Tuesday, 24 April 2012

क-(नियम)--- स्वद्ध्याय --- म्हणजे वेदाध्ययन ---- वेदांचा अभ्यास करणे. आजच्या युगात ज्या सर्व प्रकारच्या अभ्यासाच्या शाखा आहेत त्या सर्व वेदान्माद्ध्ये आहेत. १४ विद्या आणि ६४ कला ह्या सर्व शाखांमधून आपण आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही एका किंवा अनेक शाखांचे शिक्षण  घेऊ  शकतो. हा अभ्यास खूप व्यापक स्वरूपाच आहे. त्याचे अध्ययन करणे म्हणजे राजयोगी हा पर्यायाने ज्ञानी सुद्धा असायला हवा. त्याचं बुद्धीला सूक्ष्मता  आलेली असायला हवी. कारण त्याशिवाय त्याला गुरूने सांगितलेले समजणार नाही.  स्वाध्याय ह्याचा दुसरा अर्थ स्व-अध्याय असाही आहे. कारण कोणताही अभ्यास सखोल  करायचा असतो त्यावेळी तो स्वतःचा स्वतः करायचा असतो. किंबहुन अभ्यास हा स्वतःचा स्वतःच करायचा असतो. गुरु फक्त तो कसा करायचा ते सांगत  असतो. आणि ज्यावेळी द्विधा मनस्थिती होईल त्यावेळी योग्य तो मार्ग दाखवणे हेच फक्त गुरुचे काम असते. मी जन्माला आलो. त्यानंतर ---- उपडा वळू लागलो --  पुढे सरकू लागलो -- रंगू लागलो -- बसायला लागलो -- उभे राहायला लागलो -- चालायला लागलो. -- शब्द बोलायला लागलो, --  व्याकरण न शिकता ऐकून ऐकून वाक्य समज पूर्वक म्हणायला लागलो. ह्या पैकी कोणत्याही क्रियेच्या वेळी माझी उत्सुकता जिज्ञासाच मला पुढे नेत गेली. तीच जिज्ञासा मला इतर सर्व सोडून केवळ राजयोग अभ्यासायला लावेल. आज स्पून फीडिंग होते.  म्हणून  विद्यार्त्याला  समजत नाही निव्वळ पोपट किंवा पढत मूर्ख तयार होतात. आणि मग वास्तविक जगात जगायला कठीण जाते. आपल्याकडे शिक्षण म्हणजे पाठांतराची स्पर्धा झाली आहे. आणि माहितीलाच आम्ही ज्ञान सामाझातो. ती हि बऱ्याच वेळा अर्धवट असते. किंवा एकाच गोष्टीच एखादाच पैलू आपल्याला महित असतो त्यावरू आपण स्वतःला बरोबर समजतो पण त्याच गोष्टीचे इतरही अनेक पैलू असू शकतात. हि जाणीव ठेऊन वागल्याने गैरसमज होत नाहीत. निव्वळ माहिती म्हणजे ज्ञान नसून, आपल्याला असलेली माहिती, स्थळ, काल, वेळ, गरज, ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन कशी  वापरायची त्याची जाण असणे म्हणजे ज्ञान. हि जाण नाही हे आजचे सामाजिक वास्तव आहे म्हणून कलहात कलह  असे  समाजाचे  दुर्धर स्वरूप झाले आहे. त्यासाठी जरा गांभीर्याने अभ्यास  करण्याची गरज आहे. माहितच वापर स्थळ, काल, वेळ, परिस्थिती, हेतू ह्यासार्वांचा विचार करून करता येणे ह्याला ज्ञान म्हणतात. त्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता असते. ती स्वध्यायाने तयार होते.                  

No comments:

Post a Comment