Wednesday, 8 August 2012

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-क - पहिला प्रकार ओमकार - ओम्कारातील भाव संकल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना ---- २-क - पहिला प्रकार ओमकार -  ओम्कारातील भाव संकल्पना 
आकाराची उत्पत्ती कंठात होते. पहिला सहज स्वर. हा प्रथम निर्मिती दर्शक   आनंद हा त्याचा सहज भाव आहे. स्वरच कशाला पण एखादा माणूस जेव्हा कोणतीही नवनिर्मिती करतो, किंवा त्याच्या संशोधनातून जेव्हा त्याला काही नवीन गवसते तेव्हा त्यालाही असाच आनंद होतो. उत्पत्ती म्हणजेच निर्मिती. निर्मितीचा आनंद तोच ब्रम्हानंद. जब हम  पैदा हुवे जग हसे हम रोये - कबीर  
उकराची उत्पत्ती तोंडाच्या माद्ध्यात होते. तो आदीही नाही आणि अंत हि नाही. हा स्वर स्वाभाविकच गंभीर असतो. स्थिरतेचे प्रतिक. हा स्थिरतेचे प्रतिक आहे. पण हि स्थिरता राखण्यासाठी जपण्यासाठी जी काळजी घ्यावी लागते त्यामुळे गांभीर्य येते. आपल्यावर जेव्हा एखाद्या कार्याची जबाबदारी असते तेव्हा आपल्यातही गंभीर भाव  येतो.   स्थिती म्हणजेच गांभीर्य, तोच विष्णू हा पालनकर्ता म्हणून गांभीर्य हा त्याचा प्रमुख भाव आहे.   
मकाराची उत्पत्ती ओठावर होते ओम्कारातील शेवटचे अक्षर/ध्वनी अंत. एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर राग यावा लागतो. राग सर्व काही जाळून टाकतो. सर्व काही नष्ट करण्यास प्रवृत्त करतो. तोच शंकर - राग हा त्याचा भाव आहे.

No comments:

Post a Comment