Monday, 17 October 2011

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ३ ----- वांग निश्चय, मुहूर्त पत्रिका पूजन,
विधी ४ था -------------- वांग निश्चय - आजच्या काळी साखरपुडा - रिंग सेरिमनी  ------- हा धार्मिक व सामाजिक दोनही प्रकारचा विधी आहे.
केव्हा करावा -------- वांग निश्चय म्हणजे विवाहाचा निश्चय. आजच्या कळत साखरपुडा. हा विधी विवाह ठरल्यावर विवाहाच्या आगोदर करावा. त्यावेळीही वाईट दिवस नाहीना एव्हढे पाहावे. काही जण हा विधी विवाहाच्या दिवशीच विवाहापूर्वी करतात.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली, दोन्ही बाजूंचे काका मामा इत्यादी ज्येष्ठ व्यक्ती.
माहिती --------------  गणपती, वरून व शची म्हणजे इंद्राणी म्हणजे इंद्राची पत्नी हिची पूजा करून त्यांच्या साक्षीने वधु वडिलांनी वरच्या वडिलांना सांगायचे कि मी माझी मुलगी तुमच्या मुलाला देत आहे हे परस्परांना मान्य असून दोनही पक्षी आता तुम्ही मुलगी व आम्ही मुलगा पाहण्याची गरज नाही असे सांगायचे. वधु व वराकडील ज्येष्ठ पुरुष व्यक्तींचा व नातेवैकानंचा एकमेकांशी परिचय करणे, ह्यालाच व्याहीभेत असेही म्हणतात. याच वेळी वधूला दागिना देतात, साडी व ब्लाउजपीस, व मुंडावळ्या देतात.
विधी ५ वा - मुहूर्त पत्रिका पूजन  - हा धार्मिक / सामाजिक विधी आहे. गुरुजींची गरज असते.
केव्हा करावा -------- विवाहा पूर्वी सोयीनुसार साधारण कोणत्याही शुभ दिनी करावा. आपण ज्या पत्रिका वाटतो त्या वाटणे सुरु करण्या पूर्वी करावा.
आवश्यक व्यक्ती -----वधु व वर त्यांच्या आपापल्या घरी. त्यांचे आई वडील.
माहिती -------------- मुहूर्ताच्या वेळेची पत्रिका म्हणजे कुंडली मांडून तिचे पूजन करतात तशी केलेली नसल्यास वर व वधूची जन्मपत्रिका एकत्र पूजतात.
विघी ६ वा - सीमांत पूजन - सीमंती- श्रीमंत पूजन  - हेच जावी पूजन होय.
केव्हा करावा -------- लग्नाआधी त्याच दिवशी किंवा आदल्या दिवशी करावे.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधूच्या  आई/वडीलांसामावेत वधु व वरची मोठ्ठी बहिण लग्न झालेली असल्यास आपल्या पती समवेत (ज्येष्टजामातापूजन) व जवळची घरची नातेवाईक म्हणजे वधूची भावंडे वगैरे भोजनाला बोलावावीत.
माहिती -------------- गुरुजींच्या साक्षीने वधूच्या आईवडिलांनी जावी ज्येष्ठ जावई वराचे आई वडील भाऊ यांचा मान सन्मान करणे. त्याच वेळी वराचे पूजन करून पाय धुऊन पायावर स्वस्तिक काढून पोशाख, मुंडावळ, हार, वरदक्षिणा, सजवलेला नारळ देतात, अत्तर लाऊन गुलाबपाणी शिम्पाद्ल्यावर प्रथम मुलाच्या आईने व अन्य चार सुवासिंनिनी लामण दिव्याने (निरांजनाने) मुलाला औक्षण करावे. औक्षनानंतर प्रत्येकीने मुलाला पेढा भरवावा(बालविवाहाच्या काळी )/ द्यावा. वरच्या आईची, करवलीची (सुवासिनी असल्यास) ओटी भरावी. आईला गुळाची ढेप द्यावी. चांदीच्या वाटीत  हलवा द्यावा. उपस्थितांना अत्तर गुलाबपाणी पेढा द्यावा. तसेच मनाच्या (स्त्री / पुरुष ) सन्मान करावा.     
क्रमशः ------------- पुढील भागात - देवक ठेवणे


No comments:

Post a Comment