Tuesday, 24 April 2012

ड-(१ यम) ब्रम्हचर्य --- लग्न न करणे व ब्राम्हचार्याचे काटेकोर पालन करणे, आपल्या शास्त्रात जे काही दिलेले असते ते प्राधान्यतः पुरुषानबद्दल लिहिलेले असते. पूर्वी स्त्रिया  समाजात  वावरत नसत. कारण त्यांना तो अधिकारही नव्हता. अधिकार ह्या शब्दाचा इथे अर्थ पात्रता असा घ्यायचा आहे. कारण निसर्ग निर्मित स्त्री पुरुष भेद जो आहे, त्यामुळे दोघांना वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्गदत्त शक्ती लाभलेल्या आहेत. यांचा त्याच पद्धतीने अवलंब करून सहज यश मिळविणे हाच त्या मागचा उद्देश होता. त्यातून पुढे पुरुष प्रधान संस्कृती केव्हा कशी निर्माण झाली ते इतिहास जाणे. पण त्यामुळे त्याचे विकृत स्वरूप समाजात निर्माण झाले. आणि त्यातून विकृत सामाजिक कलह निर्माण झाले. काही बाबतीत तर काही विशिष्ट प्रकारच्या गृहस्थाश्रमी कर्मांचे  पालनही  स्त्रियांना निषिद्ध असायचे. त्यामागचा मूळ उद्देश लोप पावला. आणि एक प्रकारच सत्ताधीश पणा निर्माण झाला. माहितीलाच ज्ञान समजून त्यातून निर्माण  झालेल्या अज्ञानाचे हे फळ आहे. अजूनही समाजात माहिती म्हणजेच ज्ञान हाच मोठ्ठा गैर समज आहे. त्यातून पूर्वीच्या गैरसमजात भर पडून  अधिकाधिक  सामाजिक कलह निर्माण होत आहेत. ------- असो ----- त्यामुळे हे सर्व विचार व विचारसरणी प्रधान्न्यपणे पुरुषांना लागू होते. किंबहुना हा योग पुरुषासाठीच आहे असेही वाटू शकते. ---- देह, बुद्धी, आणि मन ह्या तीन  मिळून माणसाचे व्यक्तिमत्व प्रकट होते. त्यात श्रीमंतीची सुद्धा भर पडते. चेहरा व शरीर सुंदर दिसणे हे नशीब आणि महिनातीचे फळ आहे. त्यात भर म्हणून बुद्धीचे  तेजही  माणसाच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसते. त्यात अधिक --- स्वस्छ आणि पवित्र मनाचे प्रसन्नपण  त्याच्या  सुंदर दिसण्यात भर घालते. नशिबाने जर तो श्रीमंत घरात जन्माला असेल तर त्याचे  हि तेज त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की आणखीन प्रभावी करते. ------- ह्या सर्वांवर कडी म्हणजे !!!ब्रम्हचर्य!!! ते जर कडकडीत असेल तर त्याचे तेज ह्या सर्वांहून विलक्षण दिसते. कडकडीत ब्राम्हचार्यामुळे  माणसामध्ये जी शक्ती निर्माण होते, त्याला  ओज  शक्ती असे म्हणतात. (तेच ओज, तेजस्वी वलय रूपाने आपण देव संत ह्यांच्या मागे चित्रात दाखविण्याची प्रथा आहे. अर्थात ह्यात ओजा प्रमाणेच सात्विकता सुद्धा त्यात असते) (ह्या वलयांच्या बाबतीत निरनिराळे रंग असतात, असे ज्ञानी सांगतात.)  ते अधिकारी  (ते बघण्याची पात्रता असलेल्या) पुरुषाला दिसतात.  त्यातील मला म्हाहीत आहेत तेव्हढे सांगतो. पांढरा - सत्व,  स्वच्छ,  सत्य, संतत्वाचा आहे, हीच पंढरी म्हणजे पांढरी. सुक्ष्मसाही कलंक नसलेले पांढरेपण.   लाल - विषयासक्त माणसाच्या भोवती दिसते. काळा  - पैशाचा  हव्यास  असलेल्या आत्यंतिक लोभी व्यक्तीभोवती दिसते. (हे रंग संतांना दिसतात असे म्हणतात) ब्राम्हतेज असलेला माणूस मात्र कोणालाही सहज आकर्षित  करतो.  ब्राम्हच्र्याचे तेज--- ओज लपत  नाही. हा माणूस नेहमी प्रसन्नच असतो.असा माणूस सर्वार्थाने आकर्षित दिसतो.  प्रधान्ण्यातः वैषयिक रित्या आकर्षक  असतो. (आजच्या भाषेत सेक्सी).  हे ओज म्हणजेच  आजकाल  ज्याला ओरा  म्हणतात तो होय. कडकडीत ब्रम्हचर्य पालन हि सोपी गोष्ट नाही. पण ती ह्या योगाचा पाया आहे, आणि कळसही  आहे. ते शक्य नसेल तर चुकुनही ह्या मार्गाचा विचारही करू नये. वेड सुद्धा लागू शकते. इतके  ह्याचे  महत्व आहे. कामाच्या पूर्ण निर्दालानाशिवाय कुंडलिनी  जागृती  शक्य नाही असे जाणकार सांगतात.   

No comments:

Post a Comment