८ समाधी --- एखाद्या गोष्टीवर दीर्घ काल मन एकाग्र होण्याची सवय दृढ झाली कि मग त्या गोष्टीच्या अर्थावर मन एकाग्र करणे जमले म्हणजे समाधी. हि अवस्था पूर्णपणे अनुभवायची आहे. कोणीच कुणाला सांगू शकत नाही सांगता येणार नाही आणि सांगून समजणार नाही. मन एखाद्या गोष्टीवर एकाग्र करणे (धारणा) तिथे दीर्घ काल ठेवणे (ध्यान) आणि त्या गोष्टीच्या अर्थावर मन स्थिर करणे आणि दीर्घ काल ठेवणे म्हणजे समाधी. धारणा, ध्यान, आणि समाधी सर्व एकत्रित साधते त्याला संयम म्हणतात. मन ज्यावेळी अर्थावर एकाग्र होते त्यावेळी स्थिर मन म्हणजे काय ह्याचा अनुभव येतो. तो ज्याचा त्याने अनुभवायचा असतो. कारण तो व्यक्ती परत्वे वेगवेगळा असतो. पण सामान्न्य अनुभव, जर कोणता असेल तर आनंद आणि प्रसन्नता पुढे दीर्घ काल अनुभवणे. समाधीचा कालखंड म्हणजे कमीत कमी सुमारे अर्धा तास तरी (२८.८ मिनिट) एकाग्रता टिकली/राहिली पाहिजे. अर्थात वेळ पाहत झालेली एकाग्रता काही कामाची नाही. ती मुळात एकाग्रताच नव्हे. ताल्लीनातेतून बाहेर आल्यावर तो कालखंड अर्ध्या तासापेक्षा जास्त असेल तर आपल्याला असे समजायला हरकत नाही कि आपण पुढे प्रगती करू शकतो. इच्छित ध्येयाकडे व त्याच्या अर्थाकडेही मन पूर्णपणे स्थिर होणे, एकाग्र होणे, म्हणजे समाधी. समाधीचे प्रमुख दोन प्रकार १-सविकल्प समाधी २-निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधीत माणसाला भोवतालच्या गोष्टीचे किंवा मनात येणाऱ्या इतर गोष्टींचे भान असते पण तिकडे लक्ष न जात तो आपल्या ठरवलेल्या गोष्टीकडेच मन केंद्रित करू शकतो. आपण ह्या प्रकारचा अनुभव भौतिक कार्य करतांना बऱ्याच जणांनी घेतलेला असतो. आपण आपल्या कामात व्यस्त झालो कि बाह्य जग विसरतो. हि पण एक प्रकारची सविकल्प समाधिच आहे. थोडक्यात मी असे म्हणेन सर्वसामानन्य माणसाला वर्णन करून सांगितल्यास कि सविकल्प समाधीची कल्पना येवू शकते. हे अनुभवाची तुलना करण्या साठी सागतोय. पण मनाने मनावर मन एकाग्र करून हा अनुभव घेणे आणि संपूर्ण विश्वाचा भाव मनातून नष्ट होणे. हा अनुभव सांगता येत नाही.
निर्विकल्प समाधीत कोणतेच विचार राहत नाहीत संपूर्ण शांत म्हणजे नेमके काय ह्याचा हि अनुभव येतो. पूर्ण रिकामे मन अहं चा बोध पूर्ण नष्ट होणे. पण ह्या पलीकडे हि बरेच काही असते कि जे ज्याचे त्याने अभ्यासायचे आहे. शुभम भवतु.
आत्तापर्यंत अष्टांग योगाचे ५ बहिरंग आणि ३ अंतरंग ह्याच्या स्थूल गोष्टींचा विचार केला. ह्या सर्वाची परिणीती कुंडलिनी जागृतीत होते. प्रेम, भक्ती, कर्म, ज्ञान, आणि राज ह्या पांचही मार्गाचे अंतिम ध्येय परिणीती कुंडलिनी जागृतीच आहे. पण राजयोगाच कुतूहल सर्वसामान्य माणसाला जास्त आहे कारण त्यात चमत्कार अनुभवायला येतात. वास्तविक तो भाग दुर्लक्षित करावयाचा आहे.
पुढे त्या बाबतची संग्रहित माहिती देणार आहे. ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********
No comments:
Post a Comment