Tuesday, 24 April 2012

विनायक" मला याबद्दल बऱ्‍याच वेळा अनुभव आला आहे. हल्ली माझी एकाग्रता थोडी कमी झाल्यामुळे तो येत नसावा. मी पुर्वी अर्धझोपेत असताना माझा देह सोढुन साधारण पाच फुटावरुन माझ्या देहाकडे पाहात होतो त्यावेळी ऐकीकढे आश्चर्य व ऐकीकढे मनात थोडी भिती वाटायची पण मग ते रोज सातत्याने काही दिवस घडत होतं मग थोडी मला त्याची सवय होऊ लागली. पण जसजस मी त्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागलो तशी माझी अवस्था कमी कमी होत गेली. आता तो अनुभव येत नाही. यावर तुमच काय मत आहे?
नमस्कार  श्रीकांतजी    ----- १)आपल्याला  आलेले अनुभव असे सांगू नयेत त्या मुळे पुढे ते येत नाहीसे होतात. २)पुढे येणारे अनुभव वेगळे असू शकतात. ३)प्रत्येक माणसाचे अनुभव वेगवेगळे असे शकतात. ४) हे अनुभव म्हणजे वाटेतले मैलाचे दगड आहेत एव्हढेच ह्याचे महत्व आहे. 
५)समजा आपण एखाद्या प्रवासाला  चाललो आहोत  आणि वाटेत अश्या काही खुणेच्या गोष्टी दिसल्या तर तिथेच थांबत नाही ना. तसे केले त प्रवासच थांबेल. नेमके तसेच आपले होते. त्या  खुणेच्या दगडालाच किंवा गोष्टीलाच आपण कवटाळून बसतो आणि आपले पुढे जाणे थांबते.  ६)जुन्या आलेल्या  अनुभवाचीच  ओढ  लागते म्हणजे आपण त्याच त्या मागील  खुणेशी रेंगाळण्याची मनीषा नकळत धरतो. ७)ती खुण तर मागे निघून गेलेली असते. ती पुन्हा पहावयाची असेल तर पुन्हा मागे जावे लागेल.  ८)जो पर्यंत  माझी तीच ती जुनी  खुण मनातून जात नाही तो पर्यंत प्रवास थांबलेलाच असतो. ९)प्रवासाला जाऊन आवश्यक त्या आपण ठरवलेल्या ठिकाणाला  भेट देवून आल्यावर त्याचे अनुभव लोकांना  सांगतो  तेव्हा तसा प्रवास त्यांना करायचा असल्यास त्यांना आपले अनुभव उपयोगी पडू शकतात. १०)पण इथे तर प्रवास नुसता सुरु झाला आहे. म्हणजे जे ठिकाण पाहायला निघालो आहोत ते खूपच  दूर आहे. आणि शाग्ल्यात महत्वाचे १२)असे अनुभव आल्यामुळे आपण इतरांपेक्षा काहीतरी मोट्ठे आहोत वेगळे आहोत हा अहं भावच जास्त होतो आणि मग तर पुढचा प्रवास पूर्णपणे खुंटतो. 
 ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर आपल्याला वास्तवाचा अंदाज आला असेल. हा आपलाच प्रश्न आहे असे नाही सर्वच जणांचा हा सामायिक प्रश्न आहे. प्रत्येक अशा प्रकारचा अनुभव आलेल्या व्यक्तीस ते लोकांना सांगायची विनाकारण गाई झालेली असते. तसे केल्याने नेमकी मानसिक गती कशी थांबते ते मी इथे सविस्तर सांगितले आहे हे सर्वांसाठीच उपयुक्त आहे.म्हणून आज पोस्ट म्हणून टाकत आहे. शुभम भवतु.         

No comments:

Post a Comment