७ ध्यान --- एकाग्र मनाने ईश्वराची प्रार्थना करणे. प्रत्त्याहाराने मनाला आपल्याकडे आणणे आणि मग त्याला हवे त्या विषयावर केंद्रित करणे म्हणजे धारणा. धारणा स्थिर झाली कि ध्यान होते त्याचे कालमापन मी पूर्वीच दिले आहे. मनाला बाह्य विषयावर केंद्रित करणे फारसे कठीण नाही. कारण ती त्याला सवयच असते. त्या पासून सुरुवात करून तिथे त्याला दीर्घ काल स्थिर ठेवता आले कि पुढे त्याला स्वतःच्या शरीरातील एकेका अवयवावर केंद्रित करायची सवय करायची. हा सगळा प्रकार सवयीने करता येतो पण रोज अभ्यास करायला हवा. आपण डॉक्टर कडे जातो तो आपल्या शरीर कुठे काय गडबड झाली आहे ते पाहून निदान करतो पण त्याला स्वतःच्या शरीरात काय चालले आहे ते माहित नसते. इथे आपण आपल्या शरीरात काय चालले आहे ते शोधायचे आहे. प्रत्येक अवयवावर मन केंद्रित करून स्नायूंवर मन केंद्रित करून त्याला जाणून आपल्या इछेच्या ताब्यात आणायचे आहे. स्वाधीन करायचे आहे. काही दिवसापूर्वी एका फेस बुक मित्राने विचारले, काही अनावश्यक विचार मनात येत आहेत ते काढून टाकू का? खरतर प्रश्न सोपा सरळ आहे उत्तर पण सोपे सरळच आहे पण ते कृतीत आणणे किती अवघड आहे? मी त्याला सांगितले, जरूर, पण जमले तर मला नक्की सांगा. तांदुळातील खडे निवडणे सोपे आहे पण मनातील खडे निवडणे खूप कठीण आहे. अहो नाहीतर सगळे राजयोगीच झाले असते नाहीका. दुसरे काहीच नको. पण तेच अत्त्यंत कठीण आहे. म्हणूनच त्याचा अभ्यास प्रदीर्घ काल करावा लागतो. ते जमण्याचा कालखंड व्यक्तिपरत्वे वेगळा आहे. पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून लिहितो आहे कि स्वामी विवेकानंदानी त्यांच्या मित्राच्या ""ह्या (श्री रामकृष्ण परमहंस) अशिक्षित माणसाला तू आपला गुरु का केलास"" ह्या, प्रश्नाला उत्तर दिले आहे कि, ""माणसाचे मन बदलण्याची क्षमता फक्त ह्या मनासात होती म्हणून मी ह्यांना गुरु केले."" म्हणजे मन आवरणे त्याला हवेतीथे केंद्रित करणे हे किती कठीण आहे ह्याची कल्पना येईल. हे करणे म्हणजेच राजयोग. कि ज्या मार्गाने दुसरीकडे कुठे हि न पाहता फक्त आणि फक्त मुक्तीच्या मार्गाची कास धरणे आहे. ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत*********
No comments:
Post a Comment