Tuesday, 24 April 2012

अ-(१ यम) अहिंसा --- काया, वाचा, व मनाने कुणालाही त्रास न देणे. काया-  हिंसा म्हणजे ठार मारणे. ते तर दूरच. पण कोणालाही देहाने, देहाला, कोणत्याही  प्रकारची बारीकशीही शारीरिक इजा होवू देणे. आपल्यामुळे दुसऱ्याला जराही दुक्ख होऊ न देणे.  वाचा- आपल्या नुसत्या बोलण्यातून सुद्धा कोणालाही जराही दुखः  होणार  नाही  याची काळजी घेणे. जराही कठोर शब्द न वापरणे. मन- इथे दुसर्याच्या मनाला वेदना होतील, त्रास होईल असे आपल्याकडून  काहीही होताकामा नये.  दुसऱ्याला त्रास होईल असे विचारहि आपल्या मनात येवू देता कामा नये. अहिंसे बरोबरच दया आणि क्षमा हे दोनाहे ओघानेच येतात. म्हणजेच सूड भावना (मत्सर) सुद्धा जराही नसणे. सूड भावना  माणसाची मानसिक प्रगती होवू देत नाही, अंतिम स्वतःच स्वतःच्या नाशास कारणीभूत होते. विचार, इच्छा, हि शक्ती आहे. प्रत्येक शक्ती हे एक पूर्ण वर्तुळ आहे. ती जिथून सुरु होते, तिथेच परत येऊन आपला परिणाम दर्शवते. म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा वाटते एखादा माणूस आपल्याशी मत्सराने वागत आहे त्या वेळी हे नक्की समजावे मत्सर मुळात आपल्या मनात आहे. तो हि खोल आहे. तोच समोरच्या माणसाकडून परावर्तीत होत आहे. मग प्रेमाचे हि तेच आहे आपण प्रेम केल्यास तेच आपल्याकडे परावर्तीत होणार, नव्हे होणारच आहे, हे विज्ञान आहे. म्हणून स्वतःचा उत्कर्ष करण्याचे सर्वात सोपे, सर्वस्वी आपल्या हातात असणारे, १००% यशस्वी  साधन  म्हणजे दुसऱ्याचे सतत चांगले चिंतने. मृदू स्वभाव निर्माण झाला कि मानला सात्विकता येते इतकेच काय योग्याच्या तर आवाजालाही मृदुता येते योग्याचा  आवाज  आपल्याला कधीही कठोर ऐकायला येणार नाही.          

No comments:

Post a Comment