ईश्वर / देवत्व कल्पना ---- ४-अ - चौथा प्रकार (तिसरा प्रकार) --- सजीवांचा उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,
१ ला अवतार- मत्स्य.
आपल्याकडे ८४ लक्ष सजीव प्रकार आहेत, अशी कल्पना आहे. त्यांची प्रगती सुद्धा जलचर - उभयचर -- भूचर अशा क्रमाने झालेली आहे आणि हे आजच्या विज्ञान प्रधान युगालाही ज्ञात आहे मान्य आहे. त्यातील बदलत्या टप्प्यातील शेवटचा टप्पा हा आपल्याकडे देवत्व मानला गेलेला दिसतो. म्हणजे जालाचारातील अंतिम प् रगल्भता लाभलेला टप्पा मत्स्य. मत्स्याच्या पुढची पायरी उभयचर त्यातील अंतिम प्रगल्भता लाभलेला टप्पा २ रा अवतार कूर्म. ३ रा भूचर वराह व ४ था नरसिंह हे रूप मात्र विज्ञानाच्या उत्क्रांती वादाशी थोडे वेगळे दिसते. मिश्र भावी दिसते.
ह्या उत्क्रांती वादाच्या मागची मानसिकता काय असावी ह्याचा आता विचार करू. श्रुष्टीतील यच्ययावत सजीव (आणि निर्जीव सुद्धा) मुक्ती साठी तडफडत आहे. त्याच्या अनेक इच्छांपैकी मुक्ती हि मुलभूत इच्छा आगदी प्रत्येकात अखंड आहे पण त्या साठी आपल्याला नेमके काय घडले म्हणजे आपण मुक्त होऊ? आपल्याला मोकळे वाटेल? असा विचार ज्या ज्या वेळी मनात घर करतो त्या त्या वेळी त्याला न लाभलेली आणि हवी असलेली गोष्ट लाभली तर त्याला मुक्त वाटते, हि सहज प्रवृत्ती निर्माण होते, आगदी प्रत्येक सजीवत. हि मुक्तीची तीव्र इच्छाच त्याला उत्क्रांतीला मदत करते. त्याच्या पुढील जन्मात त्याच्या ह्या इच्छेतूनच त्याच्या प्रत्येक पूर्वीच्या योनिपेक्षा जरा उच्च योनी त्याला प्राप्त होते. ह्या बदलाचा वेग कमी असतो. कारण तो जन्म जन्मान्साठीचा असतो. आपण प्रगत मानव विचार करू शकतो म्हणून ह्या मागच्या प्रगतीच्या आलेखाची आपल्याला नक्की कल्पना येऊ शकते. त्यातील महत्वाचे टप्पे म्हणजेच दहाव्तारातील पहिले ४ अवतार होत. ह्या टप्प्यात देहात बदल होत गेलेला दिसतो. हे होत असतांना. पहिला प्रकार नष्ट होत नाही. तर तो अस्तित्वात राहून पुढील प्रकार निर्माण होतो असे दिसते.
No comments:
Post a Comment