Wednesday, 1 February 2012

भावनांतून मुक्ती ---- इ --- मुक्ती/गुरु/मी

भावनांतून मुक्ती ---- इ --- मुक्ती/गुरु/मी
आत्तापर्यंत आपण पाहिले कि माणसाला मुक्तीची जाणीव होणे ओढ लागणे आणि त्यासाठी वैचारिक प्रयत्न करणे हि पारमार्थिक लक्षण आहेत. बऱ्याच  जणांचे असे मत आहे कि त्यासाठी गुरु लागतो.  पण मी ज्या ज्या लोकांच्या  संपर्कात आलो त्यांना विचारले तुम्ही ह्या गुरूंच्या कडे का जाता? त्यावर प्रत्येकांनी उत्तरादाखल जे सांगितले ते  बहुतौंशी असे होते कि त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काहीतरी अडचणी होत्या. त्या सुटाव्यात हि  इच्छा  घेऊन ते त्या गुरूंच्या कडे  जायला लागल्यावर सुटल्या. असे सर्वसाधारण उत्तर होते. म्हणजे अडचणी ह्या  बंधन  निर्माण करतात हि सर्वसामांन्य आणि स्पष्ट अशी मानवी धारणा दिसते. ह्याचा दुसरा अर्थ असा निघतो मला उपभोग देही सुख हवे आहे भोग मात्र नकोत. म्हणजे संपूर्ण मुक्ती नकोच आहे. पण आव मात्र परमार्थाचा धार्मिकतेचा असतो हि मुल समस्या आहे.   
परमार्थात तर म्हटले आहे कि त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी जाहला --- परमार्थाचा --- मुक्तीचा. म्हणजे मानवाला अनेक प्रकारचे भोग त्रास भोगावेच लागतात  त्याचे प्रकार शास्त्रकारांनी केले आहेत. वर्गीकरण केले आहे. ते असे --- आधिभौतिक, आधिदैविक, अध्यात्मिक, म्हणजे ज्या प्रकारचे आपण पूर्वाआचरण केले असेल त्या प्रकारच्या  प्रतिक्रिया आपल्याला निसर्गनियमाने येतात. निव्वळ प्रतीक्र्याच नाहीत तर त्या भोग रूपाने भोगायलाच  लागतात. त्याने माणूस इतका पोळला जातो कि त्याचे मी पण नष्ट होते. त्याक्षणी तो परमार्थाचा अधिकारी होतो. असे पारमार्थिक वचन आहे.  आत्ता मी मुद्दाम अधिकारी शब्दाबद्दल लिहिणार  आहे. आपण अधिकारी शब्द  सर्व्सामान्ण्यातः सत्ता ह्या अर्थाने वापरतो. पण परमार्थी लिखाणात,  विचारात, अधिकारी होत्ने ह्याचा स्पष्ट अर्थ ज्या गोष्टीची आपण अपेक्षा धरतो ती मिळायला आपण पात्र होणे. जी हवी ती सायुज्य मुक्ती मिळायला-लाभायला लायक, होणे असा आहे. म्हणून ह्या अधिकारी शब्दापासून  फार  सावध राहावे लागते कारण अधिकार म्हणजे मी आलाच म्हणजे अहंकार आलाच मग मुक्ती कुठची मिळायला?  हा गुरु मी आणि मुक्ती ह्या त्रीपुतीतील विरोधाभास आहे ह्याची जाणीव करून देणे हे मला संयुक्तिक वाटले ---- निर्मम व्हावे शुभम भवतु.            

भावनांतून मुक्ती ---- ड --- वास्तविक देवाकडे जाण्याची माणसाला काहीच गरज नाही

भावनांतून मुक्ती ---- ड --- वास्तविक देवाकडे जाण्याची माणसाला काहीच गरज नाही कारण तो तर सर्वत्र आहेच. अहो सर्वत्र कशाला आपल्या आतही आहे. मग शोधायचा कसा? कशाला? आणि कुठे?  
स्वामी  विवेकानंदांनी म्हटले आहे कि मुक्ती हवी असेल तर देवांनाही मानव म्हणून जन्म घ्यावा लागेल. म्हणजे अलीकडे positive विचार करा हे सर्वदूर कानीकपाळी ओरड चाललेली आपल्याला ऐकू येते. पण ईश्वरा बद्दल बोलायचे झाले तर हे नाही हे नाही असेच बोलावे लागते कारण तो पंचा न्यानेन्द्रीयानी जनता येत नाही. कामेंद्र्यांच्या कक्षात येत नाही बुद्धीने आकलन होत नाही. मग अंदाज तरी कसा द्यायचा? मग भौतीकतली उदाहरणे देऊन नेती नेती म्हणजे न इति न इति म्हजेच हे नाही हे नाही असेच नाकार्थी सांगावे लागते.
खरे पारमार्थी संत म्हणतात जो देव दिसला असे म्हणतो तो एक तर खरोखरच संत असला पाहिजे नाहीतर वेद असला पाहिजे.  
संत होणे हे देव होण्यापेक्षा हि कठीण आहे तो आपला विषय नाही मी म्हणेन ते जाणण्या पेक्षा आधी  आपल्यातला माणूस शोधावा म्हणजे  दुसऱ्यातील  माणूस दिसायला लागेल. आपल्यातला माणसाने  माणुसकीची  ज्योत लावली तर देवाला ती दिसेल आणि तो ------- अरे तो बघा इथे माणूस दिसतोय म्हणत आपल्या कडे नक्कीच धा-आ-आ-आ-वत  येईल. कारण त्यालाहि सध्या माणसे फारशी दिसत नाहीयेत. खरच देवच आज  माणसाच्या  शोधात आहे. त्याला दिसेल का एकतरी माणूस त्याच्या फ्रेंड्स लिस्ट मद्ध्ये त्याला हवाय  .............            

भावनांतून मुक्ती ---- क --- आजची समाजाची अवस्था अशीच आहे. माणसाला जसे मन म्हणजेच त्याचे सूक्ष्म शरीर असते

भावनांतून मुक्ती ---- क --- आजची  समाजाची  अवस्था अशीच आहे. माणसाला जसे मन म्हणजेच त्याचे सूक्ष्म शरीर  असते तसे समाजाला  सुद्धा मन असते त्याला समाजमन म्हणतात. समविचारी माणसे एकत्र येतात व त्यांचा गट बनतो. अशा अनेक गटांचा  समाज बनतो. त्यामुळे ज्या एका समान विचारांनी तो गट बनतो त्यांचे एकत्रित  विचार  हे त्या गटाचे मन असते. पण त्यातही व्यक्तिगत विचारांचे मोहोळ त्याच्या भोवती असतेच. असतेच त्यामुळे असे गट स्वतःच संभ्रमावस्थेत असतात. कारण एकच एक विचार निश्चित नसतो प्रत्येक माणूस वेगवेगळ्या विचाराने  म्हणजेच उद्देशाने एकत्र आलेला असतो त्यामुळे असे समाज गट वरवर जरी एक दिसले तरी आतून  भंगलेलेच  असतात. कारण त्यापैकी कोणाचाच स्वार्थ सुटलेला नसतो, आणि तो हि वेगवेगळा असतो. अगदी देवाधर्माच्या  नावाने निर्माण झालेल्या गटांची सुद्धा ह्यापेक्षा वेगळी स्थिती नसते. नाव देवाचे आणि समस्या भौतिक अशी ह्यांची  वस्तुस्थिती असते. त्यामुळे यश येत नाही. देवाच्या दारात  गरीब भिकारी असतात तर मंदिरात श्रीमंत भिकारी असतात जो मागतो तो भिकारी नाहीका ??   देव कुणालाच नको असतो त्याने आपल्यासाठी काहीतरी करावे आपले भौतिक भोग पुरवावेत हि भिक मागायला माणूस त्याच्या कडे जातो.

भावनांतून मुक्ती ---- ब --- आपल्याच भावनांना रिपू न मानता त्यांच्याकडे जर प्रेमाने पाहिले तर

भावनांतून मुक्ती ---- ब --- आपल्याच भावनांना रिपू न मानता त्यांच्याकडे  जर प्रेमाने पाहिले तर त्यांच्या बंधनातून आपण लवकर मोकळे होऊ कारण मग त्या भावनाही  आपल्याशी  मैत्रीने वागतील आपले ऐकतील आपल्यावर जबरदस्ती करणार नाहीत. कारण ज्याला आपण शत्रू मानतो  त्याचा आपण स्वाभाविक  पणे तिरस्कार  करतो राग धरतो मानापमान  बाळगतो म्हणजेच पर्यायाने क्रोधाचा क्रोध मत्सराचा मत्सर अहंकाराचा  अहंकार  अशी भयंक अवस्था माणसाच्या मनाची होते. मुळात हे भाव तर आपल्यापासून वेगळे नाहीत ते आपल्याला चिकटलेले असतात म्हणजेच जोपर्यंत आपण त्यांना आपल्यापासून वेगळे करत नाही तो पर्यंत पर्यायाने आपण त्यांचा नाही आपलाच स्वतःचाच राग, मत्सर, तिरस्कार करतो. हि माणसाच्या मनाची सर्वात वाईट अत्म्हत्यारी अवस्था आहे.  आज समाजात १२-१५ वर्षांची मुले आत्महत्येला प्रवृत्त होतात ते ह्याच मानसिकतेचे लक्षण आहे मी फक्त शास्त्रीय शब्दात मांडले आहे. इतरत्र दिसणारी अ सहिष्णुता सुद्धा ह्याच प्रवृत्तीचे परिणाम आहेत.
एक छोटी गोष्ट सांगतो नारद मुनींनी एकदा भगवान विष्णूंना विचारले कि तुला सर्वात प्रिय काय आहे? त्यावर भगवान म्हणाले म्हणाला तू सुज्ञ आणि न्यानीही आहेस तूच सांग मला काय प्रिय असेल ते? नारदांनी राधा, रुक्मिणी, तू स्वतः तरी??? असे बरेच पर्याय सांगितले त्यावर भगवान म्हणाले मला माझा भक्त सर्वात प्रिय आहे कारण त्याला सोडविण्यासाठी मी ज्याच्याशी युद्ध करतो. त्याचा मला राग धरावालागतो. म्हणजे मीहि रागाने लिप्त असतो. माझ्या शिष्याच्या मनात मात्र त्याचाही राग नसतो म्हणून मला माझा भक्त सर्वात जास्त आवडतो. हि रूपक कथा आहे. पण मनाचे निर्लेपपण म्हणजे काय हे सुंदर रीतीने सांगितले आहे.  

भावनांतून मुक्ती ---- अ

भावनांतून मुक्ती ---- अ --- आता पुन्हा एकदा मुक्ती ह्या विषयाकडे वाळू मागे आपण मुक्तीचे ४ प्रकार/पायरया बघितल्या त्या वरून असे लक्षात येईल कि माणसाला कशा कशातून मुक्त व्हावेसे वाटते? तर ज्या ज्या ठिकाणी माणसाला पारतंत्र्याची जाणीव होते त्या त्या गोष्टीतून मुक्त व्यावेसे वाटते. भौतिकात आपल्यावर हक्क गाजवणाऱ्या  समाज गट अथवा व्यक्तीच्या पासून मुक्त व्हावे असे  माणसाला  वाटते. पण सूक्ष्मात काय?  मन हे माणसाचे सूक्ष्म शरीर आहे. त्यातील विकार  व भावनांचे सुद्धा आपण गुलाम होत असतो. पण हि जाणीव माणसाला फार उशिरा होते. हि जाणीव झाल्यावर  त्यांच्या कचाट्यातून सुटण्याची इच्छा होते. त्या क्षणी, त्या माणसाच्या जीवनात खऱ्या अर्थाने परमार्थाची  सुरुवात  होत असते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. दुसऱ्याने  लादलेल्या गुलामगिरीमुळे त्याच्यावर राग येणे त्याचा मत्सर वाटणे हे स्वाभाविक आहे. त्यातूनच तर क्रांती जन्माला येते. पण भावनांच्या बंधनातून सुटायचे असेल तर त्यांचा राग किंवा मत्सर  करून चालत नाही. कारण मागे जाऊन नीट विचार केला तर आपल्याला असे नक्की जाणवेल कि भौतिकात  सत्तेसाठी दुसरा माणूस आपल्याला गुलाम करू इच्छितो इथे मात्र त्या भावनांनी आपल्याला गुलाम केलेले  नसते तर आपणच अज्ञानाने त्यांची गुलामगिरी स्वखुशीने  स्वीकारलेली  असते.  असे आहे तर मग त्यांच्या गुलामगिरीतून सुटणे वास्तविक आपल्या हातात आहे. तरीही असे जाणवते कि माणसाचे मन सवयींचा गुलाम असल्यामुळे हि मानतील क्रांती करणे त्याला भौतिक  क्रांतीपेक्षा  जास्त अवघड जाते.