३ ज्ञानयोग ------- ज्ञानाची इच्छा होणे हेच ज्ञान्साम्पादानाचे सर्वात मोठे साधन आहे. जिज्ञासे शिवाय ज्ञान होणे शक्यच नाही. जिज्ञासे बरोबर शोधक वृत्ती, चिकाटी, अथक प्रयत्न, एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची कुवत, बुद्धी, मन आणि शरीर सर्व एकवटून त्यात घुसायची तयारी. हे सर्व लागते. पैसा आणि लौकिका बद्दल संपूर्ण उदासीनता व निस्वार्थीपणा हा परमार्थाचा प्राण आहे कारण स्वार्थ नाही तोच मुळी परमार्थ. कागदी पुस्तकांचा प्रचार करून दासबोधाचा प्रचार कधीच होऊ शकणार नाही हे माझे मत कदाचित समर्थ असते तर त्यांनीही मानन्य केले असते नक्की, कारण अनुभव घेणे हेच दासबोधाचे सार आहे. परमार्थाचे सार आहे. त्याचा ध्यास लागो हीच सदिच्छा.
कर्मयोग ----- कर्मयोग हा संसारी माणसांसाठी सर्वात महत्वाचा म्हणून शेवटी लिहिणार आहे. इथे श्रद्धा, भावना, कर्तव्य कठोरता एकाच वेळी साधणे हि तारेवरची कसरत आहे. त्रिवेणी संगम आहे. आपल्या सर्वांचा सर्वात जवळचा आप्त, मित्र, ,सखा, असा हा योग आहे. असे माझे मत आहे. तसे भक्ती आणि प्रेम हे सुद्धा संसारी माणसांसाठी आहेत पण तिथे बऱ्याच वेळा माणसाला भावना विवश करतात आणि माणूस योगापासून दूर जातो. काम्योगाचे तसे नाही. प्रत्येक माणसाच्या अत्यंत गरजेचा असा हा योग आहे. तसे सखोल विचार केल्यास असे जाणवते कि सर्वच योग हे काही औंशी एकमेकात मिसळलेले आहेत. जसे इंद्रधनुष्याचे रंग. रेघा मारून वेगळे करता येत नाहीत. तरीही मन, बुद्धी, आणि शरीर, ह्यांच्या प्रधान्ण्यातेनुसार त्यांचे वर्गीकरण करण्याचा आत्तापर्यंत मी प्रयत्न केला आहे. ---------- आता उद्यापासून राजयोग सुरु करणार आहे.
No comments:
Post a Comment