Tuesday, 24 April 2012

 क-(१ यम) अस्तेय --- स्तेय म्हणजे चोरी. अ म्हणजे नाही. म्हणजे चोरी न करणे. स्वतः तर चोरी करायची नाहीच. पण चोराला चोरी करणार्याला  कळत  नकळत सुद्धा साथ न देणे. साधकाने तर चोरीचे विचारही मनात येवू न देणे अत्यावश्यक आहे. कारण कोणत्याही क्रियेची सुरुवात - प्रथम मनात  इच्छा  निर्माण होते --- त्यानुसार -- मानतील भाव मग --- मनातील  विचार ---- त्यांना  अनुसरणारे शब्द -- त्या पाठोपाठ मग कृती ---- ह्या क्रमाने घडत असते. म्हणून सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा व  अपेक्षांना मुळातच निर्माण होऊ न देणे आवश्यक असते. हा नियम वास्तविक सर्वच प्रकारच्या आचरणासाठी आहे. कारण  भौतिकाच्या दास्यातून मुक्त होणे, --- नव्हे, नव्हे, त्याच्याही पुढे जावून ---- भौतीकाला आपला दास बनवणे हे ह्या योगाचे (राज्योगाचे) ध्येय आहे. त्यामुळे कोणत्याही मोहाचा लवलेशही राहता कामा नये. चोरी पासून अशा प्रकारे अंतर्बाह्य मुक्त होऊ शकणार्या व्यक्तीला संपत्ती/ऐश्वर्य प्राप्त होते. (हि एक प्रकारची सिद्धी आहे. अस्ठ सिद्धी पुढे दिल्या आहेत पण त्या व्यतिरिक्तही काही सिद्धी असतात त्यातील एक वाचा सिद्धी वर प्रामाणिक पानात दिली आहे) आणि ते सात्विक असते. संपत्ती सुद्धा आपण ज्या वृत्तीने आणि मार्गाने मिळवतो त्या प्रमाणे सात्विक संपत्ती, राजस संपत्ती, तामस संपत्ती असते, त्या त्या प्रमाणे त्या त्या वृत्तीचे भोग निर्माण होतात, आणि तसे ते भोगावे लागतात. म्हणजे सात्विक, राजस आणि तामस ज्या मार्गाने संपत्ती मिळविली असेल तसे भोग भोगावे लागतात. पण त्या संपत्तीत गुंतला तर पुन्हा योग बाजूला राहतो. म्हणूनच सिद्धीपासून दूर राहावे असे म्हणतात. आपल्या एखाद्या गोष्टीची  चोरी  झाली तर आपल्याला किती मानसिक वेदना होतात? ह्याची जाणीव  प्रत्येकाला आहे. मग आपण जर दुसऱ्याचे काही त्याला न काळात घेतले तर त्याला होणाऱ्या वेदनांमुळे  त्याचा होणारा  तळतळाट आपल्याला तसेच भोग भोगायला लावतो. आपल्याला तर सर्वस्वी  स्वतंत्र व्हायचे आहे. कोणाचाही शाप (शाप आणि वर ह्या विषयी पुढे केव्हातरी माहिती येईलच) घ्यायचा नाही. चोरी तर सोडाच पण एखाद्याची पडलेली (हरवलेली)गोष्ट सापडली तरी ती घेऊ नये ती हि चोरीच आहे. कारण ती गोष्ट त्याच्याच दुर्लक्षित पणा मुले त्याने गमावली असेल तरी त्याच्या मनाला ते जाणवल्यावर यातना होतच असतात.  त्या आपल्याला भोवतात. त्यामुळे हे सर्व काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक आहे.          

No comments:

Post a Comment