्रत्याहार --- इंद्रिये ताब्यात ठेवणे. संवेदना शक्ती युक्त इंद्रियांना बहिर्मुख होऊन कार्य करण्याची सतत सवय आहे. त्यांना स्वतःच्या इछेच्या ताब्यात आणण्याला प्रत्याहार म्हणतात. प्रयाहाराचा खरा अर्थ आहे स्वतःकडे ओढून घेणे. माणसाला सर्वात कठीण असा भाग. ज्याच्यावर सर्व गीतेचे सार भगवंताने अर्जुनाला सांगितले. मन आणि शरीर ह्यांच्या संयोगाने जी भौतिक जगातून सुख प्राप्तीची ओढ लागते. ती माणसाला हळू हळू स्वतःवरील ताबा सोडायला लावते. आणि माणसाला ईश्वरदत्त स्वातंत्र्याचा विसर पडतो. स्वतः हून काम क्रोधाचा दास होतो. ह्यातून स्वतःच्या मनाकडे स्वतःच्या मनाने सतत लक्ष ठेवून त्याला अशा बहिर्गामी विचारापासून दूर ठेवणे. म्हणजे प्रत्याहाराचा अभ्यास.हि राजयोगाची प्राथमिक तयारी आहे. अंतिम सर्व काही ह्याच तयारीवर अवलंबून आहे. मनाला हवे तेव्हा, हवे तेथे, नेता येणे, ह्या साठी आधी त्याला स्वतःकडे आणणे म्हणजेच स्वतःच्या ताब्यात आणले पाहिजे. त्यासाठी हे सर्व साधन करायचे आहे. पाहिली पायरी मनाला इंद्रियांच्या ताब्यातून सोडविणे. आणि पुढची पायरी इंद्रियांवर ताबा मिळविणे. हे करण्यासाठी प्रथम आपले मन नेमके कुठे चालले आहे. ह्या क्षणी नेमका काय विचार करत आहे. हे त्याच्यावर सतत लक्ष ठेवून पाहत राहणे. मग ते कुठे कुठे जाते आहे ते लक्षात आल्यावर, हळूहळू त्याचे भरकटणे अपोआप कमी होते. आणि ते स्वतःच्या ताब्यात येते. जसे लहान मुलांना आपल्याकडे कोणीतरी पाहत आहे हे माहित असेल तर ती अपोआप शांत राहतात. आपल्यावर लक्ष ठेवणारे कोणी नाही ह्याची जाणीव होताच ते भरकटत जातात. हाच नियम मनाला मानाने पाहायला लागल्यावर लागू होतो., आणि मन हळू हळू आपल्या ताब्यात येवू लागते. त्यावर आपल्याच मनाने लक्ष केंद्रित करणे. हा साधनेचा पाया आणि शेवट आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********
No comments:
Post a Comment