४ प्राणायाम - अ---पूर्वार्ध --- प्राणायाम म्हटल्यावर आपल्यासमोर श्वाशोछावासाचे प्रचलित प्रकार येतात. जे आजच्या समाजात मोठ्या प्रमाणात शिकले, शिकवले जातात. त्यालाच आपण प्राणायाम सामाझतो ते मुळात सर्वस्वी चूक आहे. श्वाशोछावासाशी प्राणायामाचा संबंध असला तरी तो खरोखरच अगदी थोडा आहे. खरा खरा प्राणायाम साधण्यासाठी ज्या अनेक क्रिया कराव्या लागतात त्यांपैकी श्वाशोछावासाचे नियमन हि केवळ एक क्रिया आहे. प्राणायाम म्हणजे प्राणांचा आयाम म्हणजे संयम. प्राण म्हणजे विश्वरूप चालवणारी शक्ती जिचा औंश आपल्या देहातही वास करत असतो त्यावर संपूर्ण विजय मिळवणे. हा प्राणायामाचा खरा अर्थ आहे, आणि हेतू आहे. साऱ्या विश्वाचे ज्ञान मिळवायचे झाले तर माणसाला अनेक जन्म पुरणार नाहीत म्हणून ज्या शक्तीच्या योगे ह्या सर्व विश्वाचा व्यापार चालला आहे, ते त्याचे मूळ, म्हणजे, जो प्राण, तो जाणणे, त्यावर स्वामित्व मिळवणे, म्हणजेच प्राणायाम होय.
सागरातील पाण्याचा एक बिंदू हा त्याचा एक भाग असतो औंश असतो. त्यामुळे त्या बिंदुला जाणल्याने सर्व सागराला जाणले जाते. त्याच प्रमाणे आपल्यातील प्राणांवर ताबा मिळविता आल्यास समस्त विश्वावर ताबा येतो हे सरळ आहे.
ज्या गोष्टी त्याच्या जवळ आहेत त्यांना जिंकण्यापासून प्राणाला जिंकायची सुरुवात करायची आहे. आपल्याला सर्वात जवळची गोष्ट म्हणजे देह आणि मन. जो प्राण विश्वात सर्वत्र खेळत असतो त्याचा जो अंश आपले हे शरीर आणि तो प्रानौंश आपल्याला सर्वात जवळचा आहे. म्हणून त्याच्या पासून सुरुवात करयची. ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********
No comments:
Post a Comment