Tuesday, 24 April 2012

१ ज्ञानयोग -----  योग म्हणजे ----- योगायोग, संधी, जोडणे, ध्यान, ग्रहांची युती आणि आजच्या युगात आपल्याकडे योगासने म्हणजेच योग असेही समजले जाते. क्रमशः जायचे तर  प्रेमयोग, व भक्तियोग, ह्यावरील विवेचन झाले. क्रमाने विचार करायचा तर आता  कर्मयोग,  ज्ञानयोग, शेवटी राजयोग, असायला हवा. पण एकूणच ज्ञानयोगाची व्याप्ती व सामाजिक वास्तव विचारात घेवून मी ज्ञानायोगाबद्दल फक्त तोंड ओळख करून देत आहे.
आज पर्यंत आपण --- प्रेमयोग व भक्तियोग -----  हे दोन योग प्रकार पाहिले, प्रेम योग आणि भक्ती योग. ते दोन्हीही मनाची उत्क्रांती साधून --- मन उन्मन करून --- ईश्वराशी तादात्म्य कसे पावावे ते सांगणारे होते. ह्या साधनेत भावना आणि श्रद्धेला फार महत्व आहे. त्या उलट ज्ञानयोग हा पूर्ण पणे बुद्धी प्रधान योग आहे  हा प्राधान्याने  बुद्धिमान, तर्कनिष्ठ, वैचारिक, विवेकी,  आत्मानात्म विवेक विचाराने जाणू शकणारी व्यक्तिमत्व. अशा लोकांनाच शक्क्य आहे. ह्याला बुद्धियोग सुद्धा म्हणतात. ह्या बाबतीत जाणता, जाणकार, जन्मावा लागतो. समजावणे आणि समजून  घेणे  दोन्ही  कठीण. इथे सर्व बुद्धीचा मामला आहे. अर्थात ईश्वराशी तादात्म्य पावणे हे मनाला उन्मनी करूनच साधायचे आहे हे खरे. पण इथे त्याचे या योगाचे साधन बुद्धी, विचार, विवेक, हे आहे.  त्यामुळे ह्या योगाच्या बाबतीत साधना करणे म्हणाल तर तसे काहीच नाही. सर्व काही समजुतीचा  भाग  आहे.  ज्ञानी हा जन्मावा लागतो. भगवंत सुद्धा ज्ञानी हा मला मीच वाटतो असे म्हणतात. 
वेद विद्या हे सर्व ह्याच्या अभ्यासात येते. तिची व्याप्ती आणि किचकट पणा दोन्हीही प्रचंड आहेत. त्यामुळे ह्या योगाच्या बाबतीत किती सांगावे तेव्हढे थोडेच आहे. सांगायला कठीणही आहे. समर्थ रामदासांचा दासबोध हा ज्ञानयोग प्रधान आहे. अर्थात त्यात सर्व योगांचा परामर्श घेतला गेलेला आहे. पण निव्वळ विचार आणि विवेकाने हि परमार्थ साधता येतो हे समर्थ ठामपणे सांगतात. ज्या (बुद्धिनिष्ठ)माणसाला डोळस पणे परमार्थ साधायचा आहे. त्याने दासबोध जरूर वाचवा. समजायला हि अतिशय कठीण, व अचारायला हि तितकाच कठीण, असा हा ग्रंथ आहे. थोडक्यात सांगता  येण्यासारखा नाही. म्हणून दासबोध आणि तो  हि  श्री. के. वी. बेल्सारेंनी लिहिलेला वाचवा अशी मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करेन. जीन्वानातील प्रत्येक अंगांचा इथे परामर्श घेतला गेला आहे. व्यापक सूक्ष्म म्हणजे तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचेह तर अनुरानिया तोखडा तुका आकाश येवढा हेच ह्या गर्न्थाच्या ज्ञानालाही लागू होईल. अनुभवण्याचा ग्रंथ आहे.

No comments:

Post a Comment