Monday, 17 October 2011

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग १ प्रस्तावना व माहिती
हिंदू समाजात पूर्वी एकत्र कुटुंब बद्धती होती त्यामुळे घरात दर ३ -  ४ महिन्ण्यानी काहीनाकाहीतरी कार्य घडत असे. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पहिल्या पिढी कडून पुढच्या पिढी कडे सहज न्यात होत जायच्या. आता विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे घरात कार्य काढले कि कोणकोणत्या गोष्टी लागतात हे माहित नसते. मला खुद्ध माझ्या मुलीच्या लग्नात हा अनुभव आला आणि तारांबळ झाली. त्यातून हे लिखाण करावे असे सुचले. कि जेणेकरून कार्य करतांना आपल्याला सर्व माहिती असावी. विविध विधींच्या साठी वेगवेगळी माणसे लागतात आणि ती ती माणसे त्या त्या वेळी हजर नसतील तर तारांबळ उडते म्हणून माहिती देतांना विधी - तो कधी करावा - त्या साठी लागणाऱ्या आवश्यक व्यक्ती - आणि काही आवश्यक माहिती. 
अशा पद्धतीने हे लिखाण केले आहे. हे लिखाण करतांना आमचे गुरुजी श्री वैशंपायन ह्यांनी धार्मिक बाबतीत काय करावे ह्याबद्दल पूर्ण माहिती देवून हे लिखाण जास्तीतास्त परिपूर्ण करण्यास मदत केली त्या बद्दल त्यांचे इथे मी आभार मानतो आणि माहिती देण्यास सुरुवात करतो

काही सूचना व माहिती
सामाजिक व लौकिक विधींना गुरुजींची जरुरी नसते. मात्र धार्मिक विधींना गुरुजींची आवश्यकता असते. अशा वेळी सामानाची यादी व कार्याचा दिवस वेळ ह्यांची माहिती आपण जे गुरुजी बोलावतो त्यांच्याकडून वेळोवेळी घ्यावी.
शुभ दिवस व अशुभ दिवस अलीकडे कालनिर्णय सारख्या बऱ्याच दिनदर्शिकेमधून दिलेले असतात. सामाजिक व लौकिक कार्यासाठी दिवस ठरवतांना अशा दिनदर्शिकेचा आधार आपण घेऊ शकतो. विवाह संस्कारातील कार्याची माहिती देतांना मुलगा म्हणजे वर आणि मुलगी म्हणजे वधु हे प्रचलित शब्द वापरले आहेत.
वैदिक विवाह पद्धतीत मातृका पूजन, नांदी श्राद्ध, देवक, वांग-निश्चय, झा ल म्हणजे ऐरणी पूजन हे कार्यक्रम ऐच्छिक असतात. मंगलाष्टके शेवटी गाईली जातात.
विशेष सूचना ----- वधु व वर यांचे आई वडील उभयता हयात नसतील तर त्यांचे ऐवजी कार्य करणारी व्यक्तीच वधु वर यांचे आई वडील समजावेत
क्रमशः --------------- १)ग्रहमख २)केळवण ३)व्याही भोजन

No comments:

Post a Comment