Monday, 17 October 2011

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग २
विधी १ ला  --------------ग्रहमख / ग्रहयज्ञ
केव्हा करावा --------विवाह ठरल्यावर वधु व वर दोघांच्या घरी विवाहाच्या ५, ४, किंवा १ दिवस आगोदर करावा. त्यावेळीही वाईट दिवस नाहीना एव्हढे पाहावे. आपल्या कार्याला सर्व ग्रहांची अनुकुलता लाभावी म्हणून हि ग्रहांची शांत असते.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली,
माहिती -------------- ग्रहमख - ह्यात सूर्यादी नवग्रह देवता, प्रत्येक ग्रहाच्या उजव्या बाजूला एक व डाव्या बाजूला एक ह्या प्रमाणे ९ * ३ = २७ देवता, ७ क्रतु साद गुंण्य्कार देवता. आणि अष्ट द्विक्पाल मिळून एकूण ४२ सुपाऱ्या देवता म्हणून पूजतात. सर्व्सामान्ण्यातः देवांची पूजा करतांना त्यांना नैवेद्य अर्पण करावयाचा असतो. मूर्ती पूजेत हा नैवेद्द्य म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच प्रकारचा नैवेद्य किंवा देव देव्तान्न्च्या आवडीचा पदार्थ त्याला अर्पण करणे असे त्याचे स्वरूप असते. ग्रह हे अंतराळात आपल्या भोवताली फिरतांना दिसतात त्याच्या साठी जो नैवेद्द्य अर्पण करायचा तो हवन केल्याने त्यांना पोहोचतो अशी आपल्या शास्त्राची श्रद्धा आहे. सर्व देव्तान्न्च्या बाबतीत (अग्निमुखावैदेवाः) अग्नी हे देवांचे मुख आहे अशी कल्पना आहे. म्हणून कोणतेही हवन / यज्ञ हे ग्रह नैवेद्द्य होय 
विधी २ रा - केळवण - हा सामाजिक विधी आहे. गुरुजींची गरज नसते.
केव्हा करावा -------- विवाहा पूर्वी सोयीनुसार साधारण कोणत्याही शुभ दिनी करावा
आवश्यक व्यक्ती -----वधु व वर त्यांच्या आपापल्या घरी. त्यांचे आई वडील इष्ट मित्र व नातेवाईकांसमवेत यथाशक्ती एक अगर पंचा पक्वान्ने करून भोजन करावे.
माहिती -------------- खर तर वधूकडील मंडळींना केळवण भावनिक दृष्ट्या विशेष महत्वाचे वाटते. कारण त्या नंतर त्यांची मुलगी कायमची दुसरीकडे राहायला जाणार असते. वधु- वर लग्नाच्या दिवशी कार्यात एव्हढे व्यस्त असतात कि त्यांना निवांतपणे भोजन  करणे कठीण असते. म्हणून निवांतपणे सर्वांसमवेत भोजन कर्वे एव्हढाच लौकिक संकेत केल्वानामागे आहे. 
विघी ३ रा - व्याही भोजन - वराच्या आईवडिलांनी वधूच्या आईवडिलांना जेवायला बोलवायचे असते.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी सोयीनुसार कोणत्याही शुभ दिनी करावे.
आवश्यक व्यक्ती ----- वधूचे आई/वडील व जवळची घरची नातेवाईक म्हणजे वधूची भावंडे वगैरे भोजनाला बोलावावीत.
माहिती -------------- पूर्वी एकदा मुलेचे लग्न झाले कि तिला मुल होईपर्यंत मुलीचे आई/वडील तिच्याकडे अन्न ग्रहण करीत नसत. म्हणून लग्नापूर्वी त्यांना वरच्या आई/वडिलांनी जावायला बोलावण्याची प्रथा आहे ह्या वेळी वधूला मात्र बोलावत नसत हल्ली बोलावतात.
क्रमशः ------------- पुढील भागात वांग- निश्चय, मुहूर्त - पत्रिका पूजन, सीमांत पूजन - सिमान्न्ती

No comments:

Post a Comment