Tuesday, 24 April 2012

६ धारणा --- चित्त स्थिर ठेवणे. प्रत्याहाराच्या अभ्यासाने मनाला अंतर्मुख होण्याची सवय लागली कि त्याला एकाग्रतेची सवय लावायची आहे. मन १२ सेकंद एकाच एका ध्येयाकडे स्थिर राहू  शकले कि झाली एक धारणा.(त्याच्या १२ पट म्हणजे १४४ सेकंदाचे (२.४ मिनिट) एक ध्यान, व त्याच्या १२ पट म्हजे १७२८ सेकंदाची (२८.८ मिनिट)एक समाधी)  मन वधाल वधाल उभ्या शेतातल ढोर किती हाकला हाकला फिरून येत पिकावर हे जा संत बहिनाबींनी वर्णन केल आहे त्याचा अनुभव आपल्या   सर्वांनाच आहे. हे म्हणजे आवळ्याची मोट बांधणे, वारा मुठीत पकडणे, आणि पारा चिमटीत पकडण्या सारखे आहे सर्व्सामान्न्या माणसासाठी. हे फक्त सवयीने होते होऊ शकते. कारण मन हे जसे भौतिक सुखाचा गुलाम आहे तसेच ते सवयींचाही गुलाम आहे. हवी तशी सवय लावणे  म्हणजेच अभ्यास करणे होय. हा अभ्यास करण्यासाठी माणसाला कल्पकतेची मदत होऊ शकते. प्रत्त्याहारात त्याला आपल्याकडे आणायचे आणि इथे ते हवे त्या ठिकाणी एकाग्र करायचे. त्याला धारणा म्हणतात. कारण मन त्याला आवडत्या ठिकाणी नेहमीच एकाग्र होते पण नावडत्या टिकाणी त्याला एकाग्र करणे असेही अत्यंत कठीण आहे. अशा वेळी आपण ठरवलेल्या ध्येयाकडे वळवणे हा हि अभ्यास करावा लागतो. नावड सुद्धा सवयीने आवड होते. हा हि मनाचाच एक गुणधर्म आहे त्याचा उपयोग करू त्याला योग्य त्या ठिकाणी एकग्र व्हायची सवय लावायची. ह्या साधनेत मनाला  शरीरातील  निरनिराळ्या भागांवर केंद्रित करावयाचा सराव करायचा आहे. विशेषतः आपल्या मेरुदान्दावरील निरनिराळ्या जागेवर मन केंद्रित करायचा सराव करायचा आहे.                  ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********       

No comments:

Post a Comment