Tuesday, 24 April 2012

ब-(१ यम) सत्य --- प्रामाणिकपणा. कोणत्याही कठीण अवस्थेत सुद्धा, कधीही खोटे न बोलणे. खोटे न वागणे. इथे दुसऱ्याचं चांगल होण्यासाठी खोट  बोललो  हेही  चालणार  नाही. म्हणूनच मी म्हटले आहे कि संन्यासी वानप्रस्थाश्रमी माणसांसाठीच  हे सर्व शक्य आहे. इतकेच काय गम्मत म्हणूनही खोटे न बोलणे, बोलण्या प्रमाणे आपले आचरण काटेकोरपणे पाळणे. अशा सत्य वाचनाने वाचा सिद्धी प्राप्त होते. म्हणजे आशा प्रकारे सत्यवचनी आणि आचरणी माणूस जे बोलेल ते खरे होते. पण  त्याची कठोरता पाहता आपल्या लाखात येईल कि हे संसारीकाला कठीण किती आहे. नव्हे शक्यच नाही. म्हणूनच वानप्रस्थाश्रम आवश्यक ठरतो.  बर सत्य  बोलतांना  ते दुसऱ्याला लागेल असे कठोर सुद्धा असताकामा नये. कारण दुसऱ्याचे मन दुखावणे म्हणजे परत हिंसा. ती हि घडता कामा नये. अशी टांगती तलवार असते डोक्यावर. बाकी बहुतेक जाण वानप्रस्थाश्रम स्वीकारतात. सतत  साधना करत माणूस सिद्ध झाला कि मग तो समाजात (कदाचित) वावरू शकतो. कारण तो मनाने तेव्हढा तयार झालेला असतो. म्हणजे  एव्हढे  साधनेचे कष्ट सहन करून सुद्धा मृदू स्वभाव राहिलेलेच संत होतात, कि जे समाजातही सहजपणे  वावरू शकतात.  आजच्या  सामाजिक परिस्थितीत जर अशी माणसे (बुवाबाजी न करणारी) खरोखरच निर्माण झाली तर त्यांच्या कडूनच समाजाचे खऱ्या अर्थाने कल्याण होत असते.   

No comments:

Post a Comment