Tuesday, 24 April 2012

४ प्राणायाम - क -- प्राणायाम -- प्राणायामाचे बाह्यांग -- श्वाशोचावासाचे नियमन -- पूरक, कुंभक, रेचक,  हि  सर्व्सामान्ण्यातः  प्राणायामाची  मुख्य ३ अंगे  आहेत. (अलीकडे ह्या विषयावर  अनेक अनेक संस्था आपल्याला हे शिकवायला सिद्ध आहेत.) पूरक म्हणजे भरणे, श्वाश घेणे. कुंभक म्हणजे श्वाश ताब्यात ठेवणे. आणि रेचक, म्हणजे श्वाश सोडणे, रिकामे करणे. प्राणायामाचे ३ प्रकार आहेत. पण नवीन  माणसास  सुरुवात करण्यासाठी प्रथम कमी कालावधी सांगितलेला आहे. ४ सेकंद पूरक १६ सेकंद कुंभक आणि ८ सेकंद रेचक ह्या प्रमाणात प्राणायाम करावा. पुढे ह्याचा अवधी वाढवत न्यावा. पण सर्व प्रकारात पूरक कुंभक व रेचाकाचे परस्पर प्रमाण वर दिले आहे तेच वापरायचे आहे. पुढे पूरक, १२ सेकंद, पूरक २४ सेकंद, व पूरक ३२ सेकंद असतो त्यां प्रमाणात कनिष्ठ, मद्ध्यं, उत्तम प्राणायाम असे प्राणायामाचे प्रकार आहेत. कनिष्ठ प्राणायामात घाम येतो, मद्ध्यं प्राणायामात शरीराला कंप सुटतो, आणि उत्तम प्राणायामात आसनावरून उत्थान होऊन  अतिशय  आनंद  वाटू  लागतो. पुढील प्रार्थना ह्यावेळी  मनात  म्हणावी. ))))) ह्या विश्वाला जन्म  देणाऱ्या त्या ज्योतिर्मय  परम  पुरुषाच्या महिम्याचे मी ध्यान करतो तो आमच्या बुद्धीत  ज्ञानाचा विकास करो.((((( गायत्री मंत्राचा हा मराठी भावार्थ आहे.  रोज निदान दोनदा तरी   अभ्यास  करायला  हवा.  त्यासाठी  सर्वात चांगल्या वेळा पाहत आणि संध्याकाळ. 
कुंभक हा मात्र श्वाश आत  ओढल्यावर जसा रोखून ठेवतात तसाच स्वास बाहेर सोडल्यावर सुद्धा करतात. ह्यामुळे प्रथम दिलेल्या प्राणायामाच्या सर्व प्रकारांचे आणखी प्रत्येकी दोन प्रकार होतात. पण  साधारणतः  बाहेर कुंभक रोखून धरणे हे कमी धोकादायक आहे. श्वास आत घेऊन  कुंभक करणे हे फार ताणून धरून करू नये. 
ह्या प्रत्येक  क्रिया  किती वेळ करायच्या  त्याला व्यक्तिपरत्वे निरनिराळ्या मर्यादा आहेत. सर्व प्रकारांचा  प्रयोग  करून वेगवेगळे  अनुभव  घेता येतात. आपल्याला  कोणता  प्राणायाम योग्य ते आपण आपल्या शिक्षकाकडून नक्की करून घ्यायला हवे.  अत्यंत हळू हळू आपला  कालखंड  वाढवावा. जराही घाई करू नये. बाह्यतः  आपण  जो  प्राणायाम करतो तो शरीराला संतुलित करतो, त्याचे नियमन करतो. हा बाह्य भाग आपण सर्वत्र शिकू शकता. 
पण प्रत्यक्षात  प्राणांचे नियमन करायचे असते त्यासाठी योग्य गुरु शोधावा. मी तर म्हणेन, आपली तळमळ खरी असेल तर योग्य गुरु आपल्याला लाभेलच लाभेल. हीच  ईश्वरचरणी प्रार्थना.      
******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********       

No comments:

Post a Comment