Tuesday, 24 April 2012

२ नियम --- ह्या मद्ध्ये अ-तप, ब-संतोष, क-स्वद्ध्याय ह्या तीन गोष्टी येतात. तापाने शरीर तयार करणे आणि देहबुद्धी घालवणे संतोषाने मन तयार करणे आणि स्वध्याने बुद्धी तेजस्वी सूक्ष्म करणे.
अ -(नियम)-तप --- तप म्हणजे साधना.  साधनेत अनेक प्रकार येतात. ते रोज नियमाने पाळणे अत्यावश्यक आहे. राजयोगाच्या साधनेत मना  बरोबर  आपण आपल्या शरीरालाही योग्य त्या सवयी लावायच्या असतात. आपले शरीर जणूकाही एक मशीन आहे अश्या प्रकारे त्याला बनवायचे जेणेकरू  ज्या  ईश्वरी शक्तींची आपण आराधना करणार असतो, त्या शक्ती धारण करायला आपले शरीर तितकेच बलवान असायला हवे. बारीक सारीक रोग सुद्धा त्याला शिवता कामा नाहेत. समजण्यासाठी एक उदाहरण देतो. आपल्याला विद्दुत शक्ती माहित आहे. लाकूड किंवा तत्सम पदार्थाला स्पर्श झाला तर विद्दुत शक्ती त्यातून प्रवाहित होत नाही. आणि जिच्यातून ती प्रवाहित होत नाही तिच्यामधून कोणताच परिणाम (फळ) व्यक्त झालेला आपल्याला दिसत नाही. पण धातूला त्यातही तांबे, रूपे, सोने ह्यांना विजेचा स्पर्श झाला तर त्यातून ती वाहू लागते व आपला परिणाम दर्शविते जसे. त्या त्या धातू प्रमाणे उष्णता,  प्रकाश, गती वगैरे शक्तीत तिचे रुपांतर होते. तसेच इथे आहे आपले शरीर त्या आपल्याला अपेक्षित असलेल्या सर्व प्रकारच्या शक्तींना धारण करून आवश्यक ते परिणाम  साधण्यासाठी - अनुभवण्यासाठी सुयोग्य - समर्थ (समर्थ म्हणजे दिसायला जिम बिल्ड नव्हे) बनवणे हे ह्या साधनेत  अपेक्षित  आहे.  त्यासाठी  आणि मनाला सराव व्हावा ह्यासाठी तप केले जाते. देहबुद्धी नष्ट करणे हा तप करण्या मागचा मुख्य उद्देश आहे. तप म्हणजे सातत्य असाही अर्थ आहे (practic  makes a man perfect) तपाचे अनेक प्रकार आहेत. आणि पद्धतीही अनेक आहेत. त्यातही व्यक्ती परत्वे निवड करणे योग्य होते. काही जण तर मुद्दाम कठोर तपश्चर्या करतात. म्हणजे साधने साठी सुखासन म्हणजे सोपे सहज आसन घ्यायच्या ऐवजी शीर्षासन वगैरे कठीण आसनातच साधना करायची. हेतू हा कि देहाला स्वतःहून इतका त्रास त्यायचा कि देहबुद्धी समूळ नसत झाली पाहिजे. खुन्द्लिनी शक्ती हि पाठीच्या कण्याच्या मुळाशी असते व तिला जागृत करून मस्तक पर्यंत न्यायचे म्हणजे माणूस मुक्त होतो असे म्हणतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेण्यासाठी उलटे राहून उपासन करायची असाही काही जणांचा ग्रह असतो. एकूणच सर्व प्रकार अत्यंत कठोर आहे. पुराण  काळात तर शेकडो हजारो वर्षे आपस्चार्या केल्याचे वर्णन केलेले आढळते. देहबुद्धी घालवणे म्हणजेच देहाहंकर घालवणे, म्हणजेच आत्मबुद्धीचा  विकास  करणे. भगवंताला समोरासमोर जाणण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी, शरीर व मन दोन्ही तयार करणे आणि बुद्धीनेही परिपक्व होणे कि जिच्यामुळे मी भगवंताला जाणू शकणार नाही ह्याची जाणीव होणे. आणि मन उन्मन होणे घडेल.       

No comments:

Post a Comment