हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ७ वा
विधी १२ वा ------- कन्या दान
केव्हा करावा ------- लग्नानंतर
आवश्यक व्यक्ती --- वधु-वर व वधूचे आईवडील .
माहिती ------------- आपल्या समस्त पूर्वजांना निरंतर सुख मिळावे म्हणून संकल्पपूर्वक, कन्येचे दान करावयाचे असते. (एखाद्या वस्तूवर असलेला अधिकार सोडून देऊन दुसऱ्याचा अधिकार प्रस्थापित करणे म्हणजे दान होय.) कन्या दानाच्या निमित्ताने वधूपिता वधूवरांना संसारोपयोगी वस्तू देतो. समई तांब्या, फुलपात्र वगैरे (संध्येची पळी देऊ नये )
विशेष माहिती ---- कोणतेही दान करतांना देणाऱ्याचे हात वर पालथे व घेणार्याचे हात खालती उताणे असतात. इथे महत्वाचा फरक आहे वधूच्या वडिलांचे हात सर्वात खालती मद्ध्ये वधूचे हात आणि वरती वराचे हात आणि तीनही हात उताणे असतात. आणि पाणी सोडायला वधूची आई असते. ह्या मागचा हेतू असा आहे कि मुलगी हि वस्तू नव्हे. आईवडिलांनी तिचे जन्मापासून प्रेमाने पालन पोषण केलेले असते अश्या मुलीला उचलून देणे मनानी शक्यच नसते म्हणून तिचे वडील तिला आपल्या ओंजळीत घेऊन (तिचा हात ओंजळीत घेऊन) वाराला विनंती करतो कि तू हिला वर्चाय्वर माझ्या ओंजळीतून तुझ्या ओंजळीत अलगद उचलून घे.
विधी १३ वा -------- कंकण बंधन
केव्हा करावा ------- कन्यादानानंतर
आवश्यक व्यक्ती ---गुरुजी, वधू- वर
माहिती ------------- सुत गुंडी, गाठीची हळकुंडे, वधूवरांनी कायम स्वरुपात एकमेकांच्या बंधनात पवित्र मानाने राहावे हा हेतू. विवाह होमाची तयारी झाल्यावर वराकडून वधूला शालू दागिने जोडवी विरोल्या मंगळसूत्र वगैरे द्यायचे असते ते आणून ठेवावे. ते पुढे विवाह होमाच्या आरंभी वधूला वरच्या आईने द्यायचे असते.
विघी १४ वा --------- विवाह होम --------- ह्या होमांतर्गत एकूण ३ प्रमुख कार्य असतात. १ - लाजा होम-(अग्नीला लाह्या अर्पण करणे) २- सप्त पदी - पत्नी समवेत सात पाऊले चालणे व ३ - पाणिग्रहण - वधूचा हात वराने कायम स्वरूपासाठी स्वीकारणे.
केव्हा करावा ------- आताचे सर्व विधी कर्मानेच दिलेले आहेत
आवश्यक व्यक्ती --- गुरुजी, वधु/वर वधूचा भाऊ, सुवासिनी.
माहिती ------------- वधूच्या हातात वधूचा भाऊ लाह्या घालतो. नंतर वर आपल्या दोन्ही हाताने वधूची ओंजळ धरून त्या लाह्या अग्नीला अर्पण करतो. समृद्धीसाठी लाजा होम सांगितला आहे. वधूवरांनी लाह्यांच्या तीन आहुती द्याव्या. नंतर वधूचा कान पकडून, माझ्या बहिणीचा नीट सांभाळ करा असे सांगतो. वराने वधूच्या भावाला मान द्यावा शर्ट पीस / पाकीट द्यावे. ७ पाऊले चालण्या मागचा हेतू १)आपल्या दोघांना भरपूर अन्न मिळावे, २)शरीर सामर्थ्य लाभावे, ३)धनवृद्धी व्हावी, सौख्य वृद्धी व्हावी, ५ प्रजा वृद्धी व्हावी, ६)वासंतादी ऋतू आनंददायक व्हावेत, ७)आत्यंतिक सख्या लाभावे. या वेळी वधूची बहिण वधूच्या पायाचा अंगठा आपल्या उजव्या हाताने धरून मर्यादा नीट राख असे सुचविते. बहिणीचा मान द्यावा तिला ब्लाउज पीस / पाकीट द्यावे.
साप्त्पादिंची करणे वर दिली आहेत. त्यावर आपल्याकडे अनेकांनी अनेक प्रकार काव्य सुद्धा केली आहेत. पान मी पूज विधीच्या वेळी ज्या वैण्यानिक व मानसिक दृष्टीकोनातून त्या विषयाची मांडणी केली, त्या दृष्टीकोनातून सप्तपदी ह्या विधीमागाचे कार्य कारण असे आहे कि आपण एखाद्या व्यक्ती बरोबर अनेकदा भेटलो बोललो तरी बरोबर चालत सहवास घडतो तेव्हाच मैत्री हि भावना प्रगल्भतेने जाणवते म्हणून सोबतीने फिरणे ह्याचे हे प्रतिक आहे. आपण अनुभव घेऊन पाहावे.
पाणी ग्रहण चिरकाल सहजीवनासाठी पाणिग्रहण सांगितले आहे.
वरच्या आईने वधूला हळद कुंकू लाऊन शालू दागिने, जोडवी विरोल्या वधूला देणे. मंगल सूत्राच्या वाटीत दाबून भरावे व नंतर गुरुजी सांगतील तेव्हा वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे, वराने सोवळे नेसून पत्नी सह विवाह होम करावा
क्रमशः ------------- पुढील भागात - ऐरणी पूजन / झाल ठेवणे वधूची पाठवणी वराचे वधूसह स्वगृही आगमन, गृहप्रवेश लक्ष्मिपुजन नाम लक्ष्मी पूजन - नाव ठेवणे, देवक उठवणे. सूप पाखडणे

nice wedding method.
ReplyDeleteThanks Mr papu
DeleteThanks Mr Papu
ReplyDelete