Tuesday, 24 April 2012

कुंडलिनी --- हा विषय तसा बराच प्रचलित आहे. आणि त्यावर बोलायचा माझा अधिकारही नाही. पण केवळ माहिती म्हणून देत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या पुढे ह्या विषयावर लिहिलेले सर्व लिखाण संग्रहित आहे.  सुरुवातीला अष्ट सिद्धी कोणत्या आहेत त्या देतो.
अष्ट सिद्धी १-अणिमा - आपल्या इच्छेप्रमाणे सूक्ष्म रूप धारण करता येणे. ----- २-महिमा - आपल्या इच्छेप्रमाणे मोट्ठे रूप धारण करता येणे. ----- ३-लघिमा - पिंजलेल्या कापसाप्रमाणे हलके होणे. ----- ४- गरिमा - खूप जड होणे. ----- ५- प्राप्ती - पाताळ ते ब्राम्हलोकापर्यंत सर्व वस्तूंचे प्रत्यक्ष आकलन होणे. ----- ६ - प्रकाम्म्य - इच्छेप्रमाणे अलौकिक गोष्टी घडवून आणण्याचे सामर्थ्य. ----- ७- इशात्व - संकल्प बलाने श्रुष्टी,स्थिती आणि प्रलय करण्याचे व चंद्र सूर्य इत्यादी ग्रहांना ताब्यात अनन्ण्याचे सामर्थ्य. ----- ८- वशित्व - लोक्पालासह सर्व लोकांना वश - ताब्यात आणण्याचे सामर्थ्य  ----- ह्या व्यतिरिक्तही काही सिद्धी प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ दुसऱ्याच्या मनातले विचार समजणे. ----- कधी कधी शब्दही जाणणे ----- दूरचे ऐकू येणे ----- प्रकाश दिसणे ----- चांदण्या दिसणे ----- पुढचे मागचे कळणे म्हणजे भविष्य आणि पूर्वजन्म समजणे ----- वाचा सिद्धी म्हणजे आपण बोलू तसे घडणे ----- प्रचंड प्रज्ञा शक्ती म्हणजे कोणतीही गोष्ट तात्काळ जाणणे लक्षात येणे -----                  ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********      

No comments:

Post a Comment