Tuesday, 24 April 2012

१ यम --- ह्या मद्ध्ये अ-अहिंसा, ब-सत्य, क-अस्तेय, ड-ब्रम्हचर्य, इ-अपरिग्रह, ह्या चारहि गोष्टी काटेकोरपणे पाळायच्या आहेत. प्रत्येक गोष्ट १००%च केली गेली पाहीजे. मधली टक्केवारी इथे (ह्या योगाला) मंजूर नाही. खरे तर प्रेम आणि भाक्तीलाही साधनेची अर्धवट  टक्केवारी मान्य नाही. पण भावना  ज्यावेळी पराकोटीला पोहोचते,  तेव्हा ह्या सर्व गोष्टी अपोआप घडतच जातात. तिथेही अंतिम १००% च अपेक्षित असते. पण त्यासाठी मुद्दाम वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. किंबहुना मनाची  आत्यंतिक  तळमळ हे सर्व घडवून आणते. म्हणजे साधकाला १००% तयार करते. हे सर्व घडायला वेळ लागतो तो प्रत्येकाचा वेगळा असतो तो ह्याच मुळे हि अंतिम टक्केवारी गाठायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. ह्या साधनेत मानाच्या इच्छा, देहाच्या इच्छा, बुद्धीच्या इच्छा, ह्यांच्या सर्व ओढताणीवर सतत मनाने लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे मनाला आत्यंतिक ताण आल्याने, थकवा येतो. सर्वसामान्य माणसाला ह्याची सवय नसते. त्यामुळे वारंवार निराशा होण्याची संभावना असते. मन खूपच  खंबीर,  कठोर, असावेच लागते. तरीही प्रेमशुन्न्य नसते. म्हणजे खरोखरच तारेवरची कसरत असते. ह्या सर्व साधनेच्या काटेकोर पणामुळे हि माणसे  समाजात  वावरायला  नालायक (हा शब्द नालायक म्हणजे वाईट नाहीत पण योग्य नाहीत एव्हढाच घ्यायचा आहे) ठरतात. बरीचसी विक्षिप्तच वाटतात. आणि ते स्वाभाविकही आहे. म्हणूनच  हि साधना करणारे सहसा समाजात वावरत नाहीत. वानप्रस्थाश्रम स्वीकारतात. आपल्याकडे ब्राम्हचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम,  आणि संन्यासाश्रम  असे  क्रम  सांगितले आहेत. हि साधना करणारे ब्राम्हचार्याश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ह्या तिघांचा एकाचवेळी अवलंब करतात.   

No comments:

Post a Comment