Tuesday, 24 April 2012

इ-(१ यम) अपरिग्रह --- परिग्रह म्हणजे दानाचा स्वीकार अ म्हणजे नाही म्हणजे - कोणत्याही प्रकारचे दान न स्वीकारणे. कोणाही कडून कोणत्याही कारणाने दान स्वीकारायचे नाही. माणसाच्या इच्छा त्याच्या दानाबरोबर आपल्याकडे येतात. त्या चांगल्या असतील तर ठीक आहे. त्याने मिळवलेला पैसा जर चुकीच्या मार्गाने लुबाडून दुसर्यास फसवून त्रास देवून मालवला असेल तर त्या त्या व्यक्तींचे त्याला मिळालेले तळतळात आपल्याला भोगायलाच लागतात. इतर माणसांचे सोडा पण हाच नियम आपल्या वाडवडिलान कडून आलेल्या पैशाला सुद्धा लागू आहे. आपल्या वाडवाडीलांचे पैसे आपण जे वारसदार म्हणून स्वीकारतो तेही इथे चालत नाही. कारण त्याबरोबर त्यांचे नशीब सुद्धा आपल्याला भोगायला लागते. इथे राज्योगात तर आपण निव्वळ मुक्ती धडपडत असतो. नव्हे नव्हे विश्वावर स्वामित्व मिळवू पाहत असतो. त्यामुळे. दान स्वीकारल्यामुळे येणारे आपले दास्यत्व व
दुसर्याचे स्वामित्व आपल्यावर येते. ते तर इथे जराही मंजूर नाही. कोणाहीकडचे धन घ्यायचे नाही. अन्न घ्यायचेच झाले तर ते भिक्षा मागून घ्यायचे. कारण भिक्षा हि अनेक जणांकडे मागितली जाते. ती घेतल्यावर जवळपास कोणी गरजवंत सजीव असेल तर आधी त्यातील अन्न त्याला द्यायचे, त्यानंतर आपल्या पोटाला जेव्हढे हवे तेव्हढेच खायचे. बाकीचे कोणाला तरी आधीच देऊन टाकायचे. उद्या देणारा माझा भगवंत आहे तो पाहून घेईल. संचय करायचा नाही. ह्याला भिक्षा म्हणायची. भिक्षा पवित्र असते. संचय केला कि तीच भिक होते, लाचार होते, मनाला लाचार बनवते. मग मुक्ती कोठून मिळायची??? अपरिग्रह हा नेम पाळल्याने पूर्ण स्वाधीनता येते. किंबहुना स्वामित्व येते. आणि विश्वावर-भौतीकावर संपूर्ण स्वामित्व मिळविणे हे तर राज्योगाचे अंतिम लक्ष आहे. चंद्रसूर्याच्या जागा हि ह्याने ठरवायच्या इतके स्वामित्व अभिप्रेत आहे. थोडक्यात काय आपला हात कधीही उताणा असता कामा नये नेहमी उपडा असला पाहिजे.

No comments:

Post a Comment