अ ----- राजयोग प्रस्तावना ---- राजयोगी जन्मावा लागतो. पण तो योग साधण्यासाठी साधनेला सुद्धा प्रचंड महत्व आहे. ज्ञानयोगात बुद्धी प्रधान आहे, तर राजायोगात मनाइतकेच शरीराला प्राधान्य आहे. किंबहुन राज्योगात मन बुद्धी आणि शरीर तिघांनाही महत्व आहे म्हणूनच राजयोग. राजयोग हा कठीण आहेच दासबोधातील पहिल्या ५ अंगांतील माहिती सामाजिक मूल्यांबाबत बरेच काही सांगून जाते. त्यामुळे हा योग सामाजिक दृष्ट्या हि महत्वाचा आहे. म्हणून सविस्तरच लिहिणार आहे. इथे चुकीला क्षमा नाही. जसे कॉम्पुटर मद्ध्ये एक ठिपका चुकला, किंवा स्पेस चुकली, नको तिथे पडली, कि सर्वच चूक, तसेच इथे आहे. एकूणच अत्यंत शिस्तबद्ध आणि कठोरपणे अचारायचा असा हा योग आहे. शरीर हे सुद्धा मनाइतके कणखर/कठोर बनवायचे आहे कि ज्यामुळे मानसिक शक्ती प्रभावी पणे आणि ---- !!!स्वमित्वाने !!!----सिद्ध करता येतात. हा अनुभव घ्यायचा आहे. त्यामुळेच राजयोग हा योग प्रकार फार कठीण आहे. संसारी माणसांसाठी हा फारसा उपयोगी नाही. हा संन्यास्यांसाठीच आहे. हठ योगातील बर्याचशा क्रिया ह्या योगातही आहेत. ह्याच्या साधनेत (जर साधना खरोखर जमली तर) चमत्कार हे ह्यातील वास्तव आहे. त्या मुळे सर्वसामांन्य माणसाला अनेक युग ह्या योग प्रकाराबद्दल जबरदस्त कुतूहल आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला चांगला शिक्षक लाभल्याशिवाय ह्याचे प्रयोग करू नयेत. ईश्वराशी तादात्म्य पावणे हे शेवटी मनानेच करायचे आहे. पूर्वीच्या दोन प्रकारात मनातील भावनांना व बुद्धीला महत्व होते इथे मन आणि बुद्धीला शरीराची साथ द्यायची आहे. आणि भावनास्शुन्न्य व्हायचे आहे. प्रेम किंवा भक्ती म्हणजे भवूकपणा असा आपल्याकडे मोठ्ठा गैरसमज आहे. त्यामुळे आजही सामाजिक गैरसमजही बरेच आहेत. वास्तविक प्रेम हे समर्थ आहे. हा गहिवरून आणणारे आहे पण रडणारे अजिबात नाही. पण बऱ्याच चुकीच्या समजुती आहेत त्या झटकन काढून टाकणेही कठीण आहे पण त्या जायला हव्यात हे मात्र नक्की. इथे मात्र श्रद्धेची गरज नाही. इथे सर्व रोकडा व्यवहार आहे. अगदी बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला, असा रोकडा व्यवहार आहे. त्यामुळे इथे दया क्षमा जराही नाही. म्हणून बरेच सांभाळून. साधना रोज नियमाने (नियमाने करणे म्हणजेच नेम) आणि कठोरपणेच करायला लागते. लटकेपणा औंशताहा हि चालत नाही. ह्याची इतर कोणत्याही योगाशी सांगड घालता येत नाही, तुलनाही होऊ शकत नाही. म्हणूनच मी म्हटले आहे कि ह्या प्रकारची योग साधना हि प्राधान्याने संन्याश्यासाठीच आहे.
No comments:
Post a Comment