ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-क - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी
पाहिया ४ प्रकारातील प्रगती हि शारीरिक दिसते. आणि इथून पुढची उत्क्रां ती बौद्धिक व मानसिक आढळते.
पहिला मानव देही --------५)वामन - बुटका माणूस. पिग्मी. सजीवाच्या उत्क्रांतीतील मानवी देहधारी पहिला प्रकार. इथे मानव देह आहे. पण त्याहून अधिक काही प्रगत पण दिसत नाही.
नंतर बौद्धिक -------------- ६)परशुराम --- बौद्धिक उत्क्रांती, मानसिक दृष्ट्या तामसी. परशुरामाच्या बाबतीत बौद्धिक प्रगती परिपूर्ण झालेली आढळते, पण वृत्ती मात्र तामसी म्हणजे शंकरसारखी आढळते.
मग मानसिक ------------- ७)राम ------- बौद्धिक, अधिक मानसिक उत्क्रांती (तामसी ते राजस ते सात्विक) पण सत्व प्रधान. ह्या ठिकाणी वृत्तीत उत्क्रांती झालेली आढळते. श्री राम क्षत्रिय असून त्याची वृत्ती सात्विकता प्रधान आहे असे जाणवते. भावनिक तरलता हि आढळते. समाजाला स्वतः पेक्षा आधी प्राधान्य त्याने दिले आहे. आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी स् वीकारलेली आहे.
पूर्ण पुरुष ------------------ ८)कृष्ण ------ बौद्धिक, मानसिक, दोन्हीचे अत्यंत संतुलन असलेला अहंकारावर स्वामित्व मिळवलेला परिपूर्ण पुरुष. पुद्धी आणि मन दोन्हीही अत्यंत परिपूर्ण व अत्यंत संतुलित अशी हि अवस्था दिसते. त्यामुळे तात्कालिक समाजात सहज पणे स्वामित्व मुलून गेलेला असा हा महापुरुष आहे
ह्या प्रकारात असे लक्षात येते कि एखाद्या विशिष्ट काळात एखाद्या विशिष्ट समाजाला राक्षशी प्रवृत्तींच्या हुकुमशहांच्या बंधनातून मुक्त करणाऱ्याला त्या त्या वेळचा समाज देवत्व बहाल करतो. म्हणजे तो त्या काळी त्या समाजाचा नेता बनतो. त्या कालचा समाज त्याला सहज पणे आपला नेता म्हणून स्वीकारतो. आधी कधी तात्काळ. किंवा पुढे तो ऐतिहासिक, किंवा पूर्ण पुरुष झाला कि त्याला समाज देवत्व बहाल करतो. आपला तारणहार मानतो. ईश्वर मानतो कारण तो समाजाच्या मुक्तीचे कारण ठरलेला असतो.
No comments:
Post a Comment