ब-(नियम) --संतोष --- समाधान ---- एव्हढे सर्व कष्ट देह आणि मनाला देऊन तप करायचे तरीही मन सतत प्रसन्न ठेवायचे. समाधान सतत प्रसन्न राहणे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे आगर. आपण कि नाही, खरोखरच बऱ्याच वेळा विषन्न असतो. करणे काहीही असतील पण प्रसन्न नसतो हे खरे. अर्जुन विषाद योग हा एकच योग आपण सर्वच दीर्घ काळ अनुसरत असतो. हे ऐकायला जरा वाईट वाटेल पण खरे आहे. आजच्या काळाचे ते वास्तव आहे. कारण आपल्या आनंदाला काहीना काहीतरी कारण लागते. त्याशिवाय आपण आनंदी राहत नाही. आनंदासाठी आनंद जर अनुभवला तर मी काय म्हणतो त्याची प्रचीती येईल. तसे नसते तर आज तरुण वर्ग सुद्धा ज्या अघोरी रोगांना बळी जातांना दिसतो ते तसे झाले नसते. प्रेमाचा अभाव त्यात अहंकार राग, त्वेष, भीती हि त्याची करणे आहेत. आपला आनंद फक्त, यश, कीर्ती, पैसा, आणि वासना ह्या सामावलेला आहे. आणि हे सर्व सतत कसे मिळतील. इथे प्रेमासाठी प्रेम, तसा आनंदासाठी आनंद, तशी प्रसन्नता हवी. मग सिद्धी चालत येतील. तपाने शरीर व संतोषाने मन तयार ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे वीज जशी धातुतून त्या धातूला इजा न करता सहज वाहू लागते आणि तिची रुपांतरे निरनिराळ्या रुपात करते, तशाच सिद्धी आपल्या देहातून सहज प्रवास करतील आपल्याला आलिंगन देतील. आणि विविध प्रकारे प्रकट होतील. पण त्यात गुंतून पडायचे नाहीये. कारण राजायोग्याचे अंतिम ध्येय मुक्ती आहे.
No comments:
Post a Comment