Tuesday, 24 April 2012

४ प्राणायाम - ब---पूर्वार्ध --- प्राणायाम
रूपक म्हणून एक गोष्ट सांगतो.  राजे राजवाडे लहरी असतात. एका राजाची त्याच्या मंत्र्यावर इतराजी झाली. त्याने त्याला एका उंच मनोर्याच्या शेंड्यात कोंडून ठेवले. सुटण्याचा कोणताच मार्ग नव्हता. पण त्या मंत्र्याची बायको हुशार व धीट होती. ती त्या मनोर्यापाशी आली तेव्हा त्या मंत्र्याने तिला खुणेने काही  सांगितले.  त्यावरून तिने एक नाग्तोड्या आणला. त्याच्या शिंगांना मध लावला. कमरेला रेशीम बांधले आणि त्याला वर तोंड करून भिंतीवर सोडले. तो नाग्तोड्या मधाच्या आशेने वर जात जात उंच टोकावर असलेल्या त्या मंत्र्याच्या खोलीच्या खिडकीशी पोहोचला. मग मंत्र्याने त्या नाग्तोद्याला  पकडून रेशमी सुत पकडले. पुढे त्याला मग  त्याच्या बायकोने जाड सुत बांधले. पुढे पक्की दोरी बांधली. त्याच्या पुढे शेवटी  दोरखंड बांधला आणि एक एक ओढत क्रमाक्रमाने शेवटी हा दोरखंड हाती लागल्यावर तो मंत्री त्या दोरखंडाचा वापर  करून खाली उतरला आणि राजाच्या बंधनातून त्याने आपली सुटका करून घेतली. श्वाशुछावासाच्या क्रिया हि  त्या रेशमी सुतासारखी  आहे. पुढे आपल्या देहातील  ज्ञान्तान्तुतील प्रवाह हे जाड सुतासारखे आहे. मनोवृत्ती हि पक्की दोरी आहे आणि प्राण हा दोरखंड आहे तो ही आला कि मग मुक्ती आणि विश्व्वावर  स्वामित्व असा हा प्रवास आहे. म्हणजे आता आपल्या सत्य लक्षात येईल कि आपण जे काही करतो ते फक्त सुत हाताळणे असते.     
असो तेव्हा आपण आपल्या मर्यादेत जे आहे तेव्हढेच विचारात  घेणार  आहोत. फक्त आपले जुने गैरसमज जावेत हाच आजच्या ह्या लिखाणाचा हेतू आहे.     
******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********  

No comments:

Post a Comment