Tuesday, 24 April 2012

४ प्राणायाम - ड--- प्राणायाम  --- प्राणायामाचे बाह्यांग. --------- मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे हे प्रकार प्रत्यक्ष प्राणायामाचे नाहीत त्या निव्वळ श्वाशोछावासाच्या क्रिया आहेत. मग ह्या क्रिया कशासाठी हा सहज प्रश्न पडेल. यम, नियम ह्यांनी वृत्ती, शरीर, मन, बुद्धी, तयार करायची. तसे श्वाशोत्श्वासाच्या ह्या क्रियांनी आपल्या  शरीरातील सर्व क्रियांना एक प्रकारचे संतुलन येते. श्वाशोत्छ्वासाची क्रिया हे आपल्या शरीरूपी  यंत्राचे प्रमुख चाक (व्हील) आहे. ते नियमित चालले तर शरीरातील सर्वच क्रीयान्माद्ध्ये नियमित पणा येणार आहे. आपण पाहतो सर्व विश्व सतत स्वतःभोवती आणि एकमेकांभोवती फिरत असते. प्रत्येकाची  गती वेगवेगळी आहे. पण ज्याची त्याची गती त्याच्या  पुरती कायम  आहे, नियमित आहे, एका विशिष्ठ  लयीत  आहे.  संसारी माणसा मद्ध्ये ह्या गतीत भावनांच्या उद्वेगामुळे फरक पडतो, लय बदलते आणि ह्या गतीचे संतुलन बिघडते. ती नियमित करण्या साठी ह्या वर दिलेल्या लयीतच श्वाशोछावास करायला हवा. तरच श्वाशोछावासाच्या क्रियेने सर्व शरीर संतुलित होते. म्हणून ती अत्यावश्यक आहे. अर्थात  संसारिक माणसाला हे प्रयोग कठीण जातात. ह्या गोष्टींची हि सवय लागते. मी आपल्याला जनरेटरचे उदाहरण देतो त्याच्या गतीप्रमाणे  त्यातून  निर्माण  होणाऱ्या  वीज निर्मितीतील भार आणि वेग हा अवलंबून असतो. आपल्याला विशिष्ठ भार व वेगाची वीज निर्मिती करायची असेल, तर गतीवर नियंत्रण असणे हे अत्यावःयक आहे. हाच नियम इथे हि लागू होतो. कुंडलिनी हि शक्ती आहे. ती आपल्या शरीराला  पेलेल  अशा भार आणि वेगाने निर्माण होण्यासाठी  प्रमुख चाकाची गती नेहमी  संतुलीतच  राहिली पाहिजे. तेव्हाच आपले शर्व शरीर तिचा आवेग पेलायला समर्थ होईल. ती जर संतुलित नसेल तर विजेच्या  असंतुलितपणामुळे  जसे  दिवे लुकलुकतात तसे आपले होईल. मनाच्या एकाग्रतेने आणि श्वासोच्छ्वासाच्या संतुलित क्रियेमुळे कुंडलिनी शक्ती प्रकट होते. तिचे संतुलन श्वाशोछावासाची क्रिया करते  आणि शरीर साधनेमुळे ती धारण करायला समर्थ असेल तर ती निरनिराळ्या सिद्धींच्या रूपाने प्रकट होते.                        ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********     

No comments:

Post a Comment