Tuesday, 24 April 2012

राजयोग --- पूर्वतयारीचा पहिला अध्याय झाला ---- राजयोगी होण्यासाठीची पूर्व तयारीचा एक अद्ध्याय इथे पुरा झाला. आत्तापर्यंत झालेल्या विवेचनावरून आपल्याला ह्या योग साधानेसाही पूर्व तयारी कशी आणि किती कठोरपणे करावी लागते ह्याचा अंदाज आला असेल. कारण इथे निव्वळ मुक्ती नाही तर जडावर म्हणजे भौतीकावर सुद्धा स्वामित्व मिळवायचे आहे. मानवी देहात कुंडलिनी नावाची शक्ती असते असे म्हणतात. ती जागृत झाल्यास ती माणसाला  मुक्ती मिळवून देते. किंबहुना मुक्ततेसाठी  ह्या शक्ती जागृतीची नितांत आवश्यकता आहे. असे आहे तर मग इतर योगांचे काय? त्याच्या अभ्यासानेही मुक्तीच मिळते असे म्हणतात.  इतर योगाचे सुद्धा अंतिम फळ कुंडलिनी जागृतीच आहे. पण त्यासाठी वेगळेपणाने आणि विशेष प्रयत्न करणे अभिप्रेत नाही. ही प्रगती  हळू हळू काही जन्मात व्हावी  हि अपेक्षा आहे.  श्री रामकृष्ण परमहंस  म्हणायचे  मनुष्य आणि  ईश्वर  ह्यांचे नाते  लोखंड आणि लोह्चुम्बाकास्रखे आहे. लोहचुंबक जसा त्यच्या संनिद्ध्यात आलेल्या लोखंडाला सहज आपल्याकडे ओढून घेतो तसे ईश्वर प्रत्येक जीवाला आपल्या कडे ओढून घेत असतो. पण लोखंडावर जसा गंज असतो तसे माणसाच्या मनावर इच्छांचा गंज असतो तो बाजूला केला किंवा झाला तर तो सहज ईश्वराला चिकटून जाईल.  हा न्याय  याच्यायावत जीवाला लागू आहे. निव्वळ मुक्तीची इच्छा व्हायलाही काही जन्मांची  तयारीच  लागत असते. इथे तसे नाही थेट कुंडलिनी  जागृती करणे  हेच  एकमेव ध्येय आहे. अनेक जन्मांच्या अनुभवांनी जीवाला मुक्तीची गरज भासते. तिचे तळमळीत रुपांतर होते. इतके कि केवळ हि जाणीव उराशी बाळगूनच जो जीव जन्मतो. त्याच्यासाठीच राजयोग आहे. म्हणून साधनही तितकीच कठोर आहे. इतरत्र कोठेही लक्ष न देता फक्त ह्या शक्तीवर लक्ष केंद्रित  करून आपण तिला स्वाधीन करून घेणे हे राज्योगाचे ध्येय आहे. एकाग्रता जितकी जास्त तेव्हढे यश नक्की आणि लवकर हा सरळ सरळ सिद्धांत आहे म्हणून राजयोगी इकडे तिकडे न रमता थेट ईश्वराला जावून भिडण्यासाठी इतका आटापिटा करतो. अर्थात असा माणूस जन्मावाच लागतो. हे हि आत्तापर्यंतच्या  विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेलच. मी मागे म्हटल्या प्रमाणे ह्यासाठी लागणारी पूर्वतयारी आपल्याला उत्तम माणूस बनण्यासाठी नक्की  उपयोगी  पडेल. हा ह्या लिखाणाचा हेतू आहे. आत्ता कुठे एक पायरी पुरी झाली. यम आणि नियम ))))अंगवळणी पडले(((( कि दोन पायरया चढलो असे म्हणायला हरकत नाही. अर्थात बाकी सर्व अभ्यास सुद्धा एकीकडे  चालू  ठेवायचाच असतो.  आत्तापर्यंत जे काही वाचले ती हि साधनच आहे. ते साधनेचे बाह्यांग आहे.  उद्यापासून नियम म्हणजे तप, संतोष व स्वद्ध्याय म्हणंजे काय ते पहायचे आहे. ह्याच्या अभ्यासाने शरीराला तयार करायचे आहे. देहबुद्धी नष्ट  करायची  आहे. मनाने स्वतःच्या मनात प्रवेश करायचा आहे. आणि वेदाभ्यासाने बुद्धीला विकसित करायचे आहे. तयार राहा हे सर्व करायला.                  

No comments:

Post a Comment